राम नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राम नाईक
राम नाईक

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राम नाईक (डावीकडे)


विद्यमान
पदग्रहण
२२ जुलै २०१४
मागील अझीझ कुरेशी

कार्यकाळ
इ.स. १९८९ – इ.स. २००४
मागील अनुपचंद शाह
पुढील गोविंदा आहूजा
मतदारसंघ उत्तर मुंबई

जन्म १६ एप्रिल, १९३४ (1934-04-16) (वय: ८७)
आटपाडी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास मुंबई
धर्म हिंदू

राम नाईक (जन्म: एप्रिल १६, इ.स. १९३४) या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. राम नाईक यांनी वयाच्या ३५व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात गेले; खासदार, केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम मंत्री होते.

या कालावधीत त्यांनी कर्करोगावरही मात केली.

जुलै २०१४ पासून राम नाईक उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत.

आत्मचरित्र[संपादन]

राम नाईक यांनी 'चरैवेति! चरैवेति!!' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राला महाराष्ट्र सरकारचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळाला आहे.

संदर्भ[संपादन]