बोरगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बोरगाव हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील उल्हास नदीची उपनदी असलेल्या पोसरी नदीच्या काठावरील निसर्गसौंदर्याने नटलेले गाव आहे. गावाच्या पश्चिमेस, गावातील लोकांच्या श्रमदानाने तयार झालेल्या कळंब-बोरगाव ह्या तीन मैलांच्या रस्त्याच्या कडेला, वेशीजवळ, गावाचे ग्रामदैवत टाकोबाचे देऊळ आहे. देवळात गणपती, तसेच घोड्यावर स्वार असलेले टाकोबा यांची दगडावर कोरलेली शिल्पे आहेत. गावकऱ्यांच्या परंपरागत समजुतीनुसार टाकोबा घोड्यावर स्वार होऊन गावाचे रक्षण करतात. गावाच्या पूर्वेस मारुतीचे मंदिर आहे, दरवर्षी हनुमान जयंतीला मारुतीची पालखीतून मिरवणूक काढली जाते.