Jump to content

२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
व्यवस्थापक रवांडा क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान रवांडा रवांडा
विजेते केन्याचा ध्वज केन्या (४ वेळा)
सहभाग
सामने १४
सर्वात जास्त धावा नामिबिया सुने विट्ट्मन (१६७)
सर्वात जास्त बळी केन्या साराह वेटोटो (१७)
२०१९ (आधी) (नंतर) २०२२

२०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ६-१२ जून २०२१ दरम्यान रवांडामध्ये आयोजित केली गेली होती. सन १९९४ मध्ये तुत्सीविरोधात झालेल्या नरसंहाराच्या पीडितांच्या स्मरणार्थ सन २०१४ मध्ये प्रथम आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्विबुका स्पर्धेची ही सातवी आवृत्ती आहे. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आले. मागील स्पर्धेचे विजेते टांझानियाने या वेळेस स्पर्धेत भाग घेतला नाही.

यजमान रवांडासह केन्या, नामिबिया, नायजेरिया आणि बोत्स्वाना या पाच देशांनी भाग घेतला. योजनेनुसार युगांडाचा संघ सुद्धा यावेळेस स्पर्धेत भाग घेणार होता परंतु युगांडामध्ये कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने युगांडाने स्पर्धेतून माघार घेतली. नामिबिया, नायजेरिया आणि बोत्स्वाना या देशांनी प्रथमच या स्पर्धेत भाग घेतला.

१२ जून २०२१ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात साराह वेटोटोच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर केन्याने नामिबियावर ७ गडी राखत विजय मिळवत क्विबुका चषक चौथ्यांदा जिंकला. तर यजमान रवांडाने नायजेरियाला हरवत तिसरे स्थान पटकावले. नामिबियाच्या सुने विट्ट्मन हिने स्पर्धेत सर्वाधिक १६७ धावा केल्या. केन्याच्या साराह वेटोटो हिने स्पर्धेत सर्वाधिक १७ गडी बाद केले.

स्पर्धा प्रकार

[संपादन]

प्रत्येक संघाने विरुद्ध संघांशी एक सामना खेळला. गट फेरीत अव्वल चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. यजमान रवांडासह केन्या, नामिबिया आणि नायजेरिया हे चार संघ उपांत्य फेरीस पात्र ठरले. बोत्स्वाना संघ चारही सामने हरत स्पर्धेतून बाद झाला.

गुणफलक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
नामिबियाचा ध्वज नामिबिया +२.६६२ बाद फेरीसाठी पात्र
केन्याचा ध्वज केन्या +०.९५७
रवांडाचा ध्वज रवांडा +०.०९५
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया -०.९८०
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना -३.२६८ स्पर्धेतून बाद

गट फेरी

[संपादन]
६ जून २०२१
०९:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
२९ (१०.१ षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
३१/२ (५.२ षटके)
बोट्सगो मिपेडी ५ (११)
अ‍ॅलिस इकुझवे ३/५ (३ षटके)
साराह उवेरा १०* (१२)
अमंतल मॉकगोत्ले १/८ (२ षटके)
रवांडा महिला ८ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: हबीब एनेसी (ना) आणि एरिक हिरवा (र)
सामनावीर: अ‍ॅलिस इकुझवे (रवांडा)
  • नाणेफेक : रवांडा, क्षेत्ररक्षण.
  • रवांडा आणि बोत्स्वाना या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रवांडामध्ये बोत्स्वानाने पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • रवांडा महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बोत्स्वाना महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • बेलीज मुरेकाटे (र), जॅकलीन केंग आणि टेबोगो मोटलभाफूती (बो) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

६ जून २०२१
१३:५०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
५२/८ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
५६/२ (९.१ षटके)
जॉय एफोसा ७* (२२)
व्हिक्टोरिया हमुनेयेला ४/८ (४ षटके)
अरस्ता डायरेगार्ड २६* (२७)
जॉय एफोसा २/१७ (३ षटके)
नामिबिया महिला ८ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: इटंगिशाका ऑलिव्हर (ना) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: व्हिक्टोरिया हमुनेयेला (नामिबिया)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, फलंदाजी.
  • नायजेरिया आणि नामिबिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नामिबिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नायजेरिया महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • रवांडामध्ये नामिबियाने पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

