स्पाईसजेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पाइसजेट
SpiceJet Logo.gif
आय.ए.टी.ए.
SG
आय.सी.ए.ओ.
SEJ
कॉलसाईन
SPICEJET
स्थापना मे, २००५
हब
मुख्य शहरे
विमान संख्या २१ (अधिक १७ येण्याच्या मार्गावर)
मुख्यालय नवी दिल्ली, भारत
संकेतस्थळ संकेतस्थळ

स्पाईसजेट ही भारतामधील सन समूहाची स्वस्त दरात वैमानिक वाहतूक देणारी कंपनी आहे.[१] चेन्नई, तामिळनाडू येथे या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आहे आणि गुरगांव, हरयाणा येथे वाणिज्यिक कार्यालय आहे.[२] मे २००५ पासून विमानसेवा देण्यास सुरूवात करणा-या या कंपनीने २०१२ पर्यंत, भारतातील व्यापारी बाजारपेठ काबीज कुरुन एअर इंडिया, किंगफिशर एअरलाईन्स आणि गोएअरनंतर तिसरा क्रमांक पटकावलेला आहे.[३] फक्त एका प्रवाशाला विमानाने प्रवास करण्याची संधी स्पाईसजेटमुळे मिळालेली आहे. प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूकीचे काम स्पाईसजेट करते. अहमदाबाद, आगरताळा, अमृतसर, बगदोगरा, बेंगळुरू, चेन्नई, कोईमतूर, दिल्ली, गोवा, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, जबलपूर, कोची, कलकत्ता, मदुराई, मुंबई, पुणे, विशाखापट्टण, तिरुंचिरापल्ली, तूतिकोरीन आणि इतर काही आंतरराष्ट्रीय शहरांवरुन या कंपनीची विमाने उड्डाण करतात. प्रत्येक विमानामध्ये प्रवाशांव्यतिरिक्त २ ते ३.५ टन माल वाहून नेउुन विमानाची संपूर्ण क्षमता वापरलेली जाते.[४]

इतिहास[संपादन]

१९९३-१९९६ : मोदीलुफत इरा

स्पाईसजेटचा इतिहास फेब्रुवारी १९९३ पासून सुरु झालेला आहे. भारतीय उदयोजक, एस.के.मोदी यांनी जर्मनीच्या लुप्तन्ससोबत भागीदारीमध्ये विमान वाहतुकीचा व्यापार चालू केलेला असल्यामुळे ‘ मोदीलुप्त ’ या नावाने ही कंपनी उदयाला आली. एस.के.मोदी, आशुतोष दयाल शर्मा आणि कनवार के.एस.जमवाल यांनी एकत्रितपणे या व्यापाराला सुरुवात केली आणि ५ मे १९९३ रोजी नवी दिल्ली वरुन मुंबईसाठी पहिले उड्डाण घेतले. प्रवाशांमध्ये प्रथम, बिझनेस आणि इकॉनॉमि असे तीन वर्ग असलेली ही एकमेव कंपनी होती. सुरूवातीस जोमाने चालणा-या या कंपनीमध्ये नंतर अंतर्गत मतभेदामुळे वादविवाद झाले. २००४ मध्ये अजय सिंग या उदयोजकाने ही कंपनी ताब्यात घेतली. त्यावेळी ‘मोदीलिप्ट’ वरुन कंपनीचे नांव ‘स्पाईसजेट’ असे करण्यांत आले.[५]

२००५-२०१२ : आरंभ आणि वाढ

२४ मे २००५ रोजी स्पाईसजेटचे पहिले बोईंग ७३७-८०० विमान दिल्ली वरुन मुंबईसाठी रवाना झाले. २००५ नंतर स्पाईसजेट ने विमान प्रवासाच्या वाहतूकीच्या क्षेत्रात भरारी मारली आणि व्यापारी बाजारपेठ काबीज केले. २०११ च्या सुमारास विमान इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ही कंपनी आर्थिक गर्तेत सापडली.[६] परंतू यावर सुद्धा कंपनीच्या मॅनेजमेंटने इंधन आयात करण्याचा तोडगा शोधून काढलेला होता.[७]

२०१३ आणि त्यानंतरची स्थिती

१६ डिसेंबर २०१३ रोजी स्पाईसजेटने पहिली इंटरलाईन सेवा प्रवाशांना उपलब्ध करुन दिलेली आहे.

अंतर[संपादन]

स्पाईसजेटची विमाने सध्या ३३० उड्डाणाव्दारे दररोज ५७ स्थानकांवरून (४७ भारतीय आणि १० आंतरराष्ट्रीय) प्रवास करते. बोईंग ७३७ - ८०० आणि - ९०० ईआर ही विमाने प्रथम स्तर शहरांतून आणि बोम्बार्डीअर डॅश ८ क्यू ४०० हे विमान व्दितीय आणि तृतीय स्तराच्या शहरांतून प्रवास करते. ५ वर्षाच्या यशस्वी व्यापारानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने स्पाईसजेटला ७ सप्टेंबर २०१० पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणास परवानगी दिली.[८] ७ ऑक्टोबर २०१० पासून दिल्ली विमानतळावरुन पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण केले. एप्रिल २०११ पासून बॉम्बार्डीअर क्यू ४०० विमानाच्या उड्डाणासाठी स्पाईसजेटने हैद्राबादचे राजीव गांधी आंरराष्ट्रीय विमानतळ विश्रांतीस्थळ म्हणून निवडले. हैद्राबाद विमानतळावरुन औरंगाबाद, बेळगांव, भुवनेश्वर, गोवा, इंदूर, मदुराई, मंगलोर, नागपूर, नाशिक, रायपूर, राजामुंद्री, तिरुपती, आणि विजयवाडा येथे नवीन उड्डाणे सुरु केलेली आहेत.[९] १२ जानेवारी २०१२ रोजी स्पाईसजेटच्या ताफयात नवीन ७३७-८०० या नवीन बोईंग विमानाची भर पडली आहे.

