Jump to content

वस्तुमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भौतिकशास्त्रानुसार, एखाद्या पदार्थाचे वस्तुमान, अर्थात वस्तुता (इंग्लिश: Mass, मास) (आंगप एककः किग्रा.) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण वस्तूचे मोजमाप होय [१]. पदार्थाच्या जडत्वावरूनही वस्तुमान ठरवतात[१].

पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. वस्तू कितीही सूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच आणि वस्तुमान असले म्हणजे वजनही असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण स्थानपरत्वे गुरुत्वाकर्षण बदलू शकते.  परंतु विश्वात त्या पदार्थाचे वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदल होत नाही. गुरुत्वाकर्षण बल सारखे असेल, तर वस्तुमानाच्या समप्रमाणात वजन बदलते.hxjxndkdhsjsjdjjd

मापन[संपादन]

वस्तुमान ही एक मूलभूत भौतिक राशी आहे. वस्तुमानाचे आंतरराष्ट्रीय गणना (SI) पद्धतीतील एकक किलोग्रॅम असून, सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद (CGS) पद्धतीतील एकक ग्रॅम आहे.

वजनाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर CGS पद्धतीतील एकक डाईन हे आहे. परंतु दैनंदिन व्यवहारात वजनाचे माप म्हणून वस्तुमानाची ग्रॅम, किलोग्रॅम ही एकके वापरली जातात. वस्तुमान माहीत नसलेल्या वस्तूचे वस्तुमान मोजतांना ज्याचे वस्तुमान निश्चितपणे माहीत आहे अशा पदार्थाशी त्याची तुलना करून वस्तुमान ठरवले जाते. 

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. p. १७४.