रिचर्ड ई. टेलर
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
रिचर्ड ई. टेलर | |
पूर्ण नाव | रिचर्ड ई. टेलर |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | ![]() |
रिचर्ड ई. टेलर (२ नोव्हेंबर, इ.स. १९२९ – २२ फेब्रुवारी, इ.स. २०१८) हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म कॅनडातील एका छोटय़ाशा गावात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला. युद्धानंतर त्यांचे मेडिसीन हाट नावाचे अल्बर्टातील गाव जैविक व रासायनिक युद्धतंत्राचे संशोधन केंद्र बनले होते. १९४५ मध्ये अणुबॉम्बचा वापर झाला त्या वेळी टेलर यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. विज्ञान व गणितात त्यांची गती पाहून शिक्षकांनी त्यांना अल्बर्टा विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला, तेथे त्यांना भौतिकशास्त्रात एमएस करता आले. १९९२ मध्ये ते स्टॅनफर्डला आले , हाय एनर्जी फिजिक्स लॅबमध्ये काम करू लागले. फ्रान्समधील ओरसे येथील त्वरणकाच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतःची पीएच.डी. तीन वर्षे लांबणीवर टाकली होती. १९६१ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया येथे लॉरेन्स रॅडिएशन लॅब येथे काम केले, पण नंतर ते परत स्टॅनफर्ड लिनियर अॅक्सिलरेटर सेंटर येथे परत आले.
जीवन[संपादन]
संशोधन[संपादन]
नॅशनल अॅक्सिलरेटर लॅबोरेटरी या दोन किलोमीटर लांबीच्या रेषीय त्वरणक यंत्राच्या मदतीने त्यांनी बरेच प्रयोग केले होते. अणूतील अनेक उपकण कालांतराने शोधले गेले, त्यात क्वार्क या कणाचा शोध लागला नसता तर आपण गॉड पार्टिकल (हिग्ज बोसॉन) पर्यंतची वाटचाल करू शकलो नसतो.[१] या क्वार्क कणाचा शोध घेण्याच्या कामगिरीसाठी टेलर, जेरोम फ्रिडमन व हेन्री केण्डॉल यांना नोबेल मिळाले होते.
पुरस्कार[संपादन]
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सेस, नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी ऑफ लंडन या संस्थांचे ते मानद सदस्य होते.
- ऑर्डर ऑफ कॅनडा
- हुम्बोल्ट प्राइज
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ लोकसत्ता टीम. रिचर्ड एडवर्ड टेलर. Loksatta (Marathi भाषेत). 13-03-2018 रोजी पाहिले.
क्वार्क या कणाचा शोध लागला नसता तर आपण गॉड पार्टिकल (हिग्ज बोसॉन) पर्यंतची वाटचाल करू शकलो नसतो. या क्वार्क कणाचा शोध घेण्याच्या कामगिरीसाठी टेलर, जेरोम फ्रिडमन व हेन्री केण्डॉल यांना नोबेल मिळाले होते.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)