Jump to content

२०२१ खंडीय चषक (क्रिकेट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
व्यवस्थापक रोमेनिया क्रिकेट बोर्ड
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान रोमेनिया रोमेनिया
विजेते रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
सहभाग
सामने ११
सर्वात जास्त धावा हंगेरी झीशान कुकीखेल (२६३)
सर्वात जास्त बळी लक्झेंबर्ग विक्रम विझ (९)
२०१९ (आधी)

२०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २-५ सप्टेंबर २०२१ दरम्यान रोमेनियामध्ये आयोजित केली गेली होती. मागील स्पर्धेचे विजेते ऑस्ट्रिया संघाने या आवृत्तीत भाग घेतला नाही. सामने इल्फो काउंटी मधील मोआरा व्लासी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आले. यजमान रोमेनियासह बल्गेरिया, लक्झेंबर्ग, माल्टा, चेक प्रजासत्ताक आणि हंगेरी या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. हंगेरीने आपले पहिले वहिले आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.

सर्व ६ संघांना दोन गटामध्ये विभागले गेले. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीस पात्र ठरले. अ गटातून लक्झेंबर्ग, माल्टा तर ब गटातून रोमेनिया आणि हंगेरी उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात रोमेनियाने लक्झेंबर्गचा ३३ धावांनी पराभव करत चषक जिंकला तसेच तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात नवख्या हंगेरीने अनुभवी माल्टावर ८ गडी राखून आश्चर्यकारक विजय मिळवला आणि तिसरे स्थान पटकावले. जे दोन संघ उपांत्य फेरीत पात्र होऊ शकले नाहीत म्हणजेच बल्गेरिया आणि चेक प्रजासत्ताक या दोन संघांमध्ये पाचवे स्थान निश्चित करण्यासाठी एक सामना झाला ज्यात चेक प्रजासत्ताकने बल्गेरियाला ७ गडी राखून हरवले आणि पाचवे स्थान पटकावले.

गट फेरी

[संपादन]

गट अ

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग +१.६९२ उपांत्य फेरीसाठी पात्र
माल्टाचा ध्वज माल्टा +१.४८४
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया -३.५४९ ५व्या स्थानाच्या सामन्यास पात्र
२ सप्टेंबर २०२१
०९:००
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
१८७/४ (२० षटके)
वि
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
१२५ (१८.४ षटके)
टिमोथी बार्कर ७८ (५९)
मुकुल कद्यान २/३४ (४ षटके)
केव्हिन डि'सुझा ३१ (१९)
मोहित दिक्षीत ३/१९ (४ षटके)
लक्झेंबर्ग ६२ धावांनी विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: अँड्रु बेग (रो)
सामनावीर: टिमोथी बार्कर (लक्झेंबर्ग)
  • नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
  • अमित हलभावी (ल), वसिल हिस्त्रोव, मुकुल कद्यान आणि ओमर रसोल (ब) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२ सप्टेंबर २०२१
१५:३०
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
१२८/९ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१३१/६ (१९.४ षटके)
वरुण थामोथरम २८ (२२)
विक्रम विझ ४/१९ (३ षटके)
टोनी व्हाइटमन ५७* (५५)
बिलाल मुहम्मद २/२२ (४ षटके)
लक्झेंबर्ग ४ गडी राखून विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: सईद अतीक नक्वी (रो) आणि स्टीव ट्रिप (बे)
सामनावीर: विक्रम विझ (लक्झेंबर्ग)
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, क्षेत्ररक्षण.
  • *लक्झेंबर्ग आणि माल्टा मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • लक्झेंबर्गने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात माल्टावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • अमित धिंग्रा (ल) आणि बसिक जॉर्ज (मा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३ सप्टेंबर २०२१
१२:३०
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
११२/९ (२० षटके)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
११३/३ (११.४ षटके)
हिस्त्रोव लाकोव ६२* (६०)
बिलाल मुहम्मद ४/१० (४ षटके)
बिक्रम अरोरा ४९* (३९)
हिस्त्रोव लाकोव २/३० (४ षटके)
माल्टा ७ गडी राखून विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: अँड्रु बेग (रो)
  • नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.


गट ब

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया +१.७५० उपांत्य फेरीसाठी पात्र
हंगेरीचा ध्वज हंगेरी +०.२५०
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक -१.००० ५व्या स्थानाच्या सामन्यास पात्र
२ सप्टेंबर २०२१
१२:३०
धावफलक
हंगेरी Flag of हंगेरी
१६५/६ (२० षटके)
वि
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१६०/७ (२० षटके)
झीशान कुकीखेल ७५ (४९)
कयुल मेहता ३/१८ (३ षटके)
सुदेश विक्रमसेकरा ५८ (४१)
झीशान कुकीखेल २/२७ (३ षटके)
हंगेरी ५ धावांनी विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: अँड्रु बेग (रो)
सामनावीर: झीशान कुकीखेल (हंगेरी)
  • नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, क्षेत्ररक्षण.
  • हंगेरीचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • हंगेरी आणि चेक प्रजासत्ताक मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • हंगेरीचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय. तसेच चेक प्रजासत्ताकविरुद्धचा देखील पहिलाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
  • हंगेरीने रोमेनियात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • वैशाख जगन्निवासन, कयुल मेहता (चे.प्र.), अभिजीत अहुजा, सत्यदीप अश्वनाथनारायण, खालीबर देलदार, झीशान कुकीखेल, निशांत लियानागे, हर्षवर्धन मनध्यान, झाहिर मोहम्मद, संदीप मोहनदास, अभिषेक राज, असंका वेलीगमागे आणि अली यलमाझ (हं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२ सप्टेंबर २०२१
१२:३०
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
२११/८ (२० षटके)
वि
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१७६ (१९.३ षटके)
सात्विक नडीगोट्ला ३८ (२३)
काईल गिल्हाम २/३४ (४ षटके)
अरुण अशोकन ५१ (३०)
समी उल्लाह ३/३० (४ षटके)
रोमेनिया ३५ धावांनी विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: स्टीव ट्रिप (बे)
सामनावीर: समी उल्लाह (रोमेनिया)
  • नाणेफेक : चेक प्रजासत्ताक, क्षेत्ररक्षण.
  • रोमेनियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात चेक प्रजासत्ताकवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

३ सप्टेंबर २०२१
१५:३०
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१९५/६ (२० षटके)
वि
हंगेरीचा ध्वज हंगेरी
१८७ (१९.५ षटके)
रमेश सतीशन ७६ (४१)
हर्षवर्धन मनद्यान ३/३३ (४ षटके)
झीशान कुकीखेल ७६ (४१)
असिफ बेविंजे ५/३० (४ षटके)
रोमेनिया ८ धावांनी विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: स्टीव ट्रिप (बे)
सामनावीर: असिफ बेविंजे (रोमेनिया)
  • नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.
  • रोमेनिया आणि हंगेरी मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रोमेनियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात हंगेरीवर प्रथमच विजय मिळवला.
  • मार्क फोंटॅन आणि संजय कुमार (हं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


बाद फेरी

[संपादन]

५व्या स्थानाकरता सामना

[संपादन]
४ सप्टेंबर २०२१
०९:००
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
१३७/६ (२० षटके)
वि
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१४१/३ (१६.२ षटके)
ह्रिस्तो लाकोव ६४* (५८)
नवीद अहमद ३/१७ (४ षटके)
वैशाख जगन्निवासन ५५ (४१)
जॅकब अल्बिन १/२० (२ षटके)
चेक प्रजासत्ताक ७ गडी राखून विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: स्टीव ट्रिप (बे)
सामनावीर: नवीद अहमद (चेक प्रजासत्ताक)
  • नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी.
  • बल्गेरिया आणि चेक प्रजासत्ताक मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • चेक प्रजासत्ताकने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात बल्गेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • अक्षय हरिकुमार (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१ला उपांत्य सामना

[संपादन]
४ सप्टेंबर २०२१
१२:३०
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
१७९/६ (२० षटके)
वि
हंगेरीचा ध्वज हंगेरी
१७७/९ (२० षटके)
जूस्ट मेस ४३ (२९)
झीशान कुकीखेल ३/३७ (४ षटके)
सत्यदीप अश्वनाथनारायण ४१* (१९)
विक्रम विझ ३/२१ (३.३ षटके)
लक्झेंबर्ग २ धावांनी विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: अँड्रु बेग (रो)
सामनावीर: विक्रम विझ (लक्झेंबर्ग)
  • नाणेफेक : हंगेरी, क्षेत्ररक्षण.
  • लक्झेंबर्ग आणि हंगेरी मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • लक्झेंबर्गने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात हंगेरीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२रा उपांत्य सामना

[संपादन]
४ सप्टेंबर २०२१
१५:३०
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
२०२/८ (२० षटके)
वि
माल्टाचा ध्वज माल्टा
१६६/८ (२० षटके)
तरणजीत सिंग ९१ (५७)
वसीम अब्बास ५/३७ (४ षटके)
बिक्रम अरोरा ४२ (३८)
पॅवेल फ्लोरिन २/३ (१ षटक)
रोमेनिया ३६ धावांनी विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: स्टीव ट्रिप (बे)
सामनावीर: तरणजीत सिंग (रोमेनिया)
  • नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.
  • रोमेनिया आणि माल्टा मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • रोमेनियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात माल्टावर पहिल्यांदाच विजय मिळवला.


३ऱ्या स्थानाकरता सामना

[संपादन]
५ सप्टेंबर २०२१
१३:००
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
१७०/५ (२० षटके)
वि
हंगेरीचा ध्वज हंगेरी
१७१/२ (१८.२ षटके)
बसिल जॉर्ज ४८ (४६)
अभिषेक खेतरपाल २/३५ (४ षटके)
झीशान कुकीखेल २/३५ (४ षटके)
झीशान कुकीखेल ८२ (४२)
बिक्रम अरोरा १/१९ (३.२ षटके)
हंगेरी ८ गडी राखून विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: अँड्रु बेग (रो)
सामनावीर: झीशान कुकीखेल (हंगेरी)
  • नाणेफेक : हंगेरी, क्षेत्ररक्षण.
  • माल्टा आणि हंगेरी मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • हंगेरीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात माल्टावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

अंतिम सामना

[संपादन]
५ सप्टेंबर २०२१
०९:३०
धावफलक
रोमेनिया Flag of रोमेनिया
१५६ (१९.५ षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१२३/९ (२० षटके)
सात्विक नाडीगोट्ला ५५ (३८)
विक्रम विझ २/२४ (३.५ षटके)
अद्वैत मणेपल्ली २२ (१९)
आफताब कयानी २/७ (२ षटके)
रोमेनिया ३३ धावांनी विजयी.
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी
पंच: स्टीव ट्रिप (बे)
सामनावीर: असिफ बेविंजे (रोमेनिया)
  • नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी.