Jump to content

काळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काळ आणि अवकाश ह्या दोन कल्पना भिन्न मानून आणि काळ ही "गत क्षण", "आत्ताच़ा क्षण", आणि "भावी क्षण" ह्या तीन संज्ञांनी निदर्शवलेल्या क्षणांची एक गूढ अनादिअनंत "फीत" असल्यासारखे समज़ून आपण माणसे हज़ारो वर्षे रोज़चे व्यवहार करत आलो आहोत, पण विसाव्या शतकाचा सुरुवातीला अल्बर्ट आइनस्टाइनने प्रसिद्ध केलेल्या "तौलनिक सिद्धांता"नुसार काळ आणि अवकाश ह्या दोन कल्पना भिन्न नसून काळ-अवकाश ही एक संलग्न कल्पना आहे. (ह्या कल्पनेतल्या संलग्नतेच़े महत्त्व फक्त अतिसूक्ष्म आणि अतिविशाल घटनांच़ा विचार करतानाच़ तेवढे असते.) आइन्स्टाइनचा सिद्धांतानुसार काळ ही च़तुर्मितीय विश्वाचा चार मितींपैकी एक मिती आहे. उरलेल्या तीन मिती म्हणजे त्रिमितीय अवकाशाचा तीन मिती.

स्मृती आणि कल्पनाशक्ती ही माणसाचा अतिविकसित बुद्धीची दोन मुख्य अंगे आहेत. त्यांचामुळे "गत काळ" आणि ""भावी काळ" ह्या दोन कल्पना आणि त्या काळांमधल्या घटनांसंबंधी विचार आपण माणसे "आत्ताचा क्षणा"संबंधित विचारांसमवेत करू शकतो आणि सतत करत असतो. असे असूनही आपण सगळे आपापली आयुष्ये अनुभवत असतो फक्त आत्ताचा क्षणी. प्रत्येक क्षणी "आत्ताच़ा क्षण" "गत काळा"तल्या क्षणांचा महासागरात गूढपणे विलीन होऊन "गत क्षण" ही संज्ञा धारण करत रहातो, आणि त्याच क्षणी एक गूढ "भावी क्षण" "आत्ताच़ा क्षण" अशा संज्ञेने क्षणमात्र राज्यारूढ होतो! हा एक सगळा सृष्टीतला महान चमत्कार खास आहे, पण आयुष्य जगण्याचा रोज़चा धांदलींमधे आपणा बहुतेक माणसांना त्या चमत्काराची ज़ाणीव क्वचितच़ असते.

व्याख्या

[संपादन]

काळाची व्याख्या दोन भिन्न प्रकारे करण्यात येते. एक गणितातला अमूर्त काळ आणि दुसरा भौतिकशास्त्रातला मूर्त काळ. गणितात "काळ" ही गोष्ट वास्तविक अनेक मितींपैकी फक्त एक मिती आहे. भौतिकशास्त्रातल्या काळाचे मूर्त गुणधर्म गणितात अमूर्त रूपांत प्रदर्शित होतात. म्हणजे भौतिकशास्त्रातल्या काळाचे मूर्त गुणधर्म गणितात प्रच्छन्न रहातात.


गणितातल्या काळाची व्याख्या

[संपादन]

मिती म्हणजे कोणत्याही वस्तूच़े/स्थितीच़े स्वरूप व्यक्त करण्यासाठी लागणारे विभिन्न परिमाण. विभिन्नता म्हणजे विशेष भिन्नता. पहा : गणितातील मिती. मितीची ही व्याख्या गणितातल्या काळाच्या व्याख्येला लागू आहे.

च़तुर्मितीय विश्व त्रिमितीय स्वरूपामध्ये द्विमितीय पडद्यावर

भौतिकशास्त्रातल्या काळाची व्याख्या

[संपादन]

भौतिकशास्त्रातल्या काळाची (किंवा कालमितीची) व्याख्या अशी :

कोणत्याही वस्तूचा अवकाशस्थितीतला बदल दाखवते ती कालमिती.


घड्याळातल्या सेकंदकाट्याची "हालच़ाल", हृदयातल्या ठोक्यांची "हालच़ाल", ऋणविद्युद्रासायनिक हालच़ालींद्वारे आपल्या मेंदूत च़ाललेली "हालच़ाल"--विचारांची ये-जा-- वगैरे कुठल्याना कुठल्या वस्तूतल्या बदलाचा --"हालचाली"चा-- निरीक्षणामुळेच़ काळ ह्या अमूर्त गोष्टीची कल्पना आपणा माणसांना शक्य होते.

कोणत्याही वस्तूच़े तापमान -२७३ अंश सेल्सिअस ह्या काल्पनिक (जास्तीत जास्त) अंशावर उतरले आणि त्या वस्तूतली अंतर्भूत ऊर्जा पूर्णपणे संपुष्टात आली तरच़ त्या वस्तूची किंवा वस्तूतली हालच़ाल पूर्ण थांबणे शक्य आहे! रस्त्याचा कडेला पडलेला दगड ज़री आपल्याला अविचल भासला तरी त्या दगडाच़े तापमान -२७३ अंश सेल्सिअस अंशाहून खूपच़ जास्त असल्याने त्या दगडातल्या अंतर्भूत ऊर्जेपायी त्याचा आत प्रत्येक अणूची आणि प्रत्येक अणूचा आत ऋण परिंमाणूंसारख्या --electrons-- परिंमाणूंची "हालच़ाल" अविरत च़ालू असते! परिणामी ह्या विश्वातल्या प्रत्येक लहानमोठ्या वस्तूत "कालौघा"त अविरतपणे च़ालू असलेला बदल हे एक ("कालौघ संपेपर्यंतच़े" आणि त्याबरोबरच़ प्रत्येक वस्तूतली ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईपर्यंतच़े!) "शाश्वत" सत्य आहे.

ऊर्जा, काळ, अवकाश, वस्तुमान (द्रव्य, वस्तूतले अणुपरिमाणू) आणि गुरुत्वाकर्षण ही सृष्टीतली अगदी "अविश्वसनीय" अशी आश्चर्ये आहेत.

ऊर्जा, काळ, अवकाश, वस्तुमान आणि वस्तूंमधला अविरत स्थितिबदल ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कशा निगडित आहेत ते वरचा संक्षिप्त वर्णानातून प्रदर्शित होते.

विश्वाची निर्मिती महास्फोटातून झ़ाली असा बऱ्याच़ विश्वघटनाशास्त्रज्ञांच़ा एक सिद्धांत आहे. पण त्या सिद्धांताबाबत अज़ून गूढे आहेत. महास्फोटापूर्वी वस्तुविश्वच़ अस्तित्वात नसल्याने काळही अस्तित्वात नव्हता असा निष्कर्ष ह्या सिद्धांतातून निघतो! महास्फोटाचा घटनेपूर्वी काळ अस्तित्वात नसावा आणि "कधी काळी" काळ संपुष्टात येईल ह्या कल्पना माणसाची मती गुंग करतात. (वास्तविक महास्फोटासारख्या कुठल्याही "घटने"ची कल्पना "काळ" ह्या गोष्टीचा कल्पनेवाच़ून अशक्य आहे!)

काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण

[संपादन]

पहा :काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण .कालमापन

[संपादन]

पहा :कालमापन.