गेऑर्ग झिमॉन ओम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गेऑर्ग झिमॉन ओम

गेऑर्ग झिमॉन ओम[१] (आंग्लीकरणातून उद्भवलेला मराठी नामभेद: जॉर्ज सायमन ओह्म ; जर्मन: Georg Simon Ohm) (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे.

ओमचा नियम[संपादन]

संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते. वाहकाची भौतिक स्थिती कायम असताना (तापमान,क्षेत्रफळ) वाहकातून वाहणारी विद्युत धारा ही त्या वाहकाच्या दोन तोकांमधील विभवांत राशी समनुपती असते. =V

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "नावाचा जर्मन भाषेनुसार उच्चार" (बहुभाषी मजकूर). फॉर्वो.कॉम. ७ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.