रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक
रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे दरवर्षी बहाल केल्या जाणाऱ्या ५ नोबेल पुरस्कारांपैकी एक आहे. रसायनशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक जॅकोबस हेनरिकस वॅन'ट हॉफ ह्या डच शास्त्रज्ञाला १९०१ या साली देण्यात आले.
ह्या पुरस्काराचे वितरण दरवर्षी १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम शहरात केले जाते.
१९०१ ते २०१९ या दरम्यान रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार १११ वेळा देण्यात आला. यामध्ये १८४ शास्त्रज्ञाना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. १८५८ आणि १९८० मध्ये रसायनशास्त्रात दोनदा नोबेल पारितोषिक फ्रेडरिक सेन्गर यांना देण्यात आले आहे. याचा अर्थ असा की २०१९ पर्यंत एकूण १८३ व्यक्तींना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे.
रसायनशास्त्र मधील नोबेल पारितोषिक - २०१९
रसायनशास्त्र २०१९ मधील नोबेल पुरस्कार जॉन बी गुडनॉफ, एम. स्टेनली व्हिटिंगहॅम आणि अकिरा योशिनो यांना "लिथियम-आयन बॅटरीच्या विकासासाठी संयुक्तपणे देण्यात आला."[१]
https://www.nobelprize.org/prizes/lists/all-nobel-prizes-in-chemistry