Jump to content

"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:BORI, Pune.jpg|thumb|right|350px|भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.]]
[[चित्र:BORI, Pune.jpg|thumb|right|350px|भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.]]
'''भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[पुणे]] शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .[[पुणे|पुण्यातील]] [[भांडारकर रस्ता]] किंवा [[विधी महाविद्यालय]] रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी [[डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ह्या संस्थेस भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.
'''भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[पुणे]] शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .[[पुणे|पुण्यातील]] [[भांडारकर रस्ता]] किंवा [[विधी महाविद्यालय]] रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी [[डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.

प्राच्यविद्या संशोधक डॉ. [[रा.ना. दांडेकर]] यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. संस्थेच्या डॉ. [[रा.ना. दांडेकर]] ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी २० हजार पुस्तके दुर्मिळ आहेत. प्राकृत डिक्शनरी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे.

==इतिहास==
पहिल्या पिढीतील अभ्यासक आणि थोर समाजसेवक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी भांडारकर संस्थेची स्थापना केली. ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा योग साधून संस्था कार्यरत झाली. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या ताब्यात असलेला हस्तलिखितांचा ठेवा १९१८ मध्ये संस्थेकडे देणगी म्हणून सोपविण्यात आला.

==महाभारताची चिकित्सक आवृत्ती==
संस्थेने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. [[विष्णू सीताराम सुखठणकर]] यांची महाभारत प्रकल्पाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाला ब्रिटिश अ‍ॅकॅडमीने अर्थसाह्य केले होते. सुखटणकर यांच्या निधनानंतर [[श्रीपाद कृष्ण बेलवलकर]] यांच्याकडे संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली. १९४३ मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमास स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रपती झालेले डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] उपस्थित होते. तर, १९६८ मध्ये झालेल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती डॉ. [[झाकीर हुसेन]] उपस्थित होते.

==प्राच्य विद्या परिषद==
अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद (ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्स) ही भांडारकर संस्थेने दिलेली देणगी आहे. संस्कृत आणि प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधकांचे संमेलन असे या परिषदेचे स्वरूप असून आतापर्यंत देशभरात विविध ठिकाणी ४७ परिषदा झाल्या आहेत.


==ग्रंथभांडार==
==ग्रंथभांडार==

२२:२९, १२ जुलै २०१६ ची आवृत्ती

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही महाराष्ट्रामधील पुणे शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .पुण्यातील भांडारकर रस्ता किंवा विधी महाविद्यालय रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.

प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा.ना. दांडेकर यांनी ५४ वर्षे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या मानद सचिवपदाची धुरा सांभाळली होती. संस्थेच्या डॉ. रा.ना. दांडेकर ग्रंथालयामध्ये भारतीय आणि युरोपियन भाषेतील सव्वा लाख पुस्तकांचा समावेश असून त्यापैकी २० हजार पुस्तके दुर्मिळ आहेत. प्राकृत डिक्शनरी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प संस्थेने पूर्णत्वास नेण्याकडे वाटचाल केली आहे. केवळ अभ्यास आणि संशोधन या कार्यालाच वाहून घेतलेल्या अभ्यासकांची पिढी घडविण्याचे कार्य संस्थेने केले आहे.

इतिहास

पहिल्या पिढीतील अभ्यासक आणि थोर समाजसेवक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि हितचिंतकांनी भांडारकर संस्थेची स्थापना केली. ६ जुलै १९१७ रोजी भांडारकर यांच्या सहस्रचंद्रदर्शनाचा योग साधून संस्था कार्यरत झाली. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या ताब्यात असलेला हस्तलिखितांचा ठेवा १९१८ मध्ये संस्थेकडे देणगी म्हणून सोपविण्यात आला.

महाभारताची चिकित्सक आवृत्ती

संस्थेने १९१९ मध्ये महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. विष्णू सीताराम सुखठणकर यांची महाभारत प्रकल्पाच्या संपादकपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाला ब्रिटिश अ‍ॅकॅडमीने अर्थसाह्य केले होते. सुखटणकर यांच्या निधनानंतर श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याकडे संपादकपदाची धुरा सोपविण्यात आली. १९४३ मध्ये संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमास स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रपती झालेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपस्थित होते. तर, १९६८ मध्ये झालेल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमास राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन उपस्थित होते.

प्राच्य विद्या परिषद

अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद (ऑल इंडिया ओरिएन्टल कॉन्फरन्स) ही भांडारकर संस्थेने दिलेली देणगी आहे. संस्कृत आणि प्राच्यविद्या क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधकांचे संमेलन असे या परिषदेचे स्वरूप असून आतापर्यंत देशभरात विविध ठिकाणी ४७ परिषदा झाल्या आहेत.

ग्रंथभांडार

भांडारकर संस्थेतील ग्रंथालयात(लायब्ररी)ग्रंथाचे प्रामुख्याने चार विभाग करण्यात आले आहेत.

  1. हस्तलिखित(Manuscripts)ग्रंथ विभाग.
  2. प्रकाशन विभाग.
  3. संशोधन विभाग.
  4. महाभारत विभाग.

बाह्य दुवे