Jump to content

२०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक युरोप पात्रता
तारीख २६ – ३० ऑगस्ट २०२१
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान स्पेन स्पेन
विजेते स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
सहभाग
सामने १०
सर्वात जास्त धावा आयर्लंडचे प्रजासत्ताक गॅबी लुईस (१४५)
सर्वात जास्त बळी नेदरलँड्स फ्रेडरिक ओव्हरडिक (८)
२०१९ (आधी)

२०२१ महिला ट्वेंटी२० विश्वचषक युरोप पात्रता ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २६-३० ऑगस्ट २०२१ दरम्यान स्पेनमध्ये आयोजित केली गेली होती. २०२३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०२३ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक या स्पर्धेच्या पात्रतेचा एक भाग सदर स्पर्धा होती. आयसीसीच्या युरोप भागासाठी सदर स्पर्धा खेळविण्यात आली. एकूण सहा देशांनी यात भाग घेतला. ठरल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेचे आयोजन स्कॉटलंड मध्ये होणार होते परंतु तिथे कोरोनाव्हायरसच्या संक्रमणामुळे स्पर्धा स्पेनला स्थलांतरित केली गेली. फ्रान्स आणि तुर्कस्तान या दोन देशांनी आयसीसी स्पर्धांमध्ये पदार्पण केले. परंतु स्पर्धा सुरू होण्याच्या आधी तुर्की क्रीडा मंत्रालयाकडून कोरोनाव्हायरसमुळे स्पर्धेत भाग घेण्यासाठी परवानगी नाकारली गेल्यामुळे ऐनवेळी तुर्कस्तानने स्पर्धेतून माघार घेतली.

स्पर्धा गट फेरी प्रकारात खेळवली गेली. सर्व संघांनी इतर प्रतिस्पर्धी संघांबरोबर एक सामना खेळला. गट फेरीचे सामने संपल्यानंतर. विजेता संघ २०२२ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतेसाठी पात्र ठरला. सर्व ४ सामन्यांमध्ये अपराजित राहत स्कॉटलंड पात्रतेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरला. आश्चर्य म्हणजे आयसीसीचा संपूर्ण सदस्य असलेला आयर्लंडला पुढील टप्पा गाठण्यास अपयश आले. आयर्लंड अजूनही महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत उच्च स्थानावर असलेल्या गैर-पात्र संघासाठी उपलब्ध असलेल्या स्थानाद्वारे पुढे जाऊ शकतो.

सहभागी देश[संपादन]

सामनाधिकारी[संपादन]

 • पंच :

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २.८४२ पुढील पात्रता फेरीसाठी बढती
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ३.७४३
Flag of the Netherlands नेदरलँड्स ०.८७०
जर्मनीचा ध्वज जर्मनी -३.१८८
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स -५.६४७

सामने[संपादन]

१६ ऑगस्ट २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे वेळापत्रक जारी करण्यात आले.

२६ ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
९८/५ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
९९/४ (१६.३ षटके)
रॉबिन रियकी ४३ (४७)
केटी मॅकगिल १/११ (२ षटके)
सॅरा ब्राइस ४६ (३६)
कॅरोलिन डि लँग ४/१७ (४ षटके)
स्कॉटलंड महिला ६ गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: सॅरा ब्राइस (स्कॉटलंड)
 • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.

२६ ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१९६/२ (२० षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
३२/३ (२० षटके)
गॅबी लुईस १०५* (६०)
बियांका लोच १/२१ (३ षटके)
क्रिस्टिना गॉफ १४ (५८)
एमायर रिचर्डसन २/५ (३ षटके)
आयर्लंड महिला १६४ धावांनी विजयी.
ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा
पंच: ॲलेक्स डॉवडल्स (स्कॉ) आणि अदनान खान (स्पे)
सामनावीर: गॅबी लुईस (आयर्लंड)
 • नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
 • आयर्लंड आणि जर्मनी या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • आयर्लंडने स्पेन मध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • आयर्लंडचा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनीवर मिळवलेला पहिला विजय.

