Jump to content

रामन परिणाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) हे भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांचे एक संशोधन असून यासाठी त्यांना इ.स १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देखील मिळाले होते.

पारदर्शक माध्यमामधून जेव्हा प्रकाश जातो तेव्हा त्याचे प्रकीर्णन (विखुरण्याची क्रिया) होते. माध्यमातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे वर्णपटलेखकाद्वारे विश्लेषण केले असता त्यामध्ये मूळ आपाती प्रकाशाच्या कंप्रतेशिवाय (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्येस कंप्रता म्हणतात) अत्यंत कमी तीव्रतेच्या अशा अनेक भिन्न प्रकाश कंप्रता आढळतात. या संशोधनाला 'रामन परिणाम' असे म्हणतात.[१]

  1. ^ रामन परिणाम