Jump to content

डफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • डफ हे एक तालवाद्य आहे.

लोकसंगीतात साथीसाठी याचा वापर करतात. या वाद्यात लाकडी किंवा धातूपासून बनवलेल्या वर्तुळाकार पट्टीवर चामडे ताणून बसवलेले असते. एका हातात धरून दुसऱ्या हाताच्या बोटांनी आणि पंजाने चामड्यावर हळूवार आघात करून हे वाद्य वाजविले जाते. हे मुख्यत्वे, पोवाडे गाणाऱ्या शाहिरांचे वाद्य आहे. पथनाट्यातही डफचा वापर आवडीने करतात.