अल्लारखा
Indian tabla player | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Alla Rakha |
---|---|
जन्म तारीख | एप्रिल २९, इ.स. १९१९ गुरदासपूर जिल्हा Allarakha Khan Qureshi |
मृत्यू तारीख | फेब्रुवारी ३, इ.स. २००० मुंबई |
मृत्युची पद्धत |
|
मृत्युचे कारण | |
नागरिकत्व |
|
व्यवसाय |
|
अपत्य | |
पुरस्कार |
|
अल्लारखा खान अथवा अल्लारखा खान कुरेशी (एप्रिल २९, १९१९ - फेब्रुवारी ३, २०००) हे प्रसिद्ध भारतीय तबलावादक होते.[१]
कारकीर्द
[संपादन]उस्ताद अल्लारखा कुरेशी ह्यांनी साथसंगतकार म्हणून लाहोरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर १९३६ साली ते आकाशवाणी, दिल्ली येथे काम करायला लागले. १९४० साली, त्यांनी मुंबई आकाशवाणी स्टेशनचे पहिले तबला एकाल वादन सादर केले.
अल्लारखा प्रसिद्ध तबलावादक तर होतेच, शिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांनाही 'अल्ला रखा' आणि 'ए. आर. क़ुरेशी' या नावांनी संगीत दिले होते. मॉं बाप, सबक़, बेवफ़ा हे त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपट होते. मॉं बाप चित्रपटात त्यांच्या आवाज़ातेले गाणेही ऐकायला मिळते. ते गाणे अनेक संग्राहकांकडे उपलब्ध आहे.
तरीही त्यांनी साथसंगत चालूच ठेवली. त्यांनी बडे गुलाम अली खाँ, विलायत खाँ, वसंत राय, अली अकबर खाँ आणि पंडित रवी शंकर ह्यांना तबल्याची साथ केली.[२]
अल्लारखांची प्रथम पत्नी आणि मुलगी फाळणीनंतर पाकिस्तानात गेली. या मुलीने लाहोर रेडिओवर निवेदिका म्हणून जम बसवला. भारतातले त्यांचे पुत्र झाकिर हुसेन आणि फझल क़ुरेशी यांनी तबलावादनात नाव कमवले.[१]
अल्लारखांकडून काही बंदिशी मिळाल्याचा लाभ भीमसेन जोश्यांसहित काही दिग्गज गायकांना झालेला आहे. सतारवादक रविशंकर आणि सरोदवादक अली अकबर खान यांच्याबरोबर अल्लारखांची खास जोडी जमली होती.
पुरस्कार
[संपादन]अल्लारखा ह्यांना १९७७ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला, आणि १९८२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केले गेले.[३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b "Lesser known facts about Ustad Allah Rakha". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2014-04-30. 2021-06-03 रोजी पाहिले.
- ^ Pareles, Jon (2000-02-06). "The New York Times" (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331.
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2015-10-15. 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2021-06-03 रोजी पाहिले.
हे सुद्धा पहा
[संपादन]