Jump to content

गंधर्वगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


गंधर्वगड
नाव गंधर्वगड
उंची
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण कोल्हापूर,चंदगड तालुका, महाराष्ट्र
जवळचे गाव कोल्हापूर,चंदगड,गडहिंग्लज
डोंगररांग कोल्हापूर
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


गंधर्वगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच गंधर्वगड हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचे मुख्य गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

गंधर्वगड हे नाव काहीसे काव्यात्मक असले तरी गंधर्वगड हा एक किल्ला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात हा किल्ला असून चंदगडापासून १२ ते १३ कि. मी. अंतरावरील एका पठारावर आहे. किल्ल्यामध्येच गंधर्वगड नावाचे गाव आहे.

कसे जाल ?

[संपादन]

कोल्हापूर, निपाणी, गडहिंग्लज ते चंदगड असा गाडी मार्ग आहे. कोल्हापूरकडून चंदगडाकडे जाताना चंदगडाच्या अलिकडे १० कि.मी. अंतरावर वाहकुली गावाचा फाटा आहे. रस्त्याच्या डावीकडे फुटणाऱ्या या फाट्यावर सध्या एक कमान उभी केली आहे. या फाट्यापासून गंधर्वगडावर जाणारा गाडीरस्ता केलेला आहे. या गाडीरस्त्याने गडाच्या पदरामधील वाळकुळी गाव लागते. गावातून पंधरा मिनिटांच्या चालीनेच आपण गडावर पोहोचू शकतो अथवा गाडीमार्गाने डोंगराला वळसा घालूनही माथ्यावर जाता येते. वाळकुळी गावाकडून आपण गंधर्वगडाची चढाई करतो.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

तुटलेल्या तटबंदीमधून आपला गडप्रवेश होतो. या बाजूला ढासळत चाललेल्या तटबंदीमध्ये दोन तीन बुरुज तग धरून उभे असलेले दिसतात. या तटबंदीमध्ये चोरवाट आहे पण ती ढासळलेल्या चिऱ्यामुळे पुर्णतया बुजून गेलेली आहे. तटबंदीजवळ एक दहा फूट खोलीची छोटीसी विहीर आहे. विहीरीच्या तळाला एका कोपऱ्यात पाणी पाझरलेले दिसत होते. गंधर्वगडावरील चाळोबा हे गावातील लोकांचे ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान. या जुन्या छोट्याशा मंदिराचा पुर्णतया कायापालट करून नवे मोठे मंदिर गावकऱ्यांनी उभारलेले आहे. मंदिरात चाळोबाचा मुखवटा आहे. मंदिराच्या परिसरात विरगळी पडलेल्या आहेत. बाजूलाच एका वास्तुचा भव्य चौथरा आहे. मंदिराच्या जवळ असलेल्या शाळेच्या परिसरात काही वर्षापुर्वीपर्यंत गडकरी हेरेकर सावंत यांच्या वाड्याचे अवशेष होते. ते सर्व गावकऱ्यांनी नष्ट करून टाकले व तेथे मुलांना खेळण्यासाठी सपाट मैदान केले. गंधर्वगडाचे गडपण अंशाअंशाने कमी होत चालले आहे. इतरत्र अजूनही काही चौथरे आढळतात. गडाच्या माथ्यावरून महिपालगड आणि कलानंदीगड तसेच ताम्रपर्णी नदीचे खोरे दिसते.

इतिहास

[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये गंधर्वगडाची नोंद आहे. या शिवकालीन किल्ल्याची इ.स. १८४४ मध्ये इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर नासधूस केली.