उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उर्जा निर्माण क‍रता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते हा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम आहे.

विश्वातील सर्व उर्जा कायम स्थिर आहे. ती केव्हाही नष्ट होणार नाही. मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होऊ शकते.

उदा. आपण विद्युत उर्जेचे लाउडस्पीकरच्या साहाय्याने ध्वनी उर्जेत रूपांतर करु शकतो.