आल्फ्रेड नोबेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आल्फ्रेड नोबेल


आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल (जन्म - ऑक्टोबर २१, १८३३ स्टॉकहोम; मृत्यु - डिसेंबर १०, १८९६) हे एक स्वीडिश शास्त्रज्ञ होते.

प्रारंभीचे जीवन[संपादन]

नोबेलचा जन्म ऑक्टोबर २१, १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वतः शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले. यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आल्फ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधुचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतःला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामायटाचा शोध लावला.

डायनामायटामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले व नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्वीडिश क्रोनरांचे विश्वस्त मंडळ स्थापले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.

इ.स. १९५८ साली १०२ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनवण्यात आले; तेव्हा त्याला नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेलियम असे नाव देण्यात आले.