Jump to content

हॅड्रॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कण भौतिकशास्त्रामध्ये (Particle Physicsमध्ये), एक हॅड्रॉन म्हणजे मजबूत शक्तीने एकत्रितपणे दोन किंवा अधिक क्वार्क्सचा बनलेला एक संयुक्त कण. हॅड्रॉनचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. (१) बेरियाॅन्स म्हणजे विषम संख्येच्या क्वार्क्सपासून बनलेले-सामान्यत: तीन क्वार्क्सपासून. आणि (२) मेसॉन्स, सम संख्येच्या क्वार्क्सने बनलेले-सामान्यत: एक क्वार्क आणि एक अँटिक्वार्कपासून. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ही बॅरियॉनची उदाहरणे आहेत; तर पायन्स हे मेसाॅनचे उदाहरण आहे.

यांशिवाय, तीनपेक्षा जास्त व्हॅलेन्स क्वार्क्स असलेले "एक्झॉटिक" हॅड्रॉनही सापडले आहेत.