Jump to content

"मराठी लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ८०: ओळ ८०:
* [[कोळी]] – हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती व मासेमारी हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.
* [[कोळी]] – हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती व मासेमारी हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.
* [[कुणबी]] — हा शेती करणारा समाज आहे. उच्चवर्णीय [[मराठा]] समाज याला स्वत:चीच उपजाती मानतो. याची राज्यात १५% संख्या आहे. हा [[ओबीसी]] प्रवर्गात मोडतो.
* [[कुणबी]] — हा शेती करणारा समाज आहे. उच्चवर्णीय [[मराठा]] समाज याला स्वत:चीच उपजाती मानतो. याची राज्यात १५% संख्या आहे. हा [[ओबीसी]] प्रवर्गात मोडतो.
* [[मातंग]] – झाडत्याच्या पानांपासून दोर, झाडू इत्यादी वस्तु बनवणे ह्या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. गावातील विविध समारंभात दफडी वाजवणे, दवंडी देणे सुद्धा ह्या समाजाचा व्यवसाय आहे. हा समाज [[अनुसूचित जाती]]मध्ये मोडतो. २०११ मध्ये यांची संख्या २१ लाख आहे.
* [[मातंग]] – झाडेत्यांच्या पानांपासून दोर, झाडू इत्यादी वस्तू बनवणे ह्या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. गावातील विविध समारंभात दफडी वाजवणे, दवंडी देणे सुद्धा ह्या समाजाचा व्यवसाय आहे. हा समाज [[अनुसूचित जाती]]मध्ये मोडतो. २०११ मध्ये यांची संख्या २१ लाख आहे.
* [[मराठा]] – हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये हा समाज पहिल्यापासून उच्चवर्गीय [[क्षत्रिय]] वर्गात गणला गेला आहे. महाराष्ट्रात यांची संख्या १५% आहे.
* [[मराठा]] – हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये हा समाज पहिल्यापासून उच्चवर्गीय [[क्षत्रिय]] वर्गात गणला गेला आहे. महाराष्ट्रात यांची संख्या १५% आहे.
* [[महार]] – हा समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% आहे.<ref name="Clothey2007">{{स्रोत पुस्तक|author=Fred Clothey|शीर्षक=Religion in India: A Historical Introduction|दुवा=https://books.google.com/books?id=7s376jMWBcEC&pg=PA213|date=26 February 2007|publisher=Psychology Press|isbn=978-0-415-94023-8|page=213}}</ref> बहुतेक सर्व महार समाजाने सन १९५६ मध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे अनुकरण करत [[महाराष्ट्रात बौद्ध धर्म|बौद्ध धर्म]] स्विकारलेला आहे. दलितांच्या हक्कांसाठी हा समाज सर्वाधिक संघर्ष करीत असतो.<ref>{{स्रोत पुस्तक|last=Jaffrelot|first=Christophe|शीर्षक=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste|year=2005|publisher=Orient Blackswan Publisher|isbn=8178241560|pages=119–131|chapter=The ‘Solution’ of Conversion}}</ref><ref name="zelliott">{{स्रोत पुस्तक |editor-last=Smith |editor-first=Bardwell L. |शीर्षक=Religion and the Legitimation of Power in South Asia |year=1978 |publisher=Brill |location=Leiden |isbn=9004056742 |pages=88–90 |दुवा=https://books.google.com/books?id=x2Jzn_LuLasC&pg=PA88 |first=Eleanor |last=Zelliott |chapter=Religion and Legitimation in the Mahar Movement}}</ref> हा [[अनुसूचित जाती]]त मोडतो.
* [[महार]] – हा समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% आहे.<ref name="Clothey2007">{{स्रोत पुस्तक|author=Fred Clothey|शीर्षक=Religion in India: A Historical Introduction|दुवा=https://books.google.com/books?id=7s376jMWBcEC&pg=PA213|date=26 February 2007|publisher=Psychology Press|isbn=978-0-415-94023-8|page=213}}</ref> बहुतेक सर्व महार समाजाने सन १९५६ मध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे अनुकरण करत [[महाराष्ट्रात बौद्ध धर्म|बौद्ध धर्म]] स्वीकारलेला आहे. दलितांच्या हक्कांसाठी हा समाज सर्वाधिक संघर्ष करीत असतो.<ref>{{स्रोत पुस्तक|last=Jaffrelot|first=Christophe|शीर्षक=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste|year=2005|publisher=Orient Blackswan Publisher|isbn=8178241560|pages=119–131|chapter=The ‘Solution’ of Conversion}}</ref><ref name="zelliott">{{स्रोत पुस्तक |editor-last=Smith |editor-first=Bardwell L. |शीर्षक=Religion and the Legitimation of Power in South Asia |year=1978 |publisher=Brill |location=Leiden |isbn=9004056742 |pages=88–90 |दुवा=https://books.google.com/books?id=x2Jzn_LuLasC&pg=PA88 |first=Eleanor |last=Zelliott |chapter=Religion and Legitimation in the Mahar Movement}}</ref> हा [[अनुसूचित जाती]]त मोडतो.
* [[पाठारे प्रभु (सोमवंशीय क्षत्रिय पाठारे)]] – गेल्या अनेक शतकांपासून हा समाज मुंबईत राहतो. मुंबईतील मुळ शासनकर्ता क्षत्रिय समाज हाच आहे.
* [[पाठारे प्रभु (सोमवंशीय क्षत्रिय पाठारे)]] – गेल्या अनेक शतकांपासून हा समाज मुंबईत राहतो. मुंबईतील मूळ शासनकर्ता क्षत्रिय समाज हाच आहे.
* [[वंजारी]] — काही शतकांपूर्वी पासून [[राजस्थान]]मधून महाराष्ट्रात, त्यातही मराठवाड्यात स्थलांतरित झालेला हा समाज आहे.
* [[वंजारी]] — काही शतकांपूर्वी पासून [[राजस्थान]]मधून महाराष्ट्रात, त्यातही मराठवाड्यात स्थलांतरित झालेला हा समाज आहे.
* [[रामोशी]]
* [[रामोशी]]
* [[वाणी]] – हा व्यापार करणारा समाज आहे.
* [[वाणी]] – हा व्यापार करणारा समाज आहे.
* आरे, आर्य क्षत्रिय - सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा हा समाज आहे. हा समाज मूळ तेलुगू भाषिक प्रांतातील असून तीनशे वर्षापासून महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे.
* आरे, आर्य क्षत्रिय - सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा हा समाज आहे. हा समाज मूळ तेलुगू भाषिक प्रांतातील असून तीनशे हून अधिक वर्षापासून महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे.
* [[गवळी]] - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गवळी लोक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धोत्पादन करतात.
* [[गवळी]] - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गवळी लोक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धोत्पादन करतात.
* कामाठी : जुन्या मुंबईतील बहुसंख्य इमारती, मुंबई-पुणे रेल्वे लाईन आण बॊगदे या जमातीतील लोकांनी बांधले.


