हिमालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
{{{सूचना}}}


तिबेट मधून दिसणारे एव्हरेस्ट शिखर

हिमालय ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. संस्कृत भाषेत हिमालय म्हणजे बर्फ (हिम) जेथे वास करते ते स्थान. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सर्वच ८,००० मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत. माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची ८,८४८ मीटर इतकी आहे. त्याखालोखाल के२कांचनगंगाचा क्रमांक लागतो. ह्या पर्वतरांगेची लांबी २,४०० कि.मी. पेक्षाही जास्त आहे. ती भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन,भूतान या देशांमधून जाते. हा पर्वत भारतीय उपखंडाच्या हवामानावर नियंत्रण राखतो. हिमालयाच्याच प्रभावाने भारतीय उपखंडावर मोसमी पाऊस पडतो तर त्याच्या उंचीमुळे उत्तरेकडील अतिथंड वारे रोखले जाउन भारतीय उपखंड सर्वकाळ उष्ण/उबदार रहाण्यास मदत होते. हिमालयात अनेक नद्या उगम पावतात ह्या नद्या भारत पाकिस्तान बांगलादेश व चीनमधील जवळपास १५० कोटी हून अधिक लोकसंख्या म्हणजे ३०-३५ टक्के मानवांच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू या हिमालयातील महत्त्वाच्या नद्या आहेत. त्यामुळेच जगातील सर्वात महत्त्वाच्या पर्वत रांगांमध्ये हिमालयाचा समावेश होतो.

भौगोलिक[संपादन]

जडणघडण[संपादन]

हिमालयाची जडणघडण

हिमालय पर्वत हा मुख्यत्वे गाळाने बनलेला पर्वत आहे व जगातील सर्वांत तरुण पर्वत असल्याचे मानण्यात येते. याची उत्पत्ती साधारणपणे इसवी सनापूर्वी १ कोटी ते ७० लाख या वर्षांदरम्यान झाली. भारतीय द्वीपकल्प हा मूळतः गोंडवन या महाखंडाचा भाग होता जो साधारणपणे आजच्या दक्षिण अफ्रिकेच्या जवळ होता. भारतीय द्वीपकल्पाने व ऑस्ट्रेलियाच्या प्रस्तराने उत्तरेकडे वेगाने वाटचाल केली. ही हालचाल एका वर्षात १५ सें.मी. या दराने होत होती. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा वेग खूप प्रचंड आहे. द्वीपकल्पयुरेशिया प्रस्तरामध्ये त्यावेळेस टेथिस नावाचा समुद्र अस्तित्वात होता. साधारणपणे १ कोटी वर्षांपूर्वी मुख्य आशिया खंडाची धडक झाली व टेथिस समुद्राचे अस्तित्व नष्ट झाले. परंतु यामुळे त्यामधील समुद्राने तयार झालेला गाळाचा भाग हलका असल्याने दबण्याऐवजी उंचावला गेला, जसजसे भारतीय उपखंड अजून आत येत गेले तसतसे हा भाग अजून उंचावला व हिमालयाची निर्मिती झाली. अजूनही भारतीय द्वीपकल्पीय प्रस्तराची वाटचाल तिबेटच्या खालील भागातून उत्तरेकडे होत आहे, त्यामुळे हिमालय अजूनही उंचावत आहे. या भौगोलिक घटनेमुळे ब्रम्हदेशातील पर्वतरांगा तसेच अंदमान निकोबार हे द्वीपसमूह तयार झाले.

भारतीय द्वीपकल्प व ऑस्ट्रेलियन प्रस्तर हे वार्षिक ६७ मिलिमीटर ह्या गतीने सरकत आहेत. पुढील १ कोटी वर्षात भारतीय द्वीपकल्प अशिया खंडात अजून अंदाजे १५०० किमी इतके आत गेलेले असेल. यातील जवळपास २० मिलिमीटर अंतर हे हिमालयात समाविष्ट होते, ज्यामुळे हिमालयाची उंची अजूनही वाढत अाहे. हिमालय साधारणपणे वर्षाला ५ मिलिमीटर इतका उंच होत आहे. या जडणघडणीमुळे हिमालयाचा भाग हा भौगोलिक दृष्ट्या अतिशय नाजूक मानला जातो. म्हणूनच भूकंपाचे अनेक झटके हिमालयीन क्षेत्रात बसत असतात.

हिमनद्या व नद्या[संपादन]

के२, पाकिस्तान आणि जवळून वाहणारी एक हिमनदी.

