Jump to content

झाकिर हुसेन (संगीतकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झाकिर हुसेन (तबलावादक) या पानावरून पुनर्निर्देशित)
झाकीर हुसेन

झाकीर हुसेन


जन्म९ मार्च १९५१
मुंबई
मृत्यू१५ डिसेंबर, २०२४ (वय ७३)[]
सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका
कार्यक्षेत्रतबलावादन
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषाऊर्दू
प्रमुख चित्रपटहिट ॲंड डस्ट(१९८३) वनप्रश्थम्(मल्याळम्)
पुरस्कारपद्मश्री(१९८८), पद्मभूषण(२००२), ग्रॅमी पुरस्कार (२००९)
वडीलउस्ताद अल्लारखाँ
पत्नीॲंटोनिया
अपत्येअनिसा कुरेशी, इसाबेल कुरेशी

उस्ताद झाकीर हुसेन (९ मार्च, १९५१ - १५ डिसेंबर, २०२४[]) हे एक भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक होते. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र होते.[]

त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले.[]

सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण

[संपादन]

झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले.[] हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले.

त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.[]

हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते  वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक पं. रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले.[]

कारकीर्द

[संपादन]

झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.[]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

हुसेन ह्यांना दोन भाऊ आहेत: उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्यवादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत.[]

मृत्यू

[संपादन]

हुसेन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी १५ डिसेंबर २०२४ रोजी सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे निधन झाले. हा एक श्वसन प्रणालीचा दुर्मिळ आजार आहे, ज्यात फुफ्फुसातील उती कडक आणि घट्ट होतात.[][][]

