सरोद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सरोद
आडवी ठेवलेली सरोद

सरोद हे हिंदुस्तानी शास्त्रीय वाद्य संगीतातले एक प्रमुख तंतुवाद्य आहे. सरोदची उत्पत्ती अफगाणी रुबाब ह्या वाद्यातून झाली आहे, असे समजले जाते. सरोद ह्या शब्दाचा अर्थ फारसी भाषेत गाणे असा आहे. लाल मणी मिश्रा ह्यांच्या मतानुसार सरोद हा चित्र वीणा, अफगाणी रुबाब आणि सुरशृंगार ह्या वाद्यांचे संमिश्रण आहे. मैहर घराण्याच्या सरोदला चार मुख्य तारा, चार जास्तीच्या तारा, दोन चिकारी आणि पंधरा तरफेच्या तारा असतात. तारा छेडण्यासाठी नारळाच्या करवंटीचा ’जवा’ वापरला जातो. अल्लाउद्दीन खान, अली अकबर खान, हाफिज अली खान, अमजद अली खान, बुद्धदेव दासगुप्ता, राधिका मोहन मोईत्रा, शरण राणी, झरीन दारूवाला हे विसाव्या शतकातले काही प्रमुख सरोदवादक आहेत.