२६ ऑगस्ट २०२१
१५:३०
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
३३ (१७.३ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
३४/१ (३.३ षटके)
पॉपी मॅकगोईन ८ (२१)
फ्रेडरिक ओव्हरडिक ७/३ (४ षटके)
रॉबिन रियकी २१* (१२)
थिया ग्रॅहाम १/११ (२ षटके)
नेदरलँड्स महिला ९ गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा
पंच: ॲलेक्स डॉवडल्स (स्कॉ) आणि मार्क जेम्ससन (ज)
सामनावीर: फ्रेडरिक ओव्हरडिक (नेदरलँड्स)
 • नाणेफेक : फ्रान्स महिला, फलंदाजी.
 • नेदरलँड्स आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • फ्रान्सने स्पेन मध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • नेदरलँड्सचा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फ्रान्सवर मिळवलेला पहिला विजय.

२७ ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
४५ (१५ षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
४६/१ (९.३ षटके)
थिया ग्रॅहाम १२ (२५)
बियांका लोच ३/१२ (४ षटके)
अनुराधा दोडबल्लापूर २२* (४०)
थिया ग्रॅहाम १/१२ (३ षटके)
जर्मनी महिला ९ गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा
पंच: अदनान खान (स्पे) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: बियांका लोच (जर्मनी)
 • नाणेफेक : फ्रान्स महिला, फलंदाजी.
 • लारा अरामास (फ्रा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२७ ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
८९/९ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
९२/५ (१९ षटके)
स्कॉटलंड महिला ५ गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि अड्रायन व्हान देर द्रीस (ने)
सामनावीर: केथरिन ब्रेस (स्कॉटलंड)
 • नाणेफेक : आयर्लंड महिला, फलंदाजी.

२७ ऑगस्ट २०२१
१५:३०
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
७१/६ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
७२/३ (१५ षटके)
क्रिस्टिना गॉफ ३४ (४७)
इवा लिंच २/७ (३ षटके)
बाबेट डी लीडे ३२ (३७)
ॲना हीली १/११ (४ षटके)
नेदरलँड्स महिला ७ गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि मार्क जेम्ससन (ज)
सामनावीर: बाबेट डी लीडे (नेदरलँड्स)
 • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.

२९ ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
२४ (१६.१ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२५/० (२.४ षटके)
ट्रेसी रॉड्रिगेस ३ (१२)
एमायर रिचर्डसन २/० (२ षटके)
आयर्लंड महिला १० गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि अदनान खान (स्पे)
सामनावीर: एमायर रिचर्डसन (आयर्लंड)
 • नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
 • आयर्लंड आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • आयर्लंडचा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात फ्रान्सवर मिळवलेला पहिला विजय.

२९ ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
३६ (१९ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
३८/० (५ षटके)
कार्तिका विजयराघवन ७* (२९)
कॅथेरिन फ्रेझर ३/६ (४ षटके)
स्कॉटलंड महिला १० गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा
पंच: अड्रायन व्हान देर द्रीस (ने) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: कॅथेरिन फ्रेझर (स्कॉटलंड)
 • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.

३० ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१११/९ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
८७/९ (२० षटके)
एमायर रिचर्डसन ५३ (४९)
एव्हा लिंच ४/२४ (४ षटके)
रॉबिन रियकी ३२ (३६)
कॅरा मरे ३/९ (३ षटके)
आयर्लंड महिला २४ धावांनी विजयी.
ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा
पंच: मार्क जेम्ससन (ज) आणि डेव्हिड मॅकलीन (स्कॉ)
सामनावीर: एमायर रिचर्डसन (आयर्लंड)
 • नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.

३० ऑगस्ट २०२१
१०:३०
धावफलक
फ्रान्स Flag of फ्रान्स
२४ (१७.४ षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२५/३ (२.२ षटके)
जेनिफर किंग ८ (२४)
मेगन मॅककॉल ५/३ (४ षटके)
सॅरा ब्रेस ९ (१४)
मेरी व्हायोल्यू २/११ (१ षटक)
स्कॉटलंड महिला ७ गडी राखून विजयी.
ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि अड्रायन व्हान देर द्रीस (ने)
सामनावीर: मेगन मॅककॉल (स्कॉटलंड)
 • नाणेफेक : स्कॉटलंड महिला, क्षेत्ररक्षण.