अणुक्रमांक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रसायनशास्त्रभौतिकशास्त्रानुसार अणूच्या गाभ्यामधील (केंद्रामधील) प्रोटॉनांच्या एकूण संख्येला अणुक्रमांक (इंग्लिश: Atomic number, अटॉमिक नंबर ;) म्हणतात. तो Z या चिन्हाने दर्शवला जातो. आवर्त सारणीतील प्रत्येक मूलद्रव्याला एकमेवाद्वितीय अणुक्रमांक असतो. विद्युतभाररहित अणूमध्ये अणुक्रेंद्राबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्याही अणुक्रमांकाइतकी असते. ज्या अणूंमध्ये अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या, समान असून अणुभार मात्र भिन्न असतात, त्यांना समस्थानिक असे म्हणतात.

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.