Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२१
आयर्लंड
दक्षिण आफ्रिका
तारीख ११ – २४ जुलै २०२१
संघनायक अँड्रु बल्बिर्नी टेंबा बवुमा
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा अँड्रु बल्बिर्नी (१७४) जानेमन मलान (२६१)
सर्वाधिक बळी जोशुआ लिटल (४) अँडिल फेहलुक्वायो (६)
मालिकावीर जानेमन मलान (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा अँड्रु बल्बिर्नी (५५) डेव्हिड मिलर (१३९)
सर्वाधिक बळी मार्क अडायर (५) तबरैझ शम्सी (७)
मालिकावीर डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान आयर्लंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. दौरा सुरू व्हायच्या आधी आयर्लंड क्रिकेट बोर्डाने पहिल्या आणि तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्याची तारीख एक दिवस मागे घेतल्याची घोषणा केली. २००७ साली बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध १ एकदिवसीय सामना खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथमच आयर्लंडचा दौरा केला.

एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या डावात पावसाच्या अडथळ्यामुळे फक्त ४०.२ षटकांचाच खेळ होऊन उर्वरीत सामना रद्द करावा लागला. दुसरा सामना आयर्लंडने जिंकत दक्षिण आफ्रिकेवर पहिला वहिला ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय मिळवून १-० ने मालिकेत आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने तिसर एकदिवसीय सामन्यात ७० धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत राखली. दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
११ जुलै २०२१
१०:४५
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१९५/४ (४०.२ षटके)
वि
सामन्याचा निकाल लागला नाही.
द व्हिलेज, मालाहाईड
पंच: रोलँड ब्लॅक (आ) आणि ॲलन नील (आ)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • आयर्लंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे ४०.२ षटकांनंतर उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : आयर्लंड - ५, दक्षिण आफ्रिका - ५.


२रा सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
१३ जुलै २०२१
१०:४५
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२९०/५ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४७ (४८.३ षटके)
आयर्लंड ४३ धावांनी विजयी.
द व्हिलेज, मालाहाईड
पंच: रोलँड ब्लॅक (आ) आणि मार्क हॉथॉर्न (आ)
सामनावीर: अँड्रु बल्बिर्नी (आयर्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • हा आयर्लंडचा दक्षिण आफ्रिकेवरील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील पहिला वहिला विजय.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : आयर्लंड - १०, दक्षिण आफ्रिका - ०.


३रा सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
१६ जुलै २०२१
१०:४५
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३४६/४ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२७६ (४७.१ षटके)
जानेमन मलान १७७* (१६९‌)
जोशुआ लिटल २/५३ (९ षटके)
सिमी सिंग १००* (९१)
तबरैझ शम्सी ३/४६ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका ७० धावांनी विजयी.
द व्हिलेज, मालाहाईड
पंच: रोलँड ब्लॅक (आ) आणि पॉल रेनॉल्ड्स (इं)
सामनावीर: जानेमन मलान (दक्षिण आफ्रिका)


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१९ जुलै २०२१
१६:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६५/७ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३२/९ (२० षटके)
एडन मार्करम ३९ (३०)
मार्क अडायर ३/३९ (४ षटके)
हॅरी टेक्टर ३६ (३४)
तबरैझ शम्सी ४/२७ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ३३ धावांनी विजयी.
द व्हिलेज, मालाहाईड
पंच: मार्क हॉथॉर्न (आ) आणि ॲलन नील (आ)
सामनावीर: तबरैझ शम्सी (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
  • आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमधला पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • दक्षिण आफ्रिकेने आयर्लंड मध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


२रा सामना

[संपादन]
२२ जुलै २०२१
१६:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१५९/७ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११७ (१९.३ षटके)
डेव्हिड मिलर ७५* (४४ षटके)
पॉल स्टर्लिंग २/१२ (३ षटके)
शेन गेटकॅट २४ (१८)
तबरैझ शम्सी ३/१४ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ४२ धावांनी विजयी.
स्टोरमोंट, बेलफास्ट
पंच: रोलँड ब्लॅक (आ) आणि पॉल रेनॉल्ड्स (आ)
सामनावीर: डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.


३रा सामना

[संपादन]
२४ जुलै २०२१
१६:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१८९/२ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४०/९ (२० षटके)
टेंबा बवुमा ७२ (५१)
सिमी सिंग १/२७ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ४९ धावांनी विजयी.
स्टोरमोंट, बेलफास्ट
पंच: मार्क हॉथॉर्न (आ) आणि ॲलन नील (आ)
सामनावीर: टेंबा बवुमा (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • बेन व्हाइट (आ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे आयर्लंड दौरे