राग मालकंस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राग मालकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. मालकंस रागाला सर्व रागांचा राजा मानले जाते. हा राग गायची वेळ रात्री १२ ते ३ ची आहे. हा काही वेळा मालकौश नावानेही ओळखला जातो. कर्नाटकी गायकीत या सदृष हिंदोलम हा राग असू शकतो. मालकंस साधारणपणे मंद्र सप्तकात गायला आणि विलंबित तालात असतो.

इतिहास[संपादन]

हा सर्वात पुरातन रागांपैकी एक राग आहे. संगीतकार नौशाद यांच्यासह एक वर्ग असे मानतो की या रागाची रचना भगवान शिव यांनी केली आहे. तर काही लोक मानतात की याची रचना पार्वतीने केली. शिव तांडव करत असताना बेभान झाले असता त्यांना शांत करण्यासाठी हा मालकंस राग पार्वतीने गायला.

स्वरूप[संपादन]

आरोह: नि स ग म ध नि सा

अवरोह:स नि ध म ग म ग सा अथवा सा नि ध म ग सा

वादी व संवादी[संपादन]

वादी स्वर मध्यम (म) आणि संवादी स्वर षड्ज (सा)

लक्षणगीत[संपादन]

मालकंस गावत गुनिजन रि प वर्जित सूर गधनी कोमल अत गंभीर रस सोहत सुंदर || अंतरा || वादी मध्यम जनको संमत संवादी सूर षड्जही मानत वेळा रजनी मध्य सुहावत

मालकंस रागातील काही गीते[संपादन]

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.