"सांगली जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ८१: | ओळ ८१: | ||
बंद पडून विलीनीकरण झालेल्या बँका : आष्टा अर्बन बँकेचे अपना बँकेत, पार्श्वनाथ बँकेचे कराड बँकेत, तर मुरघा राजेंद्र व आण्णासाहेब कराळे बँकांचे सारस्वत बँकेत विलीनीकरण झाले आहे. |
बंद पडून विलीनीकरण झालेल्या बँका : आष्टा अर्बन बँकेचे अपना बँकेत, पार्श्वनाथ बँकेचे कराड बँकेत, तर मुरघा राजेंद्र व आण्णासाहेब कराळे बँकांचे सारस्वत बँकेत विलीनीकरण झाले आहे. |
||
संचालक मंडळ बरखास्त झालेल्या बँका (इ.स. २०१२ची स्थिती) : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेचे संचालक मंडळ २९ मार्च २०१२ रोजी बरखास्त करण्यात आले. बरखास्त संचालकांत उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि विद्यमान संचालक शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचा समावेश आहे.. |
|||
===पतपेढ्या=== |
===पतपेढ्या=== |
१२:३९, ६ मे २०१६ ची आवृत्ती
सांगली जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | पुणे विभाग |
मुख्यालय | सांगली |
तालुके | शिराळा - वाळवा - तासगांव - खानापूर (विटा) - आटपाडी - कवठे महांकाळ - मिरज - पलूस - जत - कडेगांव |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ८,५७८ चौरस किमी (३,३१२ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | २८२०५७५ (२०११) |
-लोकसंख्या घनता | ३२८ प्रति चौरस किमी (८५० /चौ. मैल) |
-शहरी लोकसंख्या | २४% |
-साक्षरता दर | ८२.६२% |
-लिंग गुणोत्तर | १.०३ ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | सांगली (लोकसभा मतदारसंघ), हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ) |
-विधानसभा मतदारसंघ | इस्लामपूर • खानापूर • जत • तासगाव-कवठे महाकाळ • पलूस-कडेगाव • मिरज • शिराळा • सांगली |
-खासदार | संजयकाका पाटील, राजू शेट्टी |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | रुपांतरण त्रूटी: मूल्य "४००-४५०" अंकातच आवश्यक आहे |
संकेतस्थळ |
भूगोल
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.
सांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव
जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.
सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे.
निर्मिती
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली.
विशेष
'नाटक हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले.
औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणणारे विठोजीराव चव्हाण व प्रतिसरकारचे प्रणेते नाना पाटील यांच्यासारख्या खंद्या वीरांना जन्म देणारी ही भूमी आहे. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.
संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्न करत आहे.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे.
नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र - मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.
ऐतिहासिक महत्त्वाचे
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.
दळणवळण
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो.
मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.
शेती
जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्यांत काळी-कसदार जमीन आढळते.
सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
जिल्ह्यातील प्रमुख पिके- बाजरी, भात (तांदूळ). ज्वारी, गहू, मका, ऊस, भुईमूग, हळकुंड/हळद, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, कापूस
राजकीय संरचना
लोकसभा मतदारसंघ : सांगली - मिरज,सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे विधानसभा मतदारसंघ मिळून सांगली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.)
विधानसभा मतदारसंघ : जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत- [[मिरज], सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महांकाळ व जत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.
सांगली जिल्ह्यातील सहकारी बँका आणि पतपेढ्या (२०१०सालच्या डिसेंबरमधील स्थिती)
सांगली जिल्ह्यात एकूण नागरी सहकारी बँकांची संख्या २५ असून त्यात २ हजार कोटीच्या ठेवी आहेत. २५ बँकांपैकी ५ बँकांचे परवाने रद्द झाले आहेत. रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या २ बँका आहेत. चार बँकांचे विलीनीकरण झाले आहे, तर दोन विलीकरणाच्या मार्गावर आहेत.
परवाना रद्द झालेल्या बँका : कुपवाड अर्बन, मिरज अर्बन, यशवंत. लॉर्ड बालाजी, वसंतदादा.
रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असलेल्या बँका : कृष्णा व्हॅली, धनश्री महिला.
बंद पडून विलीनीकरण झालेल्या बँका : आष्टा अर्बन बँकेचे अपना बँकेत, पार्श्वनाथ बँकेचे कराड बँकेत, तर मुरघा राजेंद्र व आण्णासाहेब कराळे बँकांचे सारस्वत बँकेत विलीनीकरण झाले आहे.
संचालक मंडळ बरखास्त झालेल्या बँका (इ.स. २०१२ची स्थिती) : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँकेचे संचालक मंडळ २९ मार्च २०१२ रोजी बरखास्त करण्यात आले. बरखास्त संचालकांत उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि विद्यमान संचालक शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलासराव शिंदे यांचा समावेश आहे..
पतपेढ्या
सांगली जिल्ह्यात एकूण १२०० पतसंस्था असून त्यात सुमारे ५०० कोटींच्या ठेवी आहेत. अडचणीतील पतसंस्था ८८ आहेत. चौकशी सुरू असलेल्या पतसंस्था ९६ तर प्रशासक व अवसायनातील संस्था २४० आहेत.
सांगली जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांपैकी ६८ नागरी सहकारी पतसंस्थांत ७९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यातील २३ नागरी सहकारी पतसंस्थांतील २७ कोटी रुपयांच्या अपहारासाठी निरनिराळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर ४५ संस्थांची सहकार कायद्याच्या कलम ८८ अन्वये चौकशी सुरू आहे. जनलक्ष्मी, मुस्लिम अर्बन, संपत, साईनाथ महिला, सेंच्युरी अशा काही संस्थांवर फौजदारी कारवाई झाली आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
गणपती मंदिर, मिरजेचा दर्गा, संगमेश्वर मंदिर (हरिपूर), प्रचितगड व चांदोली धरण/अभयारण्य, बत्तीस शिराळा, तासगांव येथील गणेश मंदिर, दांडोबा अभयारण्य, शुकाचारी गुहा.
पर्यटन
- गणेशदुर्ग किल्ला : कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.
- गणेश मंदिर : १८४४ मध्ये श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधलेले येथील गणेश मंदिर प्रसिद्ध असून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी या मंदिरात बैठका घेतल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात.
- कृष्णा व वारणा नद्यांचा संगम : सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तिस्थळ नावाचे स्मारक आहे.
- मिरज : मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथील भुईकोट किल्ला, वानलेस मिशन दवाखाना व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहेत.
- ख्वाजा मीरासाहेब दर्गा : हा ५०० वर्षे जुना असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात.
- सागरेश्वर अभयारण्य : सांगलीजवळील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. खानापूर, पलूस, वाळवा या तालुक्यांत हे अभयारण्य पसरले असून हे हरणांसाठी राखीव आहे.
- चांदोली (ता. बत्तीस शिराळा) : हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली हे अभयारण्य येते. या जंगलात गवा ,अस्वल, बिबट्या हे प्राणी आढळतात
.
- औदुंबर : सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णाकाठी दत्त मंदिर आहे. औदुंबर येथे राहूनच प्रसिद्ध कवी सुधांशू यांनी काव्यसाधना केली.
- पेंटलोद येथील प्रचितगड, बाणूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठे-एकंद येथील सिद्धारामाचे मंदिर व त्या ठिकाणी दसर्याच्या वेळी रात्रभर होणारी फटाक्यांची आतषबाजी विशेष प्रसिद्ध आहे.
- दंडोबा येथील उंच टेकडीवर शंकराचे प्राचीन मंदिर आहे.
जिल्ह्यातील काही प्रसिद्ध व्यक्ती
- क्रांतिसिंह नाना पाटील
- अण्णा भाऊ साठे
- ग.दि. माडगूळकर
- विष्णुदास भावे
- विष्णू सखाराम खांडेकर
- व्यंकटेश माडगूळकर
- नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व
- गोविंद बल्लाळ देवल
- चिंतामणराव पटवर्धन
- दादासाहेब वेलणकर
- ना.सं. इनामदार
- यशवंतराव चव्हाण
- राम नाईक
- वसंतदादा पाटील
- विजय हजारे
- अरुण कांबळे
- आर.आर. पाटील
संगीत वारसा
मंगेशकर कुटुंबीय सुमारे १४ वर्षे सांगलीत वास्तव्यास होते. चित्रपट संगीतदिग्दर्शक बाळ पळसुलेही सांगलीचेच.
राजकीय वारसा
सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे महत्त्वाचे निर्णय घेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी म्हणजे सांगलीच होय. वसंतदादांचा जन्म मिरज तालुक्यातील पद्माळे या गावचा होय. त्यांनी अनेक वर्षे विधिमंडळात व संसदेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले.
उद्योग
जिल्ह्यात सांगली, मिरज, विटा, कवठे-महांकाळ व इस्लामपूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात बारा साखर कारखाने असून सांगली येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा देशातील सर्वाधिक दैनिक गाळप क्षमतेचा व आशियातील सर्वांत मोठा सहकारी साखर कारखाना आहे. उधोगांमध्ये साखरउद्योगा व्यतिरिक्त इतर अनेक व्यवसायांसाठी सांगली प्रसिद्ध आहे. उदा० हळद, मिरची, द्राक्षे, भडंग, आणि असे सांगलीतले बरेचसे उद्योग भारतात प्रसिद्ध आहेत .सांगलीच्या बाजारपेठेमधून महाराष्ट्रात व कर्नाटकात मालाची आवक - जावक आहे. येथील विष्णुअण्णा फळ मार्केट, मार्केट यार्ड, सांगली-मिरज .एम.आय.डी.सी. (औधोगिक वसाहती)मधून अनेक प्रसिद्ध उत्पादने जगाच्या कानाकोपर्यात पोहचत आहेत. चिंतामणि मोटर्स ही भारतात र्मोडिफाइड गाडी बनवण्यासाठी ओळखले जाते. तसेच महाराष्ट्र कार ओल्ड पार्ट्स , ही फर्म सर्व लेटेस्ट कार्सचे जुना व नवे स्पेअर पार्ट्स भारतभर पोहोचवण्यासाठी ऑनलाइन सिविधा देते. हिची अधिक महिति आपन caroldpart.com वर मिळते. सांगली-कोल्हापूर रोडवर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ आणि जुना लोखंड बाजार आहे. या मार्केटमध्ये १७० दुकाने असून हे सांगली लोखंड मार्केट. नावाने ओळखले जाते. याची स्थापना सलीम नदाफ यानी केली असून ते मार्क्टचे अध्यक्ष आहेत (इ.स. २०१५)
.
साखर कारखान्यांची यादी
बाह्य दुवे
- सांगली एन.आय.सी (इंग्लिश मजकूर)
सांगली जिल्ह्यातील तालुके |
---|
शिराळा तालुका | वाळवा तालुका | तासगाव तालुका | खानापूर (विटा) तालुका | आटपाडी तालुका | कवठे महांकाळ तालुका | मिरज तालुका | पलुस तालुका | जत तालुका | कडेगाव तालुका |