जत
?जत महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | विजापूर, सांगली |
भाषा | मराठी, ಕನ್ನಡ |
तहसील | जत |
पंचायत समिती | जत |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४१६४०४ • +०२३४४ • MH-10 |
जत हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे.
इतिहास[संपादन]
जतचे सर्वांत पुरातन उल्लेख रामायणकाळातील असल्याचे मानले जाते - हा प्रदेश दंडकारण्यातले जयंतीनगर होते असे सांगितले जाते[ संदर्भ हवा ]. इ.स.च्या ११ व्या व १२ व्या शतकातील काही शिलालेख जत तालुक्यातल्या उमराणी, कोळेगिरी येथील पुरातन मंदिरांत आढळून येतात. कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दाने दिल्याचे उल्लेख त्यांत आढळतात.
जत येथे डफळे संस्थांनाची राजधानी होती. तसेच जत पासून १८ किमी असणाऱ्या डफळापूर या गावी डफळे सरकारचा राजवाडा आहे.
जत तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे.
धार्मिक[संपादन]
जत गावाच्या दक्षिणेला यल्लमा (रेणुका) देवीचे अर्वाचिन मंदिर् आहे. या देवीची यात्रा दक्षिण महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. या यात्रेत जनावरांचा मोठा बाजार भरतो. जत हे नाव कन्नड मधील बैल या प्रतिशब्दापासून उत्पत्ती पावले आहे असे मानले जाते.
जत तालुक्यातील गुड्डापूर हे गाव धान्नमा या देवतेचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. लिंगायत समाजाचे हे एक मोठे श्रद्धास्थान आहे .
बिळूर या गावचा भैरवनाथ प्रसिद्ध आहे. बनाळी या गावी बनशंकरी देवी चे प्रसिद्ध मंदीर अाहे. जतच्या दक्षिणेला 3 कि.मी.वर डोंगरावर भवानीमातेचे मंदीर आहे.हा मंदीर परीसर अत्यंत रमणिय आहे. मुचंडी या गावात दरेस्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
बाह्य दुवे[संपादन]
- "जत तालुक्यातील गावे". ७ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सांगली जिल्ह्यातील तालुके |
---|
शिराळा • वाळवा • तासगांव • खानापूर (विटा) • आटपाडी • कवठे महांकाळ • मिरज • पलूस • जत • कडेगांव |