लक्ष्मीबाई केळकर
लक्ष्मीबाई केळकर कमल दाते (पूर्वाश्रमी) | |
---|---|
जन्म: | जुलै ६, १९०५ नागपूर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू: | नोव्हेंबर २७, १९७८ नागपूर, महाराष्ट्र, भारत |
चळवळ: | हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी |
संघटना: | राष्ट्रसेविका समिती |
धर्म: | हिंदू |
वडील: | भास्करराव सुधारक |
आई: | यशोदाबाई |
पती: | पुरुषोत्तम केळकर |
वंदनीय मावशी तथा लक्ष्मीबाई केळकर (माहेरच्या कमल दाते) या राष्ट्रसेविका समिती नावाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री-शाखेच्या संस्थापिका होत्या. समितीच्या वतीने त्यांनी पाळणाघरे, शिशुमंदिरे, आरोग्य केंद्रे, कीर्तन प्रवचनाचे कार्यक्रम इत्यादी उपक्रम सुरू केले. स्त्रियांना उत्तम गृहिणी होण्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने मुंबई येथे बकुळ देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहिणीविद्या या विषयावर तीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला.[१] त्यांचे ध्येय अखिल हिंदू महिलांचे संघटन करून तेजस्वी राष्ट्र निर्माण करणे. तसेच राष्ट्रमाता जिजाबाई या मातृत्वासाठी, झाशीची राणी या नेतृत्वासाठी आणि अहिल्याबाई होळकर या कर्तृत्वासाठी आदर्श होत्या आणि आजही आहेत.[२]
अधिक माहिती साठी बघा https://www.mahamtb.com/Encyc/2020/1/1/Article-on-rashtra-sevika-samiti.html
बाह्य दुवे
[संपादन]- वंदनीय मावशीबाईंचे चरित्र Archived 2007-07-16 at the Wayback Machine.
संदर्भ
[संपादन]- ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तृत्त्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १२७. ISBN 978-81-7425-310-1.
- ^ "प्रेरणा : राष्ट्र सेविका समितीची". www.mahamtb.com. 2022-06-29 रोजी पाहिले.