वोल्फगांग पॉली
Appearance
(वोल्फगांग अर्न्स्ट पॉली या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
वोल्फगांग पॉली | |
वोल्फगांग पॉली | |
पूर्ण नाव | वोल्फगांग पॉली |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
वोल्फगांग पॉली हे शास्त्रज्ञ होते.
वोल्फगांग पाउली हे जन्माने ऑस्ट्रियन असणारे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. जन्माने ऑस्ट्रियन असुनदेखिल त्यांची कर्मभुमी आयुष्यभर स्वित्झ्रर्लँड होती. पुंजयामिकीच्या प्रमुख शिल्पकारांमध्ये त्यांची गणना केली जाते.
पाउली हे त्यांच्या अपवर्जन तत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत. १९४५ सालचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना त्यांच्या याच शोधासाठी देण्यात आले. अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी त्यांचे नाव नोबेल पारितोषिकासाठी सुचवले होते. या शोधाबरोबरच त्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्रामध्ये अनेक महत्त्वाचे शोध लावले.
सुरुवातीचे आयुष्य
[संपादन]पाउली यांचा जन्म व्हिएन्ना या शहरात २५ एप्रिल १९०० रोजी झाला. त्यांचे वडील व्यवसायाने रसायनशास्त्रवेत्ता होते. १९१८ साली त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.