Jump to content

चुंबकी बल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चुंबकीय बल या पानावरून पुनर्निर्देशित)

विद्युतचुंबकीत चुंबकी बल हे महत्त्वाचे बल असून ते गतिज विद्युत प्रभारामुळे प्रयुक्त होते, आणि म्हणून ते वेगावलंबी बल आहे. तथापि ते स्थितीज चुंबकी प्रभार म्हणजेच ध्रुवाने प्रयुक्त केलेले बल सुद्धा आहे आणि ते कुलोंब बलाची साधर्म्य दाखविते. तथापि गतिज प्रभार विद्युत बल आणि चुंबकी बल अनुक्रमे स्थितीज आणि गतिज अवस्थेत असताना दाखविते म्हणून विद्युत आणि चुंबकी बला ऐवजी लॉरेंझ बल ह्या सूत्रात अधिक सोप्या पद्धतीने मांडले जाते.

व्याख्या

[संपादन]

गतिज विद्युत प्रभारामुळे प्रयुक्त चुंबकी बल -

येथे,

F हे चुंबकी बल
qv हा गतिज प्रभार (v ह्या वेगाने जाणारा q हा विद्युत प्रभार)
B ही चुंबकी प्रतिस्थापना
x हा फुली गुणाकार

चुंबकी ध्रुवामुळे प्रयुक्त चुंबकी बल -

येथे,

F हे चुंबकी बल
μ0 हे अवकाश पार्यता किंवा चुंबकी स्थिरांक
m1, m2 हे दोन चुंबकी एकध्रुव
r हे अनुक्रमे पहिला चुंबकी ध्रुव आणि ज्याच्यावर बलप्रयुक्त आहे असा दुसरा चुंबकी ध्रुव