Jump to content

नॅन्सी रेगन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९४९-५० मध्ये डेव्हिस

नॅन्सी डेव्हिस रेगन तथा अ‍ॅन फ्रान्सिस रॉबिन्स ( /ˈrɡən/ ; ६ जुलै, १९२१ - ६ मार्च, २०१६) या एक अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि १९८१ ते १९८९ दरम्यान अमेरिकेच्या प्रथम महिला होत्या.

चित्र:Nancy Reagan - 1950.jpg
१९५० मध्ये डेव्हिस

रेगनचा जन्म न्यू यॉर्क शहरात झाला. तिचे आईवडील विभक्त झाल्यानंतर, ती सहा वर्षे मेरीलँडमध्ये आपल्या काकू आणि काकासोबत राहिली. तिच्या आईने १९२९ मध्ये पुनर्विवाह केल्यावर ती शिकागोला गेली. नंतर तिच्या आईच्या दुसऱ्या पतीने तिला नॅन्सी डेव्हिस नावाने दत्तक घेतले. डेव्हिस १९४० आणि १९५० च्या दशकात हॉलिवूड अभिनेत्री होत्या. त्यांनी द नेक्स्ट व्हॉइस यू हिअर... सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. १९५२मध्ये डेव्हिसने अभिनेता रॉनाल्ड रेगनशी लग्न केले. त्यावेळी रेगनला जेन वायमनपासून दोन मुले होती. नॅन्सी आणि रॉनाल्डला दोन मुले झाली.[१]

१९६४ मध्ये नॅन्सी आणि रोनाल्ड रेगन

१९६७-७५ दरम्यान रॉनाल्ड रेगन कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर असताना नॅन्सी तेथील प्रथम महिला होत्या. १९८० च्या निवडणुकांमध्ये रॉनाल्ड रेगन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर नॅन्सी अमेरिकेच्या प्रथम महिला झाल्या.

१९६७ मध्ये रेगन कुटुंब

रॉनाल्ड रेगन राष्ट्राध्यक्षपदावरून उतरल्यावर हे लॉस एंजेलसजवळील बेल एर येथे त्यांच्या घरी परतले. २०१६ मध्ये वयाच्या ९४व्या वर्षी कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरमुळे नॅन्सी रेगनचा मृत्यू झाला.

कॅलिफोर्नियाची प्रथम महिला म्हणून रेगन


संदर्भ[संपादन]

  1. ^ Percha, Julie (March 6, 2016). "Nancy Reagan, Former First Lady, Dies at 94". ABC News. March 6, 2016 रोजी पाहिले.