बामियानचे बुद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अलेक्जेंडर बर्नस द्वारा १८३२ मध्ये बमियानच्या बुद्धांचे चित्रण.

बामियानचे बुद्ध हे चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या ज्या अफगाणिस्तान मधील बामियान शहरा जवळ स्थित होत्या. या काबुलच्या २३० किलोमीटर (१४० मैल) वायव्य दिशेवर आणि २५०० मीटर (८२०० फुट) उंचीवर होत्या. यातील, लहान मूर्ती इ. स. ५०७ मध्ये बांधली होती आणि मोठ्या आकाराची मूर्ती इ. स. ५५४ मधील होती. ह्या अनुक्रमे ३५ मीटर (११५ फूट) आणि ५३ मीटर (१७४ फूट) उंचीच्या होत्या.[१] ह्या मूर्त्यांची गणना जगातील भव्य बुद्ध मूर्त्यां मध्ये होत असे.

मार्च २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या जिहादी संस्था तालिबानच्या मुल्ला मोहम्मद उमरच्या सांगण्यावर या मूर्त्या डायनामाइटने उडवल्या गेल्या. काही आठवड्यात संयुक्त अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमीरात चे दूत सईद रहमतुल्लाह हाशमी म्हणाले की त्यांनी मूर्त्या राखण्यासाठी मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय निधीच्या विरोधात हे केले आहे जेव्हा अफगाणिस्तान दुष्काळाला तोंड देत आहे.[२]

इतिहास[संपादन]

१९६३ मध्ये मोठी बुद्धमूर्ति आणि २००८ मध्ये विनाशा नंतर.

बामियान ऐतिहासिकदृष्ट्या रेशीम मार्गा वर स्थित हिंदुकुश पर्वतरांगांच्या बामियानच्या खोऱ्यात वसलेले शहर आहे. येथे अनेक बौद्ध मठ होते आणि यामुळे हे धर्म, तत्वज्ञान आणि कला यांचे समृद्ध केंद्र म्हणून विकसित झाले होते. बौद्ध भिक्खूंचे आसपासच्या लेण्यांमध्ये वास्तव्य होते आणि या लेण्या रंगीत भित्तीचित्रांनी सजवल्या होत्या. विशेषज्ञांचे असे मत आहे की हे भित्तीचित्र नंतरच्या काळात तयार केले आहेत.[३] दुसऱ्या शताकापासून ते सातव्या शताकाच्या दुसऱ्या सहामाहीत इस्लामिक आक्रमणे होईपर्यंत हे एक बौद्ध धार्मिक स्थळ होते. जोपर्यंत ९व्या शतकात मुस्लिम सफ्फारी राजवंशाने पूर्ण पकडले नव्हते तोपर्यंत बामियानने गंधाराची संस्कृती सामायिक केली. अनेक चीनी, फ्रेंच, अफगाणि आणि ब्रिटिश शोधक, भौगोलिक, व्यापारी आणि यात्रेकरूंच्या कथा व वर्णनांमध्ये बमियानच्या बुद्धांचा उल्लेख केला गेला आहे. मुघल शासक औरंगजेब आणि फ़ारसी शासक नादिर शाहने हल्ला करुन ह्या मूर्त्यांचे नुकसान केले.[४] मोठ्या बुद्ध मूर्तीचा पाय तोडण्यासाठी औरंगजेब कुप्रसिद्ध आहे.[३]

बांधणी[संपादन]

हिमाकुश पर्वतरांगेमध्ये बनविलेल्या ह्या मूर्त्या कच्ची लाल रेती, चिखल, दगडगोटे, क्वार्ट्झ, वालुकामय खडक आणि चुनखडी वापरून बनविले गेले आहेत. बांधकामानंतर सतत बदलत असलेल्या राजकीय आणि सामाजिक वातावरणामुळे यांची निगा राखली गेली नाही. या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी असले तरी बर्फ वितळताना मूर्त्या नष्ट होऊ लागल्या होत्या. हा प्रदेश भूकंपप्रवण आहे आणि आजतगायत अनेकदा भूकंप होऊन मूर्त्यांच्या आसपासचे अनेक मोठे खंड ढासळलेले दिसतात.[३]

निषेध[संपादन]

मार्च २००१ मध्ये जिहादी तालिबानांनी बामियानातील या बुद्ध मूर्त्या नष्ट केल्याचा निषेध बौद्ध राष्ट्रांसह संपूर्ण जागतिक स्तरावरून करण्यात आला. चीनमध्ये चिनी सरकारने या कृत्याचा निषेध म्हणून आपल्या देशात स्प्रिंग टेंपल बुद्ध या जगातील सर्वात मोठ्या बुद्ध पुतळ्याची निर्मिती केली.

चित्र[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Untersuchung von Zustand und Stabilität der Felsnischen der Buddha-Statuen von Bamiyan" (जर्मन मजकूर). म्यूनिखचे सैन्य विश्वविद्यालय. २८ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले. 
  2. ^ बार्बरा क्रोसेट (१९ मार्च २००१). "Taliban Explains Buddha Demolition" (इंग्रजी मजकूर). दि न्यू यॉर्क टाइम्स. २८ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले. 
  3. a b c K. Warikoo (२००४). Bamiyan: Challenge to World Heritage (इंग्रजी मजकूर). Pentagon Press. pp. १११. आय.एस.बी.एन. 9788186505663. 
  4. ^ Micheline Centlivres-Demont (२०१५). Afghanistan: Identity, Society and Politics Since 1980 (इंग्रजी मजकूर). I.B.Tauris. pp. १४३. आय.एस.बी.एन. 9781784530815. 


बाह्य दुवे[संपादन]