जुलै ६
Appearance
जुलै ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८७ वा किंवा लीप वर्षात १८८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]- १२५३ - मिंडॉगास लिथुएनियाच्या राजेपदी.
चौदावे शतक
[संपादन]- १३४८ - युरोपमधील प्लेगच्या प्रादुर्भावानंतर पोप क्लेमेंट सहाव्याने पोपचा फतवा काढून ज्यू व्यक्तींना अभय दिले.
पंधरावे शतक
[संपादन]- १४८३ - रिचर्ड तिसरा इंग्लंडच्या राजेपदी.
- १४८४ - पोर्तुगालच्या शोधक दियोगो काओ कॉॅंगो नदीच्या मुखाशी पोचला.
सोळावे शतक
[संपादन]- १५३५ - राजा हेन्री आठव्याच्या इंग्लिश चर्चचे रोमन कॅथोलिक चर्चपासून विभाजन करण्याच्या निर्णयाशी सहमत न झाल्यामुळे सर थॉमस मोरला मृत्यूदंड.
- १५६० - इंग्लंड व स्कॉटलंडमध्या एडिनबर्गचा तह.
- १५७३ - कोर्दोबा, आर्जेन्टीना शहराची स्थापना.
सतरावे शतक
[संपादन]- १६३० - तीस वर्षाचे युद्ध - स्वीडिश सैनिक पोमरेनियात उतरले.
अठरावे शतक
[संपादन]- १७७७ - अमेरिकन क्रांती-टिकोंडेरोगाची लढाई - ब्रिटिश सैन्याने अमेरिकन सैन्याला फोर्ट टिकोंडेरोगा या किल्ल्यातून पळ काढण्यास भाग पाडले.
- १७८५ - अमेरिकेने डॉलरला चलन म्हणून मान्यता दिली. हे चलन पूर्णतः दशमान पद्धतीवर आधारित होते.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८८७ - अमेरिकन सैन्याने हवाईचा राजा डेव्हिड कालाकौआला संगीनीचे संविधान मान्य करण्यास भाग पाडले.
- १८९२ - दादाभाई नौरोजींची ब्रिटिश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.
विसावे शतक
[संपादन]- १९०५ - आल्फ्रेड डीकिन दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९०८ - रॉबर्ट पियरीची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
- १९३९ - ज्यूंचे शिरकाण - जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरलेसुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
- १९४४ - हार्टफर्ड, कनेटिकट येथे सर्कशीच्या तंबूला आग. १६८ ठार, ७०० जखमी.
- १९६४ - मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६६ - मलावी प्रजासत्ताक झाले.
- १९६७ - नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले.
- १९७५ - कोमोरोसला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९८८ - उत्तर समुद्रात खनिज तेल काढणाऱ्या पायपर आल्फा या जहाजवर स्फोट. १६७ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००३ - कॉर्सिकातील निवडणूकात नागरिकांनी फ्रांसपासून स्वातंत्र्य नाकारले.
- २००६ - भारत व तिबेटमधील नथुला खिंड व्यापारास खुली.
जन्म
[संपादन]- १७९६ - निकोलस पहिला, रशियाचा झार.
- १८०९ - अँड्र्यू सॅंडहॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
- १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.
- १८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
- १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते .
- १९०५ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.
१९२१ विनायक महादेव दांडेकर - भारतीय अर्थशास्त्रज्ञ तथा संख्याशास्त्रज्ञ
- १९२१ - नॅन्सी रेगन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनची पत्नी.
- १९२३ - वोयचेक जेरुझेल्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३५ - दलाई लामा, तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते.
- १९३७ - टोनी लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३९ - मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - जॉर्ज डब्ल्यू. बुश, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - सिल्व्हेस्टर स्टॅलोन, अमेरिकन अभिनेता.
- १९५८ - मार्क बेन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - मखाया न्तिनी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ११८९ - हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १२४९ - अलेक्झांडर दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १५५३ - एडवर्ड सहावा, इंग्लंडचा राजा.
- १७६२ - पीटर तिसरा, रशियाचा झार.
- १८३५ - जॉन मार्शल,अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश.
- १८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०१ - क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंगफर्स्ट, जर्मनीचा चान्सेलर.
- १९८६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी.
- २००२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.
- २००४ - थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ४ - जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - जुलै ८ - (जुलै महिना)