Jump to content

नगारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नगारा हे केवळ एक ऐतिहासिक वाद्ययंत्र नसून ते साहित्य आणि लोकजीवनाचा सजग प्रहरी म्हणून पुढे आले आहे. मानवी मूल्यांचा जयघोष करणारा नगारा (महाकाव्य) साहित्यात दिसून येते. महाराष्ट्रातील पोहरागड येथील बंजारा विरासतची ऐतिहासिक नगारा वास्तू देखील प्रचलित आहे. तसेच नगारा हा वादय विशेषतः राजपुतानाशी अधिक निकटचा मानला जातो. विजय, शौर्य, पराक्रम, जीवन संगीत, नवं स्फुर्ती व मानवी चेतनाचे एक अमोघ प्रतिक मानले जाते.

'नगारा' महाकाव्य

[संपादन]

'नगारा' हे वैश्विक मानवी मूल्यांचे संवर्धन करणारे बंजारा भाषेतील एक अभिजात महाकाव्य म्हणून ओळखले जाते. प्रख्यात साहित्यिक व विचारवंत एकनाथराव पवार नायक यांनी रचलेले हे प्रसिद्ध महाकाव्य एकूण चार विभागांत विभागले आहे. परंतु त्यांचा आत्मा म्हणजे वैश्विक मानवी कल्याण हाच होय. या महाकाव्याचे आशयबिंदू प्रामुख्याने 'एक धरती एक परिवार' (One Earth-One Family) हे मध्यवर्ती असल्याने यातील प्रत्येक काव्य माणूस आणि मानवतेचा आवाज बनलेली आहे. 'नगारा' हे महाकाव्य वैश्विक मानवी मूल्यांचा प्रतिनिधित्व करणारे असून यातील आधुनिक वैश्विक प्रतिमा , भविष्यवेधी आशय आणि जीवनविद्या अंतर्मुख करणारी आहे. तेलंगणा येथील पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात कवी व विचारवंत सोमलाल नायक यासह देशभरातील विविध नामवंत साहित्यिक व विचारवंतांनी नगारामधील साहित्यप्रभा व मूल्यप्रज्ञेची पाठराखण केली आहे. तर गुजरात येथील प्रख्यात साहित्यिक डॉ. गोवर्धन बंजारा यांची प्रगल्भ अशी प्रस्तावना लाभली आहे.[]

Nagara Epic in Banjara Language

नगारा वाद्याची विशेषतः

[संपादन]

नगारा हा वादय विशेषतः राजपुतानाशी अधिक निकटचा मानला जातो. नगारा हे प्राचीन काळातील ऐतिहासिक महत्त्व असलेले युद्ध, आराधना आणि संकट प्रसंगी स्वकियाना जागृत करण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमुख भारतीय वाद्य आहे. अध्यात्म , शौर्य, पराक्रम, जीवन संगीत, वैभव, नवं स्फुर्ती व मानवता जागविण्याचे ते एक अमोघ प्रतिक मानले जाते. गोर राजपुतशैलीचा नगारा हा विविध प्रसंगी वेगळ्या धूनमध्ये वाजवीण्यामागे विविध कारणे देखील मानली जाते. नगारा हे वादय आनंदोत्सवाच्या निमित्ताने देखील वाजवीण्यात येतो. होळी आणि भजनाच्या प्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये देखील नगाराचा वापर होतो. ड्रममधील जोड्या वेगवेगळ्या असतात, ज्यामध्ये एकाचा आवाज पातळ असतो आणि दुसऱ्याचा आवाज जाड असतो. ते वाजवण्यासाठी लाकडी दांडक्याने मारून आवाज काढला जातो. खालच्या पृष्ठभागावरील नागडा धातूपासून बनलेला असतो. हे भारतातील अतिशय लोकप्रिय वाद्य आहे.

राजस्थान मधील नगारे.

महाकाव्य

संदर्भ

[संपादन]
  1. "'नगारा' : बंजारा भाषेतील मानवी अस्मितेचा वैश्विक हुंकार · इये मराठीचिये नगरी". इये मराठीचिये नगरी (इंग्रजी भाषेत). 2026-02-24. 2026-03-06 रोजी पाहिले.