===अ-हिंदू समाज===
===अ-हिंदू समाज===

१३:२०, १९ मे २०१९ ची आवृत्ती

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


मराठी माणसे (महाराष्ट्रीय)



छ. शिवाजी महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्योतिबा फुलेबाळ गंगाधर टिळक
धुंडिराज गोविंद फाळकेसंत तुकाराम
सचिन तेंडुलकरमाधुरी दीक्षितरजनीकांत
एकूण लोकसंख्या

आठ ते नऊ कोटी

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख लोकसंख्या

लक्षणीय लोकसंख्या

इतर

भाषा
मराठी
धर्म
हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी
संबंधित वांशिक लोकसमूह
इंडो-युरोपीय, इंडो-इराणी, इंडो-आर्यन


मराठी लोक (महाराष्ट्रीय) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारतातील दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य, ह्या ठिकाणी या लोकांचे मूळ निवासस्थान आहे. मराठी ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारतातील प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते. मराठे हे द्रविडी परंपरेतले असून, बळीवंशातील ते मूळनिवासी आहेत.

शब्दस्रोत

मराठ्यांच्या साम्राज्याचा झेंडा

मराठी माणसे महाराष्ट्रीय या नावानेही ओळखली जातात. महाराष्ट्रीय माणसांना मराठी माणूस म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांची भाषा मराठी ही आहे. महाराष्ट्र आणि मराठी या शब्दांच्या उत्पत्तीबाबत वेगवेगळी माहिती उपलब्ध आहे. एका माहितीनुसार मराठी लोकांचे पूर्वज असलेल्या दख्खन प्रांतातील लोकांना राजा सम्राट अशोकांच्या काळात "राष्ट्रिक" म्हणून संबोधले जात होते. महाराष्ट्री प्राकृत भाषा ही या लोकांशी संबंधित असून मराठी या शब्दाचा उगम हा महाराष्ट्री या शब्दापासून झाला आहे.
महाराष्ट्री प्राकृत ही भाषा सातवाहन काळातील अधिकृत भाषा होती. मात्र या माहितीमध्ये राष्ट्रिक या शब्दाचे मूळ व राष्ट्रिक शब्द व दख्खनचे लोक यातील संबंध कोठेही दिलेला नाही. संस्कृत शब्द "राष्ट्र" हा सध्या देश या अर्थाने वापरला जातो. मात्र काही शतकांपूर्वी हा शब्द कोणत्याही एका प्रशासकीय घटकासाठी वापरला जात असावा. दुसऱ्या माहितीनुसार मराठी आणि राष्ट्री यांचा संबंध "रट्ट" या शब्दाशी जोडला जातो. रट्ट हा राष्ट्रकूट शब्दाचा अपभ्रंश आहे. राष्ट्रकूट घराणे हे आठव्या ते दहाव्या शतकामध्ये दख्खन प्रांतावर राज्य करत होते. मात्र सम्राट अशोकांच्या काळातील लेख हे राष्ट्रकूटांपेक्षा बरेच पुरातन असल्यामुळे दोन्ही लेखांचा पडताळा घेणे अवघड आहे.
मराठी ही यादव राजवटीमध्ये राजभाषा होती.यादव राजा सिंघण हा त्याच्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध होता. त्याच्या दानशूरपणाबद्दलची माहिती ही मराठी शिलालेखांच्या स्वरूपात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पहायला मिळते. हेमाद्रीसारख्या विद्वान व्यक्तींच्या रचनाही मराठीत उपलब्ध आहेत. हेमाद्री यांची हेमाडपंती मंदिरांची रचना प्रसिद्ध आहे.
मराठीतील शिलालेख हे रायगडमधील आक्षी, पाटण, पंढरपूर वगैरे ठिकाणी आहेत. या शिलालेखांपैकी सर्वांत लोकप्रिय शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या (बाहुबली) पायाशी आहे. हा लेख खालीलप्रमाणे आहे.
चामुंडराये करवियले, गंगाराये सुत्ताल करवियाले....