हिमालय हा जगातील जवळपास १५० कोटी लोकांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत आहे. हिमालयात साधारणपणे जवळपास १५,००० विविध हिमनद्या आहेत ज्यात १२,००० वर्ग किमी इतके पाणी सामावले आहे. ७० किमी लांबीची सियाचीन हिमनदी ही अध्रुवीय प्रदेशातील दुसरी सर्वांत मोठी हिमनदी आहे. उत्तराखंडमधील गंगोत्री, यमुनोत्री, पिंडारी व काफनी हिमनदी, नेपाळ मधील एव्हरेस्टच्या सानिध्यातील खंबू हिमनदी ह्या काही प्रसिद्ध हिमनद्या आहेत.

हिमालयातील वरच्या भागातील नद्यांना हिम वितळून पाणी मिळत असल्याने या नद्या बारमाही वाहाणाऱ्या नद्या आहेत. या भागातील उंची खूप असल्याने विषुववृत्ताजवळ असूनही या भागात कायम बर्फ असते. या सर्व नद्या मुख्यत्वे २ मोठ्या नद्यांना जाऊन मिळतात.

This image shows the termini of the glaciers in the Bhutan-Himalaya. Glacial lakes have been forming rapidly on the surface of the debris-covered glaciers in this region during the last few decades.
  • पश्चिमवाहिनी नद्या या सर्व सप्त सिंधूच्या खोऱ्यात जाऊन मिळतात. यातील सिंधू नदी सर्वांत लांब असून ती तिबेटच्या पठारावरील कैलास पर्वताजवळ उगम पावते. उत्तरेकडे लडाखच्या पर्वत रांगांमधून पाकव्याप्त काश्मीरमधून प्रवास करते. असे मानतात की सिंधू नदी फार पूर्वी मध्य अशियातून जात होती. काराकोरम पर्वत अजून उंचावल्यावर सिंधू नदीचे पात्र अरबी समुद्राकडे वळाले. झेलम नदी, चिनाब नदी, रावी नदी, बियास नदी, सतलज नदी या सर्व नद्या मिळून सप्त सिंधू खोरे बनवतात. या सर्व नद्या सिंधू नदीत मिळून अरबी समुद्रास मिळतात.
  • हिमालयातील बहुतांशी नद्या गंगा-ब्रम्हपुत्रा खोऱ्याचा हिस्सा बनतात. गंगाब्रम्हपुत्रा ह्या यातील मुख्य नद्या आहेत. गंगा नदी उत्तराखंडमधील 'गोमुख' येथे उगम पावते तर ब्रम्हपुत्रा ही सिंधू नदी प्रमाणेच कैलास पर्वताजवळ उगम पावते. तिबेटच्या पठारावर प्रवास करत ती अरुणाचल प्रदेशात भारतात प्रवेश करते. गंगा व ब्रम्हपुत्रा बांग्लादेशात एकत्र येतात व पद्मा नदी बनून बंगालच्या उपसागराला मिळतात. दोन्ही नद्यांचे खोरे प्रचंड असल्याने त्यांनी आणलेला गाळही प्रचंड असतो. त्यामुळे जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश गंगा ब्रम्हपुत्रेच्या मुखापाशी तयार झाला आहे. यमुना, अलकनंदा, शरयू, कोसी, गंडकी या गंगा नदीच्या मुख्य उपनद्या आहेत.

वन्यजीवसृष्टी

धार्मिक महत्त्व[संपादन]

हिमालयाची उंची व भव्यता यामुळे प्राचीन कालापासून हिमालय भारतीयांना आकर्षित करत आला आहे. हिमालयाची अनेक वर्णने वेदांमध्ये आढळतात व त्याच्या स्तुतिपर अनेक रचना लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे हिंदू धर्मात हिमालयाला देवासमान स्थान आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे स्वर्गाला जाण्याचा मार्ग हिमालयातून जातो म्हणून पांडवांनी शेवटची यात्रा हिमालयात केली. हिमालयाला देवांचे वस्ती-स्थान म्हणून मानण्यात येते. कैलास पर्वतावर शिव आणि पार्वती निवास करतात असा समज आहे. मानस सरोवर व ॐ पर्वत हिंदूसाठी अतिशय पवित्र स्थळे आहेत. हिमालयातील उगम पावलेल्या नद्यांच्या काठांवर प्राचीन भारतीय संस्कृती विकसित झाली त्यामुळे देखील हिमालयाला आदरयुक्त स्थान आहे. अमरनाथ, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ तसेच नेपाळ मधील अनेक स्थळे हिंदूंसाठी अतिशय पवित्र आहेत. दरवर्षी हजारो लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणांना भेट देण्यास जातात.

बौद्ध धर्मीयांमध्येही हिमालयाला अनोखे महत्त्व आहे. हिंदू धर्मीयांप्रमाणेच तेही कैलास पर्वताला पवित्र मानतात.

गिर्यारोहण[संपादन]

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत