मार्च २
Appearance
(२ मार्च या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६० वा किंवा लीप वर्षात ६१ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]- १७९१ - पॅरिसमध्ये सेमाफोर यंत्राचे प्रथमतः प्रात्यक्षिक.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३६ - टेक्सासच्या प्रजासत्ताकने स्वतःला मेक्सिको पासून स्वतंत्र जाहीर केले.
- १८४४ - विरेश्वर छत्रे यांनी मित्रोदय सुरू केले
- १८५५ - अलेक्झांडर दुसरा रशियाच्या झारपदी.
- १८५७ - मुंबई येथे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स सुरू झाले.
- १८६१ - झार अलेक्झांडर दुसऱ्याने रशियातील गुलामगिरी बंद केली.
- १८७७ - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी सॅम्युएल जे. टिल्डनला मताधिक्य असूनही अमेरिकन काँग्रेसने रदरफोर्ड बी. हेसला अध्यक्षपदी बसवले. .
- १८८८ - कॉॅंन्स्टेन्टिनोपलचा करार स्वीकृत. ईजिप्तने युद्ध वा शांतिकालात सुएझ कालव्यातून जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली.
विसावे शतक
[संपादन]- १९१७ - रशियात झार निकोलस दुसऱ्याने पदत्याग केला. त्याचा भाउ मायकेल झारपदी.
- १९३९ - पायस बारावा पोपपदी.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई.
- १९४६ - हो चि मिन्ह व्हियेतनामच्या अध्यक्षपदी.
- १९४९ - कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
- १९५५ - कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानुकने पदत्याग केला. त्याचे वडील नोरोदोम सुरामारित राजेपदी.
- १९५६ - मोरोक्कोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६२ - म्यानमारमध्ये लश्करी उठाव.
- १९६९ - फ्रांसच्या तुलु शहरात स्वनातीत प्रवासी विमान कॉॅंकॉर्डची पहिली चाचणी.
- १९७० - ऱ्होडेशिया प्रजासत्ताक झाले.
- १९९१ - पहिले अखाती युद्ध - रमैलाची लढाई.
- १९९१ - एलटीटीई केलेल्या बॉम्बहल्ल्यात श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री ठार
- १९९२ - उझबेकिस्तान व मोल्डाव्हियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश. आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
- १९९५ - बारिंग्ज बँकच्या घोटाळ्यात निक लीसमला अटक.
- १९९६ - जॉन हॉवर्ड ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९९८ - गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की गुरूच्या उपग्रह युरोपा वर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - अफगाणिस्तानातील बामियान शहराजवळील सुमारे ६,००० प्राचीन बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली.
- २००४ - इराकवरील अमेरिकन आक्रमण - अल कायदाने अशुराचा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.
- २००४ - संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती.
- २००६ - पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.
- २००६ - भारत आणि अमेरिकेत परमाणु करार केला गेला.
जन्म
[संपादन]- १३१६ - रॉबर्ट दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १४५९ - पोप एड्रियान सहावा.
- १७४२ - विश्वासराव पेशवे, मराठा सरदार.
- १७९३ - सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- १८१० - पोप लिओ तेरावा.
- १८५५ - एडमुंड पीट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७६ - पोप पायस बारावा.
- १९१२ - चुड लॅंग्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - डॉन टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२५: - शांता जोग, मराठी चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री.
- १९३१ - मिखाईल गोर्बाचेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - राम शेवाळकर, मराठी साहित्यिक.
- १९३२ - बसंत सिंह खालसा, भारतीय राजकारणी.
- १९३७ - अब्देलअझीझ बुटेफ्लिका, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५७ - स्टु गिलेस्पी, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार.
- १९७७ - अँड्रु स्ट्रॉस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - दर्शना गमागे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - जिम ट्राउटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - मार्क व्हर्मुलेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - जयंत तालुकदार, भारतीय तिरंदाज.
मृत्यू
[संपादन]- ८५५ - लोथार, पवित्र रोमन सम्राट.
- १५६८ - मीरा रत्नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई.
- १७०० - छत्रपती राजाराम, मराठा छत्रपती.
- १७३० - पोप बेनेडिक्ट तेरावा.
- १७९१ - जॉन वेस्ली, मेथोडिस्ट चर्चचा स्थापक.
- १८३५ - फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १९२१ - निकोलस पहिला, मॉॅंटेनिग्रोचा राजा.
- १९३० - डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.
- १९४९ - सरोजिनी नायडू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९८६ - डॉ. काशिनाथ घाणेकर, मराठी चित्रपट अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २९ - मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - (मार्च महिना)