मूलभूत बले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आधुनिक भौतिकशास्त्रानुसार विश्वात केवळ खालील ४ प्रकारची बले आहेत. विविध भौतिक क्रियांमध्ये दिसणारी सर्व बले मूलतः याच बलांपैकी एका बलाची रूपे असतात. उदाहरणार्थ, घर्षणाचे बल हे विद्युतचुंबकीय बल आहे.

  • कठोर नाभिकीय आंतरक्रिया (strong interaction) - आण्वीय कणांना एकत्र ठेवणारे बल
  • सौम्य नाभिकीय आंतरक्रिया (weak interaction)- किरणोत्सार करणारे बल
  • गुरुत्व बल किंवा गुरुत्वाकर्षण
  • विद्युतचुंबकीय बल (पहा विद्युतचुंबकत्व)

या चार बलांना मूलभूत बले म्हणतात.