Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१
इंग्लंड
भारत
तारीख ४ ऑगस्ट – ६ सप्टेंबर २०२१, १-५ जुलै २०२२
संघनायक ज्यो रूट (१ली-४थी कसोटी)
बेन स्टोक्स (५वी कसोटी)
विराट कोहली (१ली-४थी कसोटी)
जसप्रीत बुमराह (५वी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा ज्यो रूट (७३७) रोहित शर्मा (३६८)
सर्वाधिक बळी ओलिए रॉबिन्सन (२१) जसप्रीत बुमराह (२३)
मालिकावीर ज्यो रूट (इंग्लंड) आणि जसप्रीत बुमराह (भारत)

भारत क्रिकेट संघाने पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळविण्यात आली. भारताने इंग्लंड मालिकेपूर्वी जून २०२१ मध्ये न्यू झीलंड विरुद्ध साउथहॅंप्टनमध्ये २०१९-२१ कसोटी विश्वचषकाचा सामना खेळला. ज्यात न्यू झीलंडने भारताला ८ गडी राखून हरविले होते.

२०१९-२१ कसोटी विश्वचषकाचा अंतिम सामना आणि इंग्लंड दौरा सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत शिखर धवनच्या नेतृत्वात भारताच्या दुय्यम संघाने श्रीलंकेचा दौरा केला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताने दोन सराव सामने खेळले.

पहिली कसोटी सातत्याने पावसाचा व्यत्यत आल्याने अनिर्णित सुटली. भारताने दुसरी कसोटी १५१ धावांनी जिंकली आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे तिसरी कसोटी जिंकली. तिसऱ्या कसोटीत भारताचा डावाने पराभव झाला. चौथ्या कसोटीत अनपेक्षितरित्या भारताने १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत २-१ ने पुन्हा आघाडी घेतली. सन १९८६ नंतर भारताने इंग्लंडमध्ये एका मालिकेत प्रथमच दोन कसोटी सामने जिंकले. चौथ्या कसोटी दरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्या दोघांना लागलीच विलगीकरण कक्षात हलविण्यात आले. पाचवी कसोटी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी भारताच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. जरी सर्व खेळाडूंच्या चाचण्या नकारात्मक आल्या तरी पाचवी कसोटी सुरू व्हायच्या फक्त तीन तास आधी सामना रद्द झाल्याचे ईसीबीकडून जाहिर करण्यात आले.

ईसीबीच्या अधिकृत संकेतस्थळावरील बातमीनुसार भारताने पाचवा सामना त्याग करून इंग्लंडला बहाल केला असे नमूद करण्यात आले होते. याचा अर्थ मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. परंतु भारताने यावर आक्षेप घेत सामन्याचा निकाल काय लावावा यासाठी आयसीसीच्या तंटा निर्मुलन समितीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेल्या एका वृत्तानुसार अशीही चर्चा चालू होती की शेष कसोटी सामना हा पुढील वर्षी खेळविण्यात यावा आणि ही मालिका तोपर्यंत स्थगित करण्यात यावी. आयसीसीच्या तंटा निर्मुलन समितीने जर भारताने सामना त्याग करून बहाल केला असा निर्णय दिला तर ५ सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल आणि सामना रद्द करावा लागला असा निर्णय झाला तर भारत मालिका २-१ ने जिंकेल.

जानेवारी २०२२ मध्ये इसीबीने जाहीर केले की जुलै २०२२ मध्ये भारताच्या मर्यादित षटकांच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधी पाचवी कसोटी खेळविण्यात येईल. पाचवी कसोटी १ जुलै २०२२ रोजी एजबॅस्टन येथे खेळविण्यात आली. भारताने पहिल्या डावात ऋषभ पंतच्या शतकाच्या मदतीने ४१६ धावा केल्या. जसप्रीत बुमराह याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकामध्ये तब्बल ३५ धावा करत कसोटीत एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा २८ धावांचा आधीचा विक्रम मोडला. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर संपुष्टात आला. भारताने इंग्लंडला ३७८ धावांचे लक्ष्य दिले. जॉनी बेअरस्टो आणि माजी कर्णधार ज्यो रूट यांच्या नाबाद २६९ धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने पाचवी कसोटी ७ गडी राखून जिंकली. हा इंग्लंडचा कसोटीतील सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग होता. पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडचा ज्यो रूट आणि भारताचा जसप्रीत बुमराह या दोघांना मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सराव सामने

[संपादन]

तीन-दिवसीय प्रथम-श्रेणी सामना:काउंटी निवड XI वि भारतीय

[संपादन]
२०-२२ जुलै २०२१
धावफलक
वि
३११ (९३ षटके)
लोकेश राहुल १०१ (१५०)
क्रेग माईल्स ४/४५ (१७.१ षटके)
२२० (८२.३ षटके)
हसीब हमीद ११२ (२४६)
उमेश यादव ३/२२ (१५ षटके)
१९२/३घो (५५ षटके)
रविंद्र जडेजा ५१ (७७)
जॅक कार्सन २/६४ (२२ षटके)
३१/० (१५.५ षटके)
जेक लिबी १७* (४८)
सामना अनिर्णित
रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट
पंच: हसन अदनान (इं) आणि पॉल पोलार्ड (इं)
  • नाणेफेक: भारतीय, फलंदाजी.
  • जेम्स रिऊ (काउंटी निवड XI) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
मुख्य पान: पटौदी चषक

१ली कसोटी

[संपादन]
वि
१८३ (६५.४ षटके)
ज्यो रूट ६४ (१०८)
जसप्रीत बुमराह ४/४६ (२०.४ षटके)
२७८ (८४.५ षटके)
लोकेश राहुल ८४ (२१४)
ओलिए रॉबिन्सन ५/८५ (२६.५ षटके)
३०३ (८५.५ षटके)
ज्यो रूट १०९ (१७२)
जसप्रीत बुमराह ५/६४ (१९ षटके)
५२/१ (१४ षटके)
लोकेश राहुल २६ (३८)
स्टुअर्ट ब्रॉड १/१८ (५ षटके)
सामना अनिर्णित.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: ज्यो रूट (इंग्लंड)


२री कसोटी

[संपादन]
वि
३६४ (१२६.१ षटके)
लोकेश राहुल १२९ (२५०)
जेम्स अँडरसन ५/६२ (२९ षटके)
३९१ (१२८ षटके)
ज्यो रूट १८०* (३२१)
मोहम्मद सिराज ४/९४ (३० षटके)
२९८/८घो (१०९.३ षटके)
अजिंक्य रहाणे ६१ (१४६)
मार्क वूड ३/५१ (१८ षटके)
१२० (५१.५ षटके)
ज्यो रूट ३३ (६०)
मोहम्मद सिराज ४/३२ (१०.५ षटके)
भारत १५१ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: लोकेश राहुल (भारत)


३री कसोटी

[संपादन]
वि
७८ (४०.४ षटके)
रोहित शर्मा १९ (१०५)
जेम्स अँडरसन ३/६ (८ षटके)
४३२ (१३२.२ षटके)
ज्यो रूट १२१ (१६५)
मोहम्मद शमी ४/९५ (२८ षटके)
२७८ (९९.३ षटके)
चेतेश्वर पुजारा ९१ (१८९)
ओलिए रॉबिन्सन ५/६५ (२६ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ७६ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: ओलिए रॉबिन्सन (इंग्लंड)


४थी कसोटी

[संपादन]
वि
१९१ (६१.३ षटके)
शार्दुल ठाकूर ५७ (३६)
क्रिस वोक्स ४/५५ (१५ षटके)
२९० (८४ षटके)
ओलिए पोप ८१ (१५९)
उमेश यादव ३/७६ (१९ षटके)
४६६ (१४८.२ षटके)
रोहित शर्मा १२७ (२५६)
क्रिस वोक्स ३/८३ (३२ षटके)
२१० (९२.२ षटके)
हसीब हमीद ६३ (१९३)
उमेश यादव ३/६० (१८.२ षटके)
भारत १५७ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
पंच: ॲलेक्स व्हार्फ (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)


५वी कसोटी

[संपादन]
वि
४१६ (८४.५ षटके)
ऋषभ पंत १४६ (१११)
जेम्स अँडरसन ५/६० (२१.५ षटके)
२८४ (६१.३ षटके)
जॉनी बेअरस्टो १०६ (१४०)
मोहम्मद सिराज ४/६६ (११.३ षटके)
२४५ (८१.५ षटके)
चेतेश्वर पुजारा ६६ (१६८)
बेन स्टोक्स ४/३३ (११.५ षटके)
३७८/३ (७६.४ षटके‌)
ज्यो रूट १४२* (१७३)
जसप्रीत बुमराह २/७४ (१७ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: अलीम दर (पाक) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: जॉनी बेअरस्टो (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • सदर पाचवी पुर्नियोजीत कसोटी जुलै २०२२ मध्ये इंग्लंडमध्ये भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेआधी झाली.
  • २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : इंग्लंड - १२, भारत - -२[n २].


नोंदी

[संपादन]
  1. ^ पहिल्या कसोटीमध्ये धीम्या गोलंदाजीसाठी दोन्ही संघांचे कसोटी विश्वचषकामधून प्रत्येकी २ गुण कापण्यात आले.
  2. ^ पाचव्या कसोटीत धीम्या गोलंदाजीसाठी भारताचे दोन गुण कापण्यात आले.