१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका
Appearance
१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
संघ | ||||||||
इंग्लंड | ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका | ||||||
संघनायक | ||||||||
सी.बी. फ्राय | सिड ग्रेगरी | फ्रँक मिचेल लुई टँक्रेड | ||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||
जॅक हॉब्स (३९१) | वॉरेन बार्ड्सली (३९२) | डेव्ह नर्स (२२०) | ||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||
सिडनी बार्न्स (३९) | बिल व्हिटी (२५) | सिड पेगलर (२९) |
१९१२ इंग्लंड तिरंगी मालिका ही एक क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये मे-ऑगस्ट १९१२ दरम्यान झाली. तत्कालिन ३ कसोटी देश अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनी १९०९ मध्ये एकत्र येत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेची स्थापना केली. त्यावेळी झालेल्या ठरावात दर चार वर्षांनी कसोटी तिरंगी मालिका भरविण्याचा प्रस्ताव स्वीकारला गेला. १९१२ मध्ये प्रथम इंग्लंडमध्ये ही स्पर्धा भरवली गेली. परंतु, आर्थिक पाठबळ न मिळाल्यामुळे पुन्हा ही स्पर्धा कधीच भरवण्यात आली नाही. इ.स. २०१९ मध्ये म्हणजेच १०७ वर्षानंतर आयसीसीने कसोटी विश्वचषकाची घोषणा केली.
तीन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध ३ कसोटी सामने खेळले. इंग्लंडने गुणफलकात अव्वल स्थान मिळवत स्पर्धा आपल्या नावावर केली. या मालिकेतील ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मधील सामने हे ॲशेस अंतर्गत देखील धरण्यात आले.
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण |
---|---|---|---|---|---|---|
इंग्लंड | ६ | ४ | ० | ० | २ | ४ |
ऑस्ट्रेलिया | ६ | २ | १ | ० | ३ | २ |
दक्षिण आफ्रिका | ६ | ० | ५ | ० | १ | ० |
कसोटी तिरंगी मालिका सामने
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२७-२८ मे १९१२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- क्लॉड जेनिंग्स, सिड एमरी, बार्लो कार्कीक (ऑ), जेराल्ड हार्टिगन, हर्बी टेलर, रोलॅंड बोमॉंट आणि टॉमी वॉर्ड (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- फ्रँक मिचेल याने आधी इंग्लंडकडून कसोटी खेळल्यानंतर या कसोटीतून दक्षिण आफ्रिकेतर्फे कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]१०-१२ जून १९१२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- क्लॉड कार्टर (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- हॅरी डीन (इं) आणि डेव्हिड स्मिथ (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- १९१२ ॲशेसअंतर्गत गणली गेलेली कसोटी.