प्रवाशांची संख्या (एकूण)
वर्ष गर्दी
२००८ ४३९७
२००९ ४८१९
२०१० ६८०७
२०११ ८६३९
२०१२ १०३२२

उड्डाण[संपादन]

फेब्रुवारी २०१४ रोजी कंपनीच्या ताफयात असलेली विमाने खालीलप्रमाणे आहे.

विमाने सेवेमधील मागणी प्रवासी (इकॉनॉमि) शेरा
बोईंग ७३७-८०० ३७ १३ १८९ १९ भाडेतत्त्वावरील
बाईंग ७३७ मॅक्स - ४२ - -
बोईंग ७३७-९००ईआर - २१२ -
बोम्बार्डीअर डॅश ८ क्यू ४०० १५ १५ ७८ १ भाडेतत्त्तवावरील
एकूण ५८ ७०

विमानांचा इतिहास[संपादन]

विमाने कार्यरत सुरूवात शेवट
बोईंग ७३७-२०० १९९३ १९९६
बोईंग ७३७-४०० १९९५ १९९६

सेवा[संपादन]

विमानामधील सुविधा[संपादन]

स्पाईसजेटमध्ये फार कमी सुविधा विमानातील प्रवाशांना दिल्या जातात. मॅक्सपोझर मिडीआ समूहाकडून ‘ स्पाईसरुट ’ हे मासिक दररोज प्रवाशांना दिले जाते.[१०]

स्पाईसजेट मॅक्स[संपादन]

स्पाईसजेट मॅक्स या नावाने ओळखल्या जाणा-या सुविधेमध्ये विमानामधील प्रवाशांना जेवण, आरक्षणाच्या वेळी बसण्याची व्यवस्था, विमानतळावर तपासणी करीतेवेळी प्राथम्य या बाबींचा समावेश आहे.

मान सन्मान आणि यश[संपादन]

३१ डिसेंबर २०१२ पर्यंत स्पाईसजेटला खालील सन्मानांनी गौरविण्यात आलेले आहे.[११]

 • आऊटलूक ट्रॅव्हलरकडून भारतातील सर्वोत्कृष्ट स्वस्त दरातील विमानसेवा
 • भारताच्या ट्रॅव्हल एजन्ट असोसिएशनकडून २०१२ चा भारतातील आंतरराष्ट्रीय स्वस्त दरातील विमान वाहतूक पुरस्कार (टीएएआय)
 • ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी कडून भारतातील सर्वोत्कृष्ट विमानवाहतूक देणारी कंपनी.(२०१२)
 • सर्वोत्कृष्ट वेबसाईट (२०१० आणि २०१२)
 • प्रवाशांच्या समाधानासाठी आणि व्यापारवृद्धीसाठी कंपनीने विकसित केलेल्या माहिती तंत्रज्ञानाबाबतच्या प्रयत्नाला सीआयओ १०० चे मानांकन (२००७,२००८,२००९,२०११ आणि २०१२)[१२]
 • हिंदुस्तान टाईम्सकडून घेतलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील सर्वांत कमी दर असलेली विमानवाहतूक कंपनी (डिसेंबर २००९)
 • वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट अवॉर्ड (२००९)
 • राष्ट्रीय पुरस्कार (आयसीडब्ल्यूएआय) (२००९)

नफा[संपादन]

वर्ष नफा संदर्भ
२००० रु.५.३७ मिलियन १२
२००१ रु.१६.३२ मिलियन १३
२००२ रु.३७.६ मिलियन १४
२००३ रु.१६.०८ मिलियन १५
२००४ रु.४१.४६ मिलियन १६
२००५ रु.३८.७ मिलियन १७
२००६ रु.४५३१.४७ मिलियन १८
२००७ रु.७४८२.७९ मिलियन १९
२००८ रु.१४३८५.७९ मिलियन २०
२००९ रु.१८८१९.७९ मिलियन २१
२०१० रु.२२४२०.९१ मिलियन २२
२०११ रु.२९६०६.०४ मिलियन २३
२०१२ रु.४०१९१.१४ मिलियन २४

संदर्भ[संपादन]

 1. "स्पाईसजेट संपर्क माहिती", स्पाईसजेट.कॉम, १४ सप्टेंबर २०१०. (इंग्लिश मजकूर) 
 2. "संपर्क", स्पाईसजेट, २४ जानेवारी २०१३. (इंग्लिश मजकूर) 
 3. "मुंबईमध्ये स्पाईसजेटचा उदय[मृत दुवा]", ब्लूमबर्ग, ३० ऑगस्ट २०१०. (इंग्लिश मजकूर) 
 4. "स्पाईसजेट कारगो सर्विसेस[मृत दुवा]", स्पाईसजेट, १९ जानेवारी २०१२. (इंग्लिश मजकूर) 
 5. "कंपनीचा इतिहास – स्पाईसजेट", मनिकंट्रोल.कॉम, ३० डिसेंबर २०११. (इंग्लिश मजकूर) 
 6. "स्