Jump to content

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक या पानावरून पुनर्निर्देशित)
विल्हेम रॉंटजेन (१८४५–१९२३)हे पहिले नोबेल पारितोषिक विजेते होते. त्यांनी क्ष-किरणांचा शोध लावला

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (स्वीडिश:नोबेलप्राइसेट इ फिसिक) हे स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटकडून दरवर्षी प्रदान करण्यात येणारे पारितोषिक आहे. आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे हे पारितोषिक १९०१पासून दरवर्षी दिले जाते. या शाखेतील पहिले पारितोषिक विल्हेल्म रॉन्टजेनला त्याच्या क्ष-किरणांचा शोध लावून मानवजातीची असाधारण सेवा केल्याबद्दल देण्यात आले.

हे पारितोषिक इतर चार शाखांमधील पारितोषिकांबरोबर देण्यात येते - रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता. नोबेल फाउंडेशनद्वारे नियमन केली जाणारी ही पारितोषिके सहसा जगातील सर्वोच्च सन्मान समजली जातात. आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युदिवशी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.[]

उमेदवारी आणि निवड

[संपादन]

दरवर्षी जास्तीत जास्त दोन शोध व तीन व्यक्तींना हे पारितोषिक दिले जाते.[] इतर नोबेल पारितोषिकांपेक्षा भौतिकशास्त्रातील पारितोषिकाची उमेदवारी व निवड प्रक्रिया जास्त कठीण समजली जाते. यामुळे या पारितोषिकाचे महत्त्व वाढले आहे.[]

द रॉयल स्वीडिश अकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे पाच सदस्य निवडसिमतीवर असतात. सुरुवातीला हजारे व्यक्तींकडून उमेदवारी सूचना मागवल्या जातात. यातून एक-एक करीत नावे गाळली जातात व शेवटी फक्त विजयी उमेदवार यादीत उरतात. ही लांबण लागणारी प्रक्रिया आल्फ्रेड नोबलच्या स्वतःच्या आग्रहाखातर ठरवण्यात आली आहे. कदाचित उमेदवारांचे अशा खोलीत जाउन संशोधन करण्याच्या रिवाजामुळेच या पारितोषिकाचे महत्त्व वाढले आहे.

दरवर्षी सुमारे ३,००० अर्ज निवडक व्यक्तींना पाठविण्यात येतात. या व्यक्ती त्यांच्या माहितीतील संशोधकांची नावे (स्वतःचे नाव घालता येत नाही) व त्यांच्या कार्याबद्दलची माहिती पाठवतात. ही नावे प्रसिद्ध केली जात नाहीत व ज्यांची उमेदवारी लागलेली आहे त्यांना स्वतःलाही याची कुणकुण लागू दिली जात नाही. अर्थात, क्वचित ही नावे बाहेर पडतातच. पाठवण्यात आलेले अर्ज ५० वर्षे जाहीर न करता ठेवण्यात येतात. बऱ्याचदा संशोधक स्वतः किंवा त्यांच्या संशोधन-संस्थेचे भाटशाहीर आपला अर्ज पाठविण्यात आल्याचे जाहीर करतात. यात तथ्य असतेच असे नाही.

प्राथमिक छाननीनंतर या तीनेक हजार नावांतून निवडसमिती साधारण दोनशे नावे ठेवते व बाकी केराच्या टोपलीत जातात. ही नावे भौतिकशास्त्रातील व प्रत्येक संशोधकाच्या कार्यक्षेत्रातील तज्ञ-पंडितांकडे पाठविली जातात. या फेरीनंतर पंधरा नावे उरतात. ही नावे मग इन्स्टिट्यूटकडे येतात. येथे शेवटची छाननी होते व त्यावर्षीचे विजेते ठरविले जातात.

हे पारितोषिक मृत्युपश्चात दिले जात नाही पण अर्ज भरला गेल्यावर संशोधकाचा मृत्यू झाला तर ते नाव गाळण्यात येत नाही.

या पारितोषिकाची आणखी एक अट आहे की झालेले संशोधन काळाच्या परीक्षेतही उतरले पाहिजे. त्यामुळे संशोधन झाल्यावर साधारणतः वीसेक वर्षांनी ते पारितोषिकास लायक समजले जाते. उदा. १९८३तील सुब्रमण्यन चंद्रशेखरचे पारितोषिक विजेते संशोधन १९३० च्या सुमारास झाले होते पण १९७०-८० पर्यंत त्याची खात्री पटणेच शक्य नव्हते. या व मृत्युपश्चात न देण्याच्या नियमामुळे बरेच संशोधक या पारितोषिकास मुकतात.

पारितोषिक

[संपादन]

आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युदिवशी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.[]

१ कोटी स्वीडिश क्रोनाचे (अंदाजे १० लाख युरो; १४ लाख अमेरिकन डॉलर) बक्षिस त्या वर्षीच्या सगळ्या विजेत्यांत वाटून देण्यात येते.

नोबेल पदकाच्या समोरच्या बाजूस कारोलिन्स्का इन्स्टिट्यूट येथील नोबेल सभेचे पदक असा मजकूर व आल्फ्रेड नोबेलचे चित्र असते तर मागच्या बाजूस ढगांत असलेली व हातात कॉर्नुकोपिया घेतलेली देवीच्या रूपातील पृथ्वी व ग्रीक इतिहासातील जिनियस असतात.[]

हे पारितोषिक स्टॉकहोम नगरगृहात एका शाही समारंभात देण्यात येते[]

विजेत्यांची यादी

[संपादन]


१९०१पासून २०१० पर्यंत १८६ व्यक्तींना हे पारितोषिक दिले गेले आहे[]

वर्ष नाव देश स्तुती/शोध
१९०१ विल्हेम कॉन्राड रॉन्टजेन जर्मनी ध्वज जर्मनी क्ष-किरणांचा शोध लावल्याबद्दल
१९०२ हेन्ड्रिक लॉरेंट्झ
पीटर झीमन
Flag of the Netherlands नेदरलँड्स किरणोत्सर्गावरील चुंबकीयत्वाच्या परिणामावरील संशोधनाबद्दल. पहा झीमन इफेक्ट.
१९०३ हेन्री बेकरेल फ्रान्स ध्वज फ्रांस किरणोत्सर्गाचा शोध लावल्याबद्दल
पिएर क्युरी फ्रान्स ध्वज फ्रांस हेन्री बेकरेलने लावलेल्या किरणोत्सर्गावरच्या संशोधनाबद्दल.
मेरी क्युरी पोलंड ध्वज पोलंड


फ्रान्स ध्वज फ्रांस

१९०४ जॉन स्ट्रट Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम बहुतांशी वायुंचे वस्तुमान व आरगॉन या वायूचा शोध लावल्याबद्दल.
१९०५ फिलिप एडुआर्ड आंतोन फोन लेनार्ड जर्मनी ध्वज जर्मनी कॅथोड किरणांच्या बद्दल महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल.
१९०६ जे.जे. थॉमसन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम वायुंच्या विद्युतवाहक क्षमतेवर केलेल्या संशोधनाबद्दल
१९०७ आल्बर्ट अब्राहम मिकेलसन Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his optical precision instruments and the spectroscopic and metrological investigations carried out with their aid". See Michelson-Morley experiment.
१९०८ गॅब्रियेल लिपमन फ्रान्स ध्वज फ्रांस "for his method of reproducing colours photographically based on the phenomenon of interference"
१९०९ गुग्लियेल्मो मार्कोनी इटली ध्वज इटली बिनतारी दूरसंदेशवाहकच्या (रेडियो) शोधाबद्दल.
कार्ल फर्डिनांड ब्रॉन जर्मनी ध्वज जर्मनी
१९१० योहानेस डिडरिक व्हान डेर वाल्स Flag of the Netherlands नेदरलँड्स वायुरूप आणि द्रवरूपातील पदार्थांचे गुणधर्म दर्शविणारे गुणक शोधल्याबद्दल.
१९११ विल्हेल्म वियेन जर्मनी ध्वज जर्मनी उर्जाउत्सर्गाचे नियम शोधल्याबद्दल.
१९१२ निल्स गुस्ताफ डालेन स्वीडन ध्वज स्वीडन "invention of automatic valves designed to be used in combination with gas accumulators in lighthouses and light-buoys."
१९१३ हाइके कॅमरलिंघ-ऑन्स Flag of the Netherlands नेदरलँड्स अगदी कमी तपमानाच्या पदार्थांच्या गुणधर्मांविषयीच्या संशोधनाबद्दल, ज्यामुळे द्रवरूप हेलियम तयार करणेही शक्य झाले.
१९१४ मॅक्स फोन लॉउ जर्मनी ध्वज जर्मनी "For his discovery of the diffraction of X-rays by crystals."
१९१५ विल्यम हेन्री ब्रॅग
विल्यम लॉरेन्स ब्रॅग
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया


Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम

"For their services in the analysis of crystal structure by means of X-rays."
१९१६ पारितोषिक नाही दिले गेले prize purse allocated to the Special Fund of this prize section.
१९१७ चार्ल्स ग्लोव्हर बार्कला Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम "For his discovery of the characteristic Röntgen radiation of the elements."
१९१८ मॅक्स प्लॅंक जर्मनी ध्वज जर्मनी " क्वांटम बद्द्ल महत्त्वपूर्ण संशोधानाबद्दल पहा- प्लॅंक्स कॉन्स्टंट.
१९१९ योहानेस श्टार्क जर्मनी ध्वज जर्मनी "For his discovery of the Doppler effect in canal rays and the splitting of spectral lines in electric fields."
१९२० चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड "in recognition of the service he has rendered to precision measurements in Physics by his discovery of anomalies in nickel steel alloys"
१९२१ अल्बर्ट आइनस्टाइन जर्मनी ध्वज जर्मनी


स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड

"भौतिक शास्त्रात दिलेल्या अमूलाग्र योगदानाबद्दल व खासकरून फोटोइलेक्ट्रीक इफेक्ट व त्यासंदर्भात भौतिक नियम शोधल्याबद्दल"
१९२२ नील्स बोर डेन्मार्क ध्वज डेन्मार्क " अणूच्या संरचनेबद्दल व अणूतून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जनाबाबत केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल "
१९२३ रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his work on the elementary charge of electricity and on the photoelectric effect"
१९२४ मान सीगबान स्वीडन ध्वज स्वीडन " क्ष्-किरण स्पेक्ट्रोस्कोपीच्या शोधाबद्दल व त्याबाबत केलेल्या संशोधानाबद्दल"
१९२५ जेम्स फ्रांक
गुस्ताफ हेर्ट्झ
जर्मनी ध्वज जर्मनी "for their discovery of the laws governing the impact of an electron upon an atom"
१९२६ ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन फ्रान्स ध्वज फ्रांस "for his work on the discontinuous structure of matter, and especially for his discovery of sedimentation equilibrium"
१९२७ आर्थर कॉम्प्टन Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने " कॉप्टंन इफेक्ट या भौतिक तत्त्वाचा शोध लावल्याबद्दल.
चार्ल्स थॉमसन रीस विल्सन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम "for his method of making the paths of electrically charged particles visible by condensation of vapour". See cloud chamber.
१९२८ ओवेन विल्यन्स रिचर्डसन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम "for his work on the thermionic phenomenon and especially for the discovery of the law named after him"
१९२९ लुई दि ब्रॉग्ली फ्रान्स ध्वज फ्रांस "for his discovery of the wave nature of electrons". See De Broglie hypothesis.
१९३० चंद्रशेखर वेंकट रामन साचा:देश माहिती British Raj " प्रकाशाचे पसरण व रामन परिणामच्या शोधाबद्दल "
१९३१ पारितोषिक नाही prize purse allocated to the Special Fund for this prize.
१९३२ वर्नर हायझेनबर्ग जर्मनी ध्वज जर्मनी "for the creation of quantum mechanics, the application of which has, inter alia, led to the discovery of the allotropic forms of hydrogen"
१९३३ एर्विन श्रोडिंजर ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया " अणूशास्त्राच्या नवीन for the discovery of new productive forms of atomic theory"
पॉल डिरॅक Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९३४ पारितोषिक नाही prize purse allocated half to the Main Fund and half to the Special Fund for this prize.
१९३५ जेम्स चॅडविक Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम " न्युट्रॉनच्या शोधाबद्दल"
१९३६ व्हिक्टर फ्रांसिस हेस ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया " वैश्विक उत्सर्जनाच्या शोधाबद्दल"
कार्ल डेव्हिड अँडरसन Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने " पॉझिट्रॉनच्या शोधाबद्दल"
१९३७ क्लिंटन जोसेफ डेव्हिसन Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their experimental discovery of the diffraction of electrons by crystals". See wave-particle duality.
जॉर्ज पॅजेट थॉमसन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९३८ एन्रिको फर्मी इटली ध्वज इटली "for his demonstrations of the existence of new radioactive elements produced by neutron irradiation, and for his related discovery of nuclear reactions brought about by slow neutrons"
१९३९ अर्नेस्ट लॉरेन्स Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the invention and development of the cyclotron and for results obtained with it, especially with regard to artificial radioactive elements"
१९४० पारितोषिक नाही prize purse allocated half to the Main Fund and half to the Special Fund for this prize.
१९४१
१९४२
१९४३ ऑट्टो स्टर्न जर्मनी ध्वज जर्मनी


Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

"for his contribution to the development of the molecular ray method and his discovery of the magnetic moment of the proton"
१९४४ इसिदोर आयझॅक राबी Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his resonance method for recording the magnetic properties of atomic nuclei"
१९४५ वोल्फगांग अर्न्स्ट पॉली ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया "for the discovery of the Exclusion Principle, also called the Pauli principle"
१९४६ पर्सी विल्यम्स ब्रिजमन Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the invention of an apparatus to produce extremely high pressures, and for the discoveries he made there within the field of high pressure physics"
१९४७ एडवर्ड व्हिक्टर ऍपलटन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम "for his investigations of the physics of the upper atmosphere especially for the discovery of the so-called Appleton layer"
१९४८ पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम "for his development of the Wilson cloud chamber method, and his discoveries therewith in the fields of nuclear physics and cosmic radiation"
१९४९ हिदेकी युकावा जपान ध्वज जपान "for his prediction of the existence of mesons on the basis of theoretical work on nuclear forces". See Yukawa potential.
१९५० सेसिल फ्रँक पॉवेल Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम "for his development of the photographic method of studying nuclear processes and his discoveries regarding mesons made with this method"
१९५१ जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम "for their pioneering work on the transmutation of atomic nuclei by artificially accelerated atomic particles"
अर्नेस्ट थॉमस सिंटन वाल्टन आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक
१९५२ फेलिक्स ब्लॉक स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड "for their development of new methods for nuclear magnetic precision measurements and discoveries in connection therewith"
एडवर्ड मिल्स पर्सेल Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९५३ फ्रिट्स झेर्निके नेदरलँड्स "for his demonstration of the phase contrast method, especially for his invention of the phase contrast microscope"
१९५४ मॅक्स बॉर्न पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी


Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम

"for his fundamental research in quantum mechanics, especially for his statistical interpretation of the wavefunction"
वॉल्थर बोथ पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी "for the coincidence method and his discoveries made therewith"
१९५५ विलिस युजीन लॅम्ब Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his discoveries concerning the fine structure of the hydrogen spectrum". See Lamb shift.
पॉलिकार्प कुश Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his precision determination of the magnetic moment of the electron"
१९५६ विल्यम ब्रॅडफोर्ड शॉकली
जॉन बार्डीन
वॉल्टर हाउसर ब्रॅटैन
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their researches on semiconductors and their discovery of the transistor effect"
१९५७ चेन निंग यांग (楊振寧)
त्सुंग-दाओ ली (李政道)
Flag of the Republic of China चीनचे प्रजासत्ताक


Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

"for their penetrating investigation of the so-called parity laws which has led to important discoveries regarding the elementary particles"
१९५८ पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह
इलिया फ्रँक
इगॉर येवगेन्येविच टॅम
Flag of the Soviet Union सोव्हिएत संघ "for the discovery and the interpretation of the Cherenkov-Vavilov effect"
१९५९ एमिलियो जिने सेग्रे
ओवेन चेम्बरलेन
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their discovery of the antiproton"
१९६० डोनाल्ड आर्थर ग्लेसर Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the invention of the bubble chamber"
१९६१ रॉबर्ट हॉफश्टाटर Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his pioneering studies of electron scattering in atomic nuclei and for his thereby achieved discoveries concerning the structure of the nucleons"
रुडॉल्फ लुडविग मॉसबाउअर पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी "for his researches concerning the resonance absorption of gamma radiation and his discovery in this connection of the effect which bears his name". See Mössbauer effect.
१९६२ लेव्ह डेव्हिडोविच लॅंडाउ Flag of the Soviet Union सोव्हिएत संघ "for his pioneering theories for condensed matter, especially liquid helium"
१९६३ युजीन पॉल विग्नर हंगेरी ध्वज हंगेरी


Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

"for his contributions to the theory of the atomic nucleus and the elementary particles, particularly through the discovery and application of fundamental symmetry principles"
मारिया गेप्पर्ट-मायर
जे. हान्स डी. जेन्सन
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने


पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी

"for their discoveries concerning nuclear shell structure"
१९६४ चार्ल्स हार्ड टाउन्स Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for fundamental work in the field of quantum electronics, which has led to the construction of oscillators and amplifiers based on the maser-laser principle"
निकोलाय गेनाडीयेविच बासोव्ह Flag of the Soviet Union सोव्हिएत संघ
अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया


Flag of the Soviet Union सोव्हिएत संघ

१९६५ सिन-इतिरो तोमोनागा जपान ध्वज जपान "for their fundamental work in quantum electrodynamics, with deep-ploughing consequences for the physics of elementary particles"
जुलियन श्विंगर
रिचर्ड फाइनमन
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९६६ आल्फ्रेड कास्लर फ्रान्स ध्वज फ्रांस "for the discovery and development of optical methods for studying Hertzian resonances in atoms"
१९६७ हान्स आल्ब्रेख्त बेथ Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his contributions to the theory of nuclear reactions, especially his discoveries concerning the energy production in stars"
१९६८ लुइस वॉल्टर अल्वारेझ Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his decisive contributions to elementary particle physics, in particular the discovery of a large number of resonance states, made possible through his development of the technique of using hydrogen bubble chamber and data analysis"
१९६९ मरे गेल-मान Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his contributions and discoveries concerning the classification of elementary particles and their interactions". See Eightfold way.
१९७० हान्स ओलोफ गोस्टा आल्फव्हेन स्वीडन ध्वज स्वीडन "for fundamental work and discoveries in magneto-hydrodynamics with fruitful applications in different parts of plasma physics"
लुई युजीन फेलिक्स नेइल फ्रान्स ध्वज फ्रांस "for fundamental work and discoveries concerning antiferromagnetism and ferrimagnetism which have led to important applications in solid state physics"
१९७१ डेनिस गॅबोर Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम "for his in

vention and development of the holographic method"

१९७२ जॉन बार्डीन
लिओन नील कूपर
जॉन रॉबर्ट श्रीफर
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their jointly developed theory of superconductivity, usually called the BCS-theory"
१९७३ लियो एसाकी जपान ध्वज जपान "for their experimental discoveries regarding tunneling phenomena in semiconductors and superconductors, respectively"
आयव्हार जियेव्हर नॉर्वे ध्वज नॉर्वे


Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

ब्रायन डेव्हिड जोसेफसन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम "for his theoretical predictions of the properties of a supercurrent through a tunnel barrier, in particular those phenomena which are generally known as the Josephson effect"
१९७४ मार्टिन राइल
ॲंटोनी ह्युइश
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम "for their pioneering research in radio astrophysics: Ryle for his observations and inventions, in particular of the aperture synthesis technique, and Hewish for his decisive role in the discovery of pulsars"
१९७५ आगे नील्स बोह्र डेन्मार्क ध्वज डेन्मार्क "for the discovery of the connection between collective motion and particle motion in atomic nuclei and the development of the theory of the structure of the atomic nucleus based on this connection"
बेन रॉय मॉटलसन डेन्मार्क ध्वज डेन्मार्क


Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

लियो जेम्स रेनवॉटर Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९७६ बर्टन रिश्टर
सॅम्युएल चाओ चुंग तिंग
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their pioneering work in the discovery of a heavy elementary particle of a new kind". In other words: for discovery of the J/Ψ particle as it confirmed the idea that baryonic matter (such as the nuclei of atoms) is made out of quarks.
१९७७ फिलिप वॉरेन अँडरसन Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their fundamental theoretical investigations of the electronic structure of magnetic and disordered systems"
नेव्हिल फ्रांसिस मॉट Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९७८ प्योत्र लियोनिदोविच कापित्सा Flag of the Soviet Union सोव्हिएत संघ "for his basic inventions and discoveries in the area of low-temperature physics"
आर्नो ऍलन पेन्झियास
रॉबर्ट वूड्रो विल्सन
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their discovery of cosmic microwave background radiation"
१९७९ शेल्डन ली ग्लाशो Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their contributions to the theory of the unified weak and electromagnetic interaction between elementary particles, including, inter alia, the prediction of the weak neutral current"
अब्दुस सलाम पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
स्टीवन वाइनबर्ग Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९८० जेम्स वॉट्सन क्रोनिन
व्हाल लॉग्सडन फिच
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the discovery of violations of fundamental symmetry principles in the decay of neutral K-mesons". See CP-violation.
१९८१ निकोलास ब्लूमबर्गेन
आर्थर लियोनार्ड शॉलो
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their contribution to the development of laser spectroscopy"
कै मान बोर्ये सीगबान स्वीडन ध्वज स्वीडन "for his contribution to the development of high-resolution electron spectroscopy"
१९८२ केनेथ जी. विल्सन Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his theory for critical phenomena in connection with phase transitions"
१९८३ सुब्रमण्यन चंद्रशेखर भारत ध्वज भारत


Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

"for his theoretical studies of the physical processes of importance to the structure and evolution of the stars". See Chandrasekhar limit.
विल्यम आल्फ्रेड फाउलर Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his theoretical and experimental studies of the nuclear reactions of importance in the formation of the chemical elements in the universe"
१९८४ कार्लो रुब्बिया इटली ध्वज इटली "for their decisive contributions to the large project, which led to the discovery of the field particles W and Z, communicators of weak interaction"
सायमन व्हान डेर मीर Flag of the Netherlands Netherlands
१९८५ क्लाउस फोन क्लित्झिंग पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी "for the discovery of the quantized Hall effect"
१९८६ अर्न्स्ट रुस्का पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी "for his fundamental work in electron optics, and for the design of the first electron microscope"
गर्ड बिनिग पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी "for their design of the scanning tunneling microscope"
हाइनरिक रोहरर स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
१९८७ योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी "for their important break-through in the discovery of superconductivity in ceramic materials"
कार्ल अलेक्झांडर म्युलर स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
१९८८ लियॉन एम. लेडरमान
मेल्व्हिन श्वार्त्झ
जॅक स्टाइनबर्गर
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the neutrino beam method and the demonstration of the doublet structure of the leptons through the discovery of the muon neutrino"
१९८९ नॉर्मन फॉस्टर राम्से Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the invention of the separated oscillatory fields method and its use in the hydrogen maser and other atomic clocks"
हान्स जॉर्ज डेहमेल्ड पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी


Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

"for the development of the ion trap technique"
वोल्फगांग पॉल पश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी
१९९० जेरोम आय. फ्रीडमन
हेन्री वे केन्डॉल
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their pioneering investigations concerning deep inelastic scattering of electrons on protons and bound neutrons, which have been of essential importance for the development of the quark model in particle physics"
रिचर्ड ई. टेलर कॅनडा ध्वज कॅनडा
१९९१ पिएर-गिल्स दि जेन्स फ्रान्स ध्वज फ्रांस "for discovering that methods developed for studying order phenomena in simple systems can be generalized to more complex forms of matter, in particular to liquid crystals and polymers"
१९९२ जॉर्जेस चार्पाक फ्रान्स ध्वज फ्रांस "for his invention and development of particle detectors, in particular the multiwire proportional chamber"
१९९३ रसेल ऍलन हल्से
जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the discovery of a new type of pulsar, a discovery that has opened up new possibilities for the study of gravitation"
१९९४ बर्ट्राम ब्रॉकहाउस कॅनडा ध्वज कॅनडा "for the development of neutron spectroscopy" and "for pioneering contributions to the development of neutron scattering techniques for studies of condensed matter"
क्लिफर्ड ग्लेनवूड शुल Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the development of the neutron diffraction technique" and "for pioneering contributions to the development of neutron scattering techniques for studies of condensed matter"
१९९५ मार्टिन लुईस पर्ल Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the discovery of the tau lepton" and "for pioneering experimental contributions to lepton physics"
फ्रेडरिक राईन्स Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the detection of the neutrino" and "for pioneering experimental contributions to lepton physics"
१९९६ डेव्हिड मॉरिस ली
डग्लस डी. ओशेरॉफ
रॉबर्ट कोलमन रिचर्डसन
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their discovery of superfluidity in helium-3"
१९९७ स्टीवन चु Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for development of methods to cool and trap atoms with laser light" See Laser cooling.
क्लॉड कोहेन-तनूद्जी फ्रान्स ध्वज फ्रांस
विल्यम डॅनियेल फिलिप्स Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९९८ रॉबर्ट बी. लाफलिन Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their discovery of a new form of quantum fluid with fractionally charged excitations". See Quantum Hall effect.
होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर जर्मनी ध्वज जर्मनी
डॅनियेल सी. त्सुइ Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
१९९९ जेरार्डस ट हूफ्ट
मार्टिनस जे.जी. वेल्टमन
Flag of the Netherlands Netherlands "for elucidating the quantum structure of electroweak interactions in physics"
२००० झोर्स इवानोविच आल्फेरोव्ह रशिया ध्वज रशिया "for developing semiconductor heterostructures used in high-speed- and optoelectronics"
हर्बर्ट क्रोमर जर्मनी ध्वज जर्मनी
जॅक किल्बी Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for his part in the invention of the integrated circuit"
२००१ एरिक ऍलिन कोर्नेल Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for the achievement of Bose-Einstein condensation in dilute gases of alkali atoms, and for early fundamental studies of the properties of the condensates"
वोल्फगांग केटर्ले जर्मनी ध्वज जर्मनी
कार्ल वीमन Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
२००२ रेमंड डेव्हिस जुनियर Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for pioneering contributions to astrophysics, in particular for the detection of cosmic neutrinos"
मासातोशी कोशीबा जपान ध्वज जपान
रिकार्दो जियाकोनी Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for pioneering contributions to astrophysics, which have led to the discovery of cosmic X-ray sources"
२००३ अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह
व्हिटाली लाझारेविच जिन्झबर्ग
रशिया ध्वज रशिया ''अतिवाहकता व अतिद्र्व्यतेच्या सिद्धांतात अग्रेसर योगदानाकरिता''
ॲंथोनी जेम्स लेगेट Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२००४ डेव्हिड ग्रोस
एच. डेव्हिड पोलित्झर
फ्रँक विल्चेक
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने ''मजबूत संवादाच्या(strong interaction) सिद्धांतातील अपगामी स्वातंत्र्याच्या शोधासाठी ''
२००५ रॉय जे. ग्लॉबर Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने ''नेत्रीय स्पष्टपणासबंधित क्वांटम सिद्धांतातील योगदानासाठी"
जॉन एल. हॉल Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their contributions to the development of laser-based precision spectroscopy, including the optical frequency comb technique"
थियोडोर डब्ल्यु. हान्श जर्मनी ध्वज जर्मनी
२००६ जॉन सी. माथर
जॉर्ज एफ. स्मूट
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने "for their discovery of the blackbody form and anisotropy of the cosmic microwave background radiation"
२००७ आल्बर्ट फर्ट फ्रान्स ध्वज फ्रांस ''महाकाय magnatoresistance च्या शोधासाठी ''
पीटर ग्रुनबर्ग जर्मनी ध्वज जर्मनी
२००८ योइचिरो नाम्बु जपान ध्वज जपान


Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

"for the discovery of the mechanism of spontaneous broken symmetry in subatomic physics, which predicts the existence of at least three families of quarks in nature"
माकोतो कोबायाशी
तोशिहिदे मस्कावा
जपान ध्वज जपान
२००९ विलार्ड एस. बॉइल कॅनडा ध्वज कॅनडा


Flag of the United States अमेरिका

चार्ज कपल्ड डिव्हाइसच्या शोधासाठी[]
जॉर्ज ई. स्मिथ Flag of the United States अमेरिका
२०१० आंद्रे गाइम रशिया ध्वज रशिया


Flag of the Netherlands नेदरलँड्स

ग्राफीन या द्विमितीय पदार्थावरील महत्त्वाच्या प्रयोगांबद्दल[]
कॉन्सतांतिन नोव्होसेलोव्ह रशिया ध्वज रशिया


Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम

2011 सॉल पर्लमटर Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने ''दूरवरील सुपरनोव्हाच्या'[][१०] च्या(स्फोट पावणाऱ्या ताऱ्याच्या) निरीक्षणाने विश्वाच्या विस्ताराच्या गतीच्या शोधाबद्दल'

ब्रायन श्मिट

ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया


Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

ॲडम रियेस

Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
2012 सर्गे हारोश फ्रान्स ध्वज फ्रांस


"for ground-breaking experimental methods that enable measuring & manipulation of individual quantum systems."[११]

डेव्हिड जे. वाइनलॅंड

Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
  1. ^ a b "नोबेल पारितोषिक विजेत्याला काय मिळते". 2008-10-06 रोजी पाहिले.
  2. ^ नोबेल विजेत्यांना काय मिळते, accessed November 1, 2007.
  3. ^ नोबेल पारितोषिक निवड प्रक्रिया, एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, accessed November 5, 2007 (Flowchart).
  4. ^ "भौतिकशास्त्रातील नोबेल पदक". 2008-10-06 रोजी पाहिले.
  5. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ceremony नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  6. ^ भौतिशास्त्रातील नोबेल विजेते, नोबेल फाउंडेशन, accessed November 5, 2007. खालील माहिती फाउंडेशनकडून घेतलेली आहे.
  7. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; N09 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  8. ^ "The Nobel Prize in Physics 2010". Nobel Foundation. 2010-10-05 रोजी पाहिले.
  9. ^ "The Nobel Prize in Physics 2011". Nobel Foundation. 2011-10-04 रोजी पाहिले.
  10. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; The Nobel Prize in Physics 2011 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  11. ^ "The Nobel Prize in Physics 2012". Nobel Foundation. 9 October 2012 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]

नोंदी

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]