वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८४ दरम्यान पाच कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ५-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली. इंग्लंडला इंग्लंडमध्येच पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाचही कसोटी वेस्ट इंडीजने जिंकल्या. असा पराक्रम करणारा वेस्ट इंडीजचा हा पहिला संघ ठरला.