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
वर्षपुरस्कार/सन्मानकार्यसंदर्भ
१९८८पद्मश्रीकला क्षेत्रात योगदानभारत सरकार[१०]
१९९०इंडो-अमेरिकन पुरस्कारभारत आणि अमेरिका यांच्यातील सांस्कृतिक संबंधांमधील उत्कृष्ट योगदानEncyclopedia.com[११]
१९९०संगीत नाटक अकादमी पुरस्कारतबला वादन (सर्वात तरुण मानकरींपैकी एक)भारताचे राष्ट्रपती / संगीत नाटक अकादमी[१२]
१९९२ग्रॅमी पुरस्कारसर्वोत्कृष्ट वर्ल्ड म्युझिक अल्बम ('प्लॅनेट ड्रम' - मिकी हार्ट सोबत सह-निर्मित)
* डाउनबीट क्रिटिक्स पोलचा 'सर्वोत्कृष्ट वर्ल्ड बीट अल्बम'
* NARM 'इंडी बेस्ट सेलर पुरस्कार'
ग्रॅमी पुरस्कार समिती[१३][१४]
१९९९नॅशनल हेरिटेज फेलोशिपपारंपारिक कलांमधील उत्कृष्ट योगदान (North Indian Master Tabla Drummer)नॅशनल एंडॉवमेंट फॉर द आर्ट्स, अमेरिका (प्रथम महिला हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते प्रदान)[१५]
२००२पद्मभूषणकला क्षेत्रात योगदानभारत सरकार[१०][१६]
२००५ओल्ड डोमिनियन फेलोसंगीत विभागातील पूर्णवेळ प्राध्यापकपद आणि भारतीय शास्त्रीय संगीताचे अध्यापन (सत्र २००५-२००६)ह्युमॅनिटीज कौन्सिल, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी[१७]
२००६कालिदास सन्मानअसाधारण कामगिरी करणारे कलाकारमध्य प्रदेश सरकार[१८]
२००६ग्रॅमी पुरस्कार (नामांकन)सर्वोत्कृष्ट पारंपारिक वर्ल्ड म्युझिक अल्बम ('गोल्डन स्ट्रिंग्स ऑफ द सरोद' - आशिष खान सोबत)ग्रॅमी पुरस्कार समिती[१९]
२००७बेस्ट वर्ल्ड म्युझिक आणि बेस्ट वर्ल्ड बीट ड्रमरवाचकांचा कौल'मॉडर्न ड्रमर' आणि 'ड्रम!' मासिक्स[२०]
२००९ग्रॅमी पुरस्कारसर्वोत्कृष्ट समकालीन वर्ल्ड म्युझिक अल्बम ('ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट' - मिकी हार्ट, सिकिरू अडेपोज़ू, आणि जियोव्हाानी हिडाल्गो सोबत संयुक्त)५१ वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा[२१]
२०१२गुरू गंगाधर प्रधान जीवनगौरव पुरस्कारसंगीत आणि नृत्य क्षेत्रातील योगदानकोणार्क नृत्य आणि संगीत महोत्सव (कोणार्क नाट्य मंडप)[२२]
२०१६प्रेसिडेंट्स मेडल ऑफ द Arts (नामांकन)बिगर-अमेरिकन नागरिकांना न देण्याच्या नवीन नियमामुळे पदक मिळू शकले नाहीअमेरिका सरकार[२३]
२०१७जीवनगौरव पुरस्कारसंगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानसॅन फ्रान्सिस्को जॅझ सेंटर (SFJAZZ Center)[२३]
२०१९संगीत नाटक अकादमी फेलो (अकादमी रत्न)वर्ष २०१८ साठीचा सर्वोच्च बहुमानसंगीत नाटक अकादमी[२३]
२०२२मानद डॉक्टर ऑफ लॉ (LLD) पदवीसंगीत क्षेत्रातील असाधारण योगदानमुंबई विद्यापीठ[२४]
२०२२क्योतो पुरस्कारकला आणि तत्त्वज्ञान (क्षेत्र: संगीत) मधील जागतिक कामगिरी (जपानचा सर्वोच्च खाजगी पुरस्कार)इनामोरी फाउंडेशन, जपान[२५]
२०२३पद्मविभूषणकला क्षेत्रात योगदानभारत सरकार[२६]
२०२४ग्रॅमी पुरस्कार (३ पुरस्कार जिंकले)१. सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत परफॉर्मन्स ("पश्तो" - बेला फ्लेक, एडगर मेइर, आणि राकेश चौरसिया सोबत)
२. सर्वोत्कृष्ट समकालीन वाद्य अल्बम ('अज वी स्पीक' - फ्लेक, मेइर आणि चौरसिया सोबत)
३. सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम ('धिस मोमेंट' - शक्ती बँड सोबत)
६६ वा वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळा[२७][२८][२९]
२०२६ग्रॅमी पुरस्कार (२ नामांकने)१. सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम ('माइंड एक्स्प्लोजन - ५० वी ॲनिव्हर्सरी टूर लाईव्ह' - शक्ती बँड सोबत)
२. सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत परफॉर्मन्स ("श्रिनीज ड्रीम - लाइव्ह")
६८ वा वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळा (एकूण ग्रॅमी संख्या: ४ विजय, ९ नामांकने)[३०][२१]

प्रकाशित सीडी[३१]

[संपादन]
  • ईव्हनींग राग (१९७०)
  • शांती (१९७१)
  • रोलिंग थंडर (१९७२)
  • शक्ती (१९७५)

