ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१ | |||||
बांगलादेश | ऑस्ट्रेलिया | ||||
तारीख | ३ – ९ ऑगस्ट २०२१ | ||||
संघनायक | महमुद्दुला | मॅथ्यू वेड | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शाकिब अल हसन (११४) | मिचेल मार्श (१५६) | |||
सर्वाधिक बळी | नसुम अहमद (८) | जॉश हेझलवूड (८) | |||
मालिकावीर | शाकिब अल हसन (बांगलादेश) |
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२१ दरम्यान बांगलादेशचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने २०१७ नंतर पहिल्यांदाच बांगलादेशचा दौरा केला. ही दोन देशांमधील पहिली वहिली ट्वेंटी२० द्विपक्षीय मालिका होती. ठरलेल्या वेळापत्रकानुसार मालिका फक्त तीन सामन्यांची होती. परंतु नंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केलेल्या विनंतीनुसार ऑस्ट्रेलियाने आणखी दोन सामने खेळण्यास अनुमती दर्शवली. त्यानुसार पाच ट्वेंटी२० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्व सामने राजधानी ढाका मधील शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळवण्यात आले.
पहिला सामना २३ धावांनी जिंकत बांगलादेशने मालिकेत आघाडी घेतली. बांगलादेशने पहिल्या सामन्यात मिळवलेला विजय हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी२० सामन्यातील पहिला वहिला विजय होता. बांगलादेशने दुसरा आणि तिसरा सामना जिंकत मालिकेत ३-० ने अभेद्य आघाडी घेतली. तिसऱ्या सामन्यातील विजयाबरोबरच बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर पहिला वहिला मालिका विजय संपादन केला. बांगलादेशने पाच सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ४-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियाचा हा सलग पाचवा ट्वेंटी२० मालिका पराभव होता.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
३रा सामना
[संपादन]
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- ट्वेंटी२० मधील ऑस्ट्रेलियाची सर्वात निचांकी धावसंख्या.