लघुतरंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऍनालॉग लघुतरंग रेडिओ

लघुतरंग (इंग्लिश : Shortwave)(लघुरूप-SW) म्हणजे रेडिओ प्रसारणासाठी वापरला जाणारा संवह वर्णपटापैकी ३,००० - ३०,००० kHz (३ - ३० MHz) या उच्च कंप्रतेच्या पट्ट्यातील तरंग होय. लघु तरंगलांबी उच्च कंप्रतेशी संबंधित असल्यामुळे, संवह-वर्णपटातील या वरच्या कंप्रतेच्या तरंगांची लांबी अगोदरच्या जुन्या रेडिओ दळणवळणातल्या मोठ्या लांबीच्या तरंगांपेक्षा आखूड असते. त्यामुळे या तरंगांना लघुतरंग असे नाव पडले. दीर्घ तरंगलांबीच्या रेडिओ प्रसारणाचे उदाहरण म्हणजे एएम प्रसारणासाठी वापरला जाणारा मध्यम तरंग पट्टा (१ MHz = ३०० मीटर तरंगांभोवतीचा).