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "मशहूर तबला वादक जाकिर हुसैन का निधन, सैन फ्रांसिस्को में ली आखिरी सांस, शशि कपूर संग कर चुके थे एक्टिंग". navbharattimes.indiatimes.com (हिंदी भाषेत). १५ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  2. "Zakir | Zakir Hussain". 2021-06-03 रोजी पाहिले.
  3. 1 2 3 "Zakir Hussain: His name spells magic on tabla". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-09-30. 2021-06-03 रोजी पाहिले.
  4. "Indian tabla master Zakir Hussain says he never stops learning". web.archive.org. 2008-05-06. रोजी मूळ पानापासून संग्रहित2008-05-06. 2021-06-03 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  5. "Google doodle marks Ustad Alla Rakha's 95th birthday". NDTV Gadgets 360 (इंग्रजी भाषेत). 2021-06-03 रोजी पाहिले.
  6. "Zakir Husain: His name spells magic on tabla". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-09-30. 2021-06-03 रोजी पाहिले.
  7. "इस खतरनाक बीमारी से हुआ मशहूर तबला वादक उस्ताद जाकिर हुसैन का निधन, अमेरिका में चल रहा था इलाज". इंडिया टीव्ही (हिंदी भाषेत). १६ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  8. "Zakir Hussain, legendary Tabla virtuoso, dies at 73, confirms family". Hindustan Times. 16 December 2024. 16 December 2024 रोजी पाहिले.
  9. Kim, Juliana (16 December 2024). "Zakir Hussain, legendary tabla virtuoso who defied genres, dies at 73". NPR. 16 December 2024 रोजी पाहिले.
  10. 1 2 "Year wise list of recipients 1954–2014" (PDF). गृह मंत्रालय (भारत). 15 November 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 22 March 2016 रोजी पाहिले.
  11. Hightower, Laura (n.d.). "Hussain, Zakir". Encyclopedia.com. 15 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 June 2024 रोजी पाहिले.
  12. "SNA: Awardees List". संगीत नाटक अकादमी. 30 May 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  13. "Album featuring Zakir Hussain wins Grammy for contemporary world music". द टाइम्स ऑफ इंडिया. 9 February 2009. ISSN 0971-8257. 15 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 June 2024 रोजी पाहिले.
  14. "Zakir Hussain". Drummerworld. 2023. 15 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 June 2024 रोजी पाहिले.
  15. "Zakir Hussain: North Indian Master Tabla Drummer". www.arts.gov. National Endowment for the Arts. n.d. 5 July 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 December 2020 रोजी पाहिले.
  16. "Padma Vibhushan for Rangarajan, Soli Sorabjee". द हिंदू. 26 January 2002. 19 July 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 January 2002 रोजी पाहिले.
  17. "Zakir Hussain". Kennedy Center (इंग्रजी भाषेत). 25 February 2011. 15 June 2024 रोजी पाहिले.
  18. "Tabla maestro Ustad Zakir Hussain performs in Bhopal, India, Monday, Feb. 13, 2006. Hussain was conferred with Kalidas Samman by the Madhya Pradesh state government". Alamy.com (इंग्रजी भाषेत). 15 June 2024 रोजी पाहिले.
  19. "Artist: Aashish Khan". Grammy.com. 2024. 15 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 June 2024 रोजी पाहिले.
  20. "Zakir Hussain and Masters of Percussion". www.bucknell.edu (इंग्रजी भाषेत). 15 June 2024 रोजी पाहिले.
  21. 1 2 "Artist: Zakir Hussain". Grammy.com. 2025. 25 May 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 November 2025 रोजी पाहिले.
  22. "Spirit's triumph". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 28 February 2013. ISSN 0971-751X. 15 June 2024 रोजी पाहिले.
  23. 1 2 3 चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ":0" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  24. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ":1" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  25. "2022 Kyoto Prize Laureates: Zakir Hussain". kyotoprize.org. Inamori Foundation. 2022. 17 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 June 2022 रोजी पाहिले.
  26. "Padma Awards 2023 announced". www.pib.gov.in. 27 January 2023 रोजी पाहिले.
  27. "Shankar Mahadevan & Zakir Hussain Triumph at 2024 Grammy Awards with 'The moment' album". Bru Times News (इंग्रजी भाषेत). 5 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 February 2024 रोजी पाहिले.
  28. "Grammy Awards 2024 winner Shakti: 5 things you need to know about Shankar Mahadevan and Zakir Hussain's fusion band". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 5 February 2024. 5 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 February 2024 रोजी पाहिले.
  29. "Without harmony, we are nothing: Zakir Hussain wins 3 Grammy awards". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 5 February 2024. 6 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 February 2024 रोजी पाहिले.
  30. Faulkner, Clara (2025-11-07). "2026 Grammys: See The Full Nominations List". grammy.com. 2025-11-10 रोजी पाहिले.
  31. "ZAKIR HUSSAIN SELECTED DISCOGRAPHY | Zakir Hussain". 2021-06-03 रोजी पाहिले.