७ जून २०२१
०९:३०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
६८/९ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
७१/१ (७.३ षटके)
फ्लोरेंस सामनिका १८ (३१)
सारा वेटोटो ५/१२ (४ षटके)
क्विंटर आबेल ३५* (१९)
ओन्नीइल किटसेमांग १/२१ (२ षटके)
केन्या महिला ९ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक हिरवा (र) आणि जॅक्सन नाझायेंगा (र)
सामनावीर: सारा वेटोटो (केन्या)
  • नाणेफेक : केन्या महिला, क्षेत्ररक्षण.
  • रवांडामध्ये केन्याने पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • मेलविन इदामबो आणि जेन ओटिएनो (के) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

७ जून २०२१
१३:५०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१०१/६ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
५८/८ (२० षटके)
अद्री व्हान देर मर्व २९ (२३)
सिफा इंगबायर ३/१० (३ षटके)
हेन्रिएट इशिमवे १२ (२६)
विल्का मवाटीले २/७ (४ षटके)
नामिबिया महिला ४३ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: हबीब एनेसी (ना) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: केलीन ग्रीन (नामिबिया)
  • नाणेफेक : रवांडा महिला, क्षेत्ररक्षण.
  • रवांडा आणि नामिबिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नामिबिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात रवांडा महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

८ जून २०२१
०९:३०
धावफलक
नायजेरिया Flag of नायजेरिया
१०८/५ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१०९/२ (१८.१ षटके)
ब्लेसिंग एटीम ३४ (३३)
मार्गरेट नगोचे २/२७ (४ षटके)
क्विंटर आबेल ४० (५३)
फेवर एसीज्बे १/१९ (४ षटके)
केन्या महिला ८ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: इटंगिशाका ऑलिव्हर (ना) आणि जॅक्सन नाझायेंगा (र)
सामनावीर: क्विंटर आबेल (केन्या)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, फलंदाजी.
  • केन्या आणि नायजेरिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • केन्या महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नायजेरिया महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • रुथ अचंदो (के) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

८ जून २०२१
१३:५०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१५५/१ (२० षटके)
वि
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
९०/७ (२० षटके)
सुने विट्ट्मन ९३* (६०)
शमीला मोसवे २९ (२२)
व्हिक्टोरिया हमुनेयेला २/११ (४ षटके)
नामिबिया महिला ६५ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक हिरवा (र) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: सुने विट्ट्मन (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया महिला, फलंदाजी.
  • कॉलिन मोकीबेलो (बो) आणि मर्झर्ली गोरेसेस (ना) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

९ जून २०२१
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
११०/६ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
७४ (१४.२ षटके)
सुने विट्ट्मन ३९ (२६)
साराह वेटोटो ३/१३ (४ षटके)
क्विंटर आबेल १९ (१७)
व्हिक्टोरिया हमुनेयेला ४/१५ (४ षटके)
नामिबिया महिला ३६ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: हबीब एनेसी (ना) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: व्हिक्टोरिया हमुनेयेला (नामिबिया)
  • नाणेफेक : केन्या महिला, क्षेत्ररक्षण.

९ जून २०२१
१३:५०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
१०८/७ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१०२/८ (२० षटके)
हेन्रिएट इशिमवे २४ (२३)
ब्लेसिंग एटीम २/२८ (४ षटके)
सालोम संडे १७ (१७)
हेन्रिएट इशिमवे २/५ (३ षटके)
रवांडा महिला ६ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: जॅक्सन नाझायेंगा (र) आणि इटंगिशाका ऑलिव्हर (ना)
सामनावीर: हेन्रिएट इशिमवे (रवांडा)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • मिरॅकल इमीमोले (ना) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१० जून २०२१
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१२९/३ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
१०४/७ (२० षटके)
क्विंटर आबेल ४७* (५५)
हेन्रिएट इशिमवे ३/२२ (४ षटके)
मेरी बिमेनिमाना ३१ (३७)
लव्हेंडा इदामबो २/१७ (३ षटके)
केन्या महिला २५ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: हबीब एनेसी (ना) आणि इटंगिशाका ऑलिव्हर (ना)
सामनावीर: क्विंटर आबेल (केन्या)
  • नाणेफेक : केन्या महिला, फलंदाजी.
  • रवांडा आणि केन्या या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • केन्या महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात रवांडा महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१० जून २०२१
१३:५०
धावफलक
बोत्स्वाना Flag of बोत्स्वाना
१०६/८ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१०७/७ (१९.५ षटके)
अमंतल मॉकगोत्ले ३६* (२८)
मेरी डेसमंड २/१३ (४ षटके)
समंथा अगझुमा २३ (२९)
जॅकलीन केंग ३/१८ (४ षटके)
नायजेरिया महिला ३ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक हिरवा (र) आणि जॅक्सन नाझायेंगा (र)
सामनावीर: ब्लेसिंग एटीम (ना)
  • नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • बोत्स्वाना आणि नायजेरिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नायजेरिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बोत्स्वाना महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


बाद फेरी

[संपादन]

उपांत्य फेरी

[संपादन]
१ला उपांत्य सामना
११ जून २०२१
०९:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१५६/२ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
६५/८ (२० षटके)
यसमीन खान ७८* (५३)
मेरी डेसमंड १/२० (४ षटके)
एस्थर सँडी १३ (१७)
सिल्व्हिया शिहेपो २/१२ (४ षटके)
नामिबिया महिला ९१ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगु (र) आणि हबीब एनेसी (ना)
सामनावीर: यसमीन खान (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया महिला, फलंदाजी.

२रा उपांत्य सामना
११ जून २०२१
१३:५०
धावफलक
केन्या Flag of केन्या
११७/६ (२० षटके)
वि
रवांडाचा ध्वज रवांडा
६५ (१६.५ षटके‌)
मार्गरेट नगोचे ३८ (४६)
मार्गूरेट व्हुमिलिया २/१५ (४ षटके)
डेल्फीन मुकरुरंगवा १६ (३०)
साराह वेटोटो २/५ (२.५ षटके)
केन्या महिला ५२ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: इटंगिशाका ऑलिव्हर (र) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: साराह वेटोटो (केन्या)
  • नाणेफेक : केन्या महिला, फलंदाजी.


३ऱ्या स्थानाकरता सामना

[संपादन]
१२ जून २०२१
०९:३०
धावफलक
रवांडा Flag of रवांडा
११२/५ (२० षटके)
वि
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१०४/६ (२० षटके)
गिसेल ईशिमवे ३९ (४०)
रॅचेल सॅमसन १/१४ (३ षटके)
केहिंडे अब्दुलकुद्री ३१ (५०)
मेरी बिमेनिमाना २/२१ (४ षटके)
रवांडा महिला ८ धावांनी विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: एरिक दुसाबेमुंगु (र) आणि जॅक्सन नाझायेंगा (र)
सामनावीर: मेरी बिमेनिमाना (रवांडा)
  • नाणेफेक : रवांडा महिला, फलंदाजी.
  • ओसेंदे ओमंकोबियो (ना) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


अंतिम सामना

[संपादन]
१२ जून २०२१
१३:५०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
६९ (१५.५ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
७२/३ (११ षटके)
सिल्व्हिया शिहेपो १६* (२१)
साराह वेटोटो ६/१६ (३.५ षटके)
मार्गरेट नगोचे ३७* (३०)
व्हिक्टोरिया हमुनेला १/४ (१ षटक)
केन्या महिला ७ गडी राखून विजयी.
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली
पंच: हबीब एनेसी (ना) आणि विकी प्रजापती (र)
सामनावीर: साराह वेटोटो (केन्या)
  • नाणेफेक : नामिबिया महिला, फलंदाजी.