या शिलालेखामधून पुतळ्याचे शिल्पकार व तत्कालीन राजाबद्दल माहिती मिळते.

महाराष्ट्राचा इतिहास

प्राचीन ते मध्ययुगीन इतिहास कालखंड

इ.स.पू. २३० साली महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.

सन १६०० पूर्वीचा मराठ्यांचा इतिहास (शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा)

उपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन माहितीनुसार हल्ली महाराष्ट्र या नावाने ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी "दंडकारण्य" म्हणून ओळखला जात होता. दंडकारण्य या शब्दाचा अर्थ "कायद्याचे राज्य असलेले अरण्य" असा आहे.

इसवी सन पूर्व ६०० मध्ये महाराष्ट्र हा प्रदेश हे एक महाजनपद होते. मात्र आर्यांच्या प्रवेशापूर्वी या प्रदेशाचे नागरिकीकरण झाले होते की नाही. ही माहिती अज्ञात आहे. सम्राट अशोकानंतर हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग झाला व त्याचे आर्यीकरण झाले.
इसवी सन पूर्व २३० मध्ये स्थानिक राजघराणे सातवाहन हे महाराष्ट्रात सत्तेवर आले. पुण्याजवळील जुन्नर येथील या घराण्याने पुढे उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विजयानंतर एक मोठे साम्राज्य स्थापन केले.
आजचे बहुतेक मराठी लोक हे या साम्राज्याचे वंशज आहेत, असे मानण्यात येते. हे साम्राज्य गौतमपुत्र सत्कर्णी उर्फ शालिवाहन याच्या काळात उत्कर्षाला पोचले. शालिवाहन राजाने नवीन दिनदर्शिका व कालगणना सुरू केली. शालिवाहन शक नावाची ही कालगणना मराठी माणसांकडून आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या साम्राज्याचा अस्त इसवी सन ३०० च्या आसपास झाला. मराठीच्या पूर्वीची भाषा असलेल्या महाराष्ट्री भाषेचा वापर सातवाहन काळात सुरू झाला. सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश मुस्लिम साम्राज्यांतर्गत आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता.

मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्याचा विस्तार इ.स.१७६०, ज्या काळात मराठा साम्राज्य आपल्या शिखरावर होते.(पिवळ्या रंगाने दर्शविले आहे)

१७व्या शतकाच्या मध्यात शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मोगलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी हा एका छोट्या लढाईनंतर महाराष्ट्राचा राजा झाला. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना संभाजीने मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरला नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजीची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम याने केले. त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे पत्नी ताराराणीने घेतली. आपल्या अज्ञान मुलांच्या नावाने स्वतः राज्य कारभार पाहिला. पण त्याच वेळी औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या शाहू यांनी मोर्चेबांधणी करून ताराराणीविरुद्ध बंड केले. मराठा सरदारांनी मध्यस्थी करुन ताराराणीस कोल्हापूरची व शाहूस सातारची गादी दिली. पुढे शाहूने पेशवाई निर्माण करून बाळाजी विश्वनाथ यास पहिला पेशवा केले. त्यानंतर राज्य चालविण्याची जबाबदारी पेशव्यांच्या डोक्यावर आली. पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते.

ब्रिटिश राजवट

बहुसंख्य मराठी लोक हे हिंदू आहेत.[] अल्पसंख्यकात बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम आणि यहूदी यांचा समावेश होतो.[]

सामाजिक इतिहास

ब्रिटिश शासनाच्या आधी, महाराष्ट्र प्रदेश अनेक राजस्व विभागात विभागला गेला. एक काउंटी किंवा जिल्हा मध्ययुगीन परगणासमतुल्य होते. परगणा प्रमुखांना देशमुख असे म्हटले गेले आणि रेकॉर्ड कपाट्यांना देशपांडे असे म्हटले गेले. गाव हे सर्वात कमी प्रशासकीय एकक होते. मराठी भागातील ग्रामीण समाज, पाटील किंवा गावाचे प्रमुख, महसूल गोळा करणारा आणि गावाचे रेकॉर्डकीपर कुलकर्णी हे गावकरी गणले जात. अशी वंशानुगत स्थिती होती. गावात बलुते नावाचे बारा वारसा सेवक देखील असत. बलुते यंत्रणा कृषी क्षेत्राला पाठिंबा देणारी होती. या प्रणालीच्या अंतर्गत शेतकरी शेतकऱ्यांना आणि गावाच्या आर्थिक व्यवस्थेला सेवा प्रदान करीत. या प्रणालीचा आधार जात होता. नोकर त्यांच्या जातींसाठी विशिष्ट कार्यांसाठी जबाबदार होते. बारा बलुते यांच्यामध्ये बारा प्रकारचे नोकर होते; हे जोशी (ब्राह्मण जातीचे गावचे पुजारी आणि ज्योतिषी), सोनार (दवाईदान्या जातीचे सुवर्ण), मातंग (दोरखंड तयार करणे), सुतार (सुतार), गुरव (देवळाचे पुजारी), न्हावी , परीट (वॉशरमन), कुंभार (कुंभार), चांभार (काॅबलर), धोर, कोळी (मच्छीमार किंवा जलवाहक), चौगुले (पाटलाचे साहाय्यक) आणि महार (गावचे चौकीदार आणि इतर कार्ये).

जाती आणि समाज

मराठी लोक लोक भाषा, इतिहास, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा, सामाजिक संरचना, साहित्य आणि कला यांसारख्या दृष्टीने इतरांपेक्षा वेगळे आहेत[]

हिंदू जाती-समाज

  • आगरी - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवीमुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. आगरी लोक खाऱ्या पाण्यापासून मीठ बनवतात.
  • चांभार – जनावरांच्या कातडीपासून वस्तू बनवणे हा यांचा परंपरागत व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीत मोडतो. २०११ मध्ये यांची लोकसंख्या १२ लाख होती.
  • माळी -माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे. हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत होता. माळी समाज हा मुखत्वे शेती करणारा कुणबी समाजाशी साम्य असलेला समाज आहे. काही ठिकाणी हा समाज बलुतेदार आहे तर काही ठिकाणी अलुतेदार आहे.
  • चांद्रसेनीय कायस्थ प्रभु – हा उच्च-विद्याविभूषित क्षत्रिय-ब्राह्मण समाज आहे.
  • भोई - अहिराणी भाषा बोलणाऱ्या २२ उप-जातींपैकी एक हा समाज आहे.
  • लोणारी - हा कोळसे तयार करणारा समाज आहे हा "कुणबी"या जातसमूहातील एक उपजातसमूह आहे. हे प्राचीन भारतातील महाजनपदातील "मल्लवंशीय" आहेत. सद्या महाराष्ट्रात त्यांचा ओ.बी.सी.वर्गात समावेश आहे.
  • धनगर – हा मेंढ्या पाळणारा समाज आहे. महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जातीत यांचा समावेश होतो.
  • कासार - हा समाज तांब्याची भांडी बनविणारा व विकणारा तसेच बांगड्या विकणारा समाज आहे.
  • गुरव – हा समाज हिंदू मंदिरात पाहिला जातो कारण पुजारी ह्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.
  • कोळी – हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती व मासेमारी हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.
  • कुणबी — हा शेती करणारा समाज आहे. उच्चवर्णीय मराठा समाज याला स्वत:चीच उपजाती मानतो. याची राज्यात १५% संख्या आहे. हा ओबीसी प्रवर्गात मोडतो.
  • मातंग – झाडे व त्यांच्या पानांपासून दोर, झाडू इत्यादी वस्तू बनवणे ह्या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. गावातील विविध समारंभात दफडी वाजवणे, दवंडी देणे सुद्धा ह्या समाजाचा व्यवसाय आहे. हा समाज अनुसूचित जातीमध्ये मोडतो. २०११ मध्ये यांची संख्या २१ लाख आहे.
  • मराठा – हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये हा समाज पहिल्यापासून उच्चवर्गीय क्षत्रिय वर्गात गणला गेला आहे. महाराष्ट्रात यांची संख्या १५% आहे.
  • महार – हा समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% आहे.[] बहुतेक सर्व महार समाजाने सन १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुकरण करत बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. दलितांच्या हक्कांसाठी हा समाज सर्वाधिक संघर्ष करीत असतो.[][] हा अनुसूचित जातीत मोडतो.
  • पाठारे प्रभु (सोमवंशीय क्षत्रिय पाठारे) – गेल्या अनेक शतकांपासून हा समाज मुंबईत राहतो. मुंबईतील मूळ शासनकर्ता क्षत्रिय समाज हाच आहे.
  • वंजारी — काही शतकांपूर्वी पासून राजस्थानमधून महाराष्ट्रात, त्यातही मराठवाड्यात स्थलांतरित झालेला हा समाज आहे.
  • रामोशी
  • वाणी – हा व्यापार करणारा समाज आहे.
  • आरे, आर्य क्षत्रिय - सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा हा समाज आहे. हा समाज मूळ तेलुगू भाषिक प्रांतातील असून तीनशे हून अधिक वर्षापासून महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे.
  • गवळी - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गवळी लोक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धोत्पादन करतात.
  • कामाठी : जुन्या मुंबईतील बहुसंख्य इमारती, मुंबई-पुणे रेल्वे लाईन आण बॊगदे या जमातीतील लोकांनी बांधले.

अ-हिंदू समाज

महाराष्ट्राबाहेरील मराठी लोक

भारतातील दुसऱ्या राज्यात

जसे मराठा साम्राज्य भारतभरात पसरले तसतसे मराठी लोक त्यांच्या शासकांच्या बरोबर महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाले. जेव्हा पेशवे, होळकर, सिंधिया आणि गायकवाड या वंशाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाहेरील नवीन जागा जिंकल्या, तेव्हा ते त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने मराठी प्रशासक, कारकून, पुजारी, सैनिक, व्यापारी आणि कामगार घेऊन गेले.१८व्या शतकापासून हे लोक आपल्या शासकासोबत भारताच्या विविध भागामध्ये स्थायिक झाले आहेत. २०० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य असले तरीही या गटांतील अनेक कुटुंबे ठरावीक जुन्या मराठी परंपरेचे पालन करतात.

भारताबाहेरील मराठी

१९व्या शतकात मोठ्या संख्येने भारतीय लोक मॉरिशस, फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, सुरिनाम , आणि जमैका येथे ऊसलागवडीसाठी काम करण्यासाठी वेठबिगार मजूर म्हणून नेले गेले. बहुतेक स्थलांतरित हिंदुस्थानी भाषा बोलणारी किंवा दक्षिण भारतीय होती, तथापि, मॉरिशसला स्थलांतरित करणाऱ्या माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी लोक होते.

संस्कृती

खानपान

Attire

Traditional Maharashtrian dresses
Women wearing lugade (nau wari), a traditional nine yard sari for a Rotary Club Party

बाह्य दुवे


संदर्भ


  1. ^ a b http://www.bharatonline.com/maharashtra/culture/religion.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Changing India: Bourgeois Revolution on the Subcontinent by Robert W. Stern, p. 20
  3. ^ Fred Clothey (26 February 2007). Psychology Press. p. 213. ISBN 978-0-415-94023-8 https://books.google.com/books?id=7s376jMWBcEC&pg=PA213. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Jaffrelot, Christophe (2005). "The 'Solution' of Conversion". Orient Blackswan Publisher. pp. 119–131. ISBN 8178241560. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Zelliott, Eleanor (1978). "Religion and Legitimation in the Mahar Movement". In Smith, Bardwell L. (ed.). Leiden: Brill. pp. 88–90. ISBN 9004056742 https://books.google.com/books?id=x2Jzn_LuLasC&pg=PA88. Missing or empty |title= (सहाय्य)