माधव गुडी
Appearance
माधव गुडी | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | इ.स. १९४१ |
मृत्यू | एप्रिल २२, इ.स. २०११ |
संगीत साधना | |
गुरू | भीमसेन जोशी |
गायन प्रकार | हिंदुस्तानी गायन नाट्यसंगीत अभंग (कन्नड, मराठी) |
घराणे | किराणा घराणे |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | संगीत |
गौरव | |
गौरव | कर्नाटक कला तिलक पुरस्कार |
पंडित माधव गुडी ( : धारवाड, कर्नाटक, इ.स. १९४१; - हुबळी, कर्नाटक, २२ एप्रिल इ.स. २०११) हे हिंदुस्तानी संगीत शैलीतील गायक होते.
जीवन
[संपादन]माधव गुडी यांचा जन्म वर्तमान कर्नाटकातील धारवाड येथे इ.स. १९४१ साली कीर्तनाची परंपरा असलेल्या घराण्यात झाला. अगदी लहानपणीच ते बसवराज राजगुरू यांच्याकडे गायन शिकू लागले. त्यांच्या आवाजाचा आवाका लक्षात घेऊन राजगुरू यांनीच त्यांना भीमसेन जोशी यांच्याकडे सुपूर्द केले आणि तब्बल पंचवीस वर्षे गुडी यांनी भीमसेन जोश्यांकडे किराणा घराण्याची तालीम घेतली.
आयुष्याच्या अखेरची काही वर्षे गुडी यकृताच्या आजाराने आजारी होते. एप्रिल २२ इ.स. २०११ रोजी कर्नाटकातील हुबळी येथे त्यांचे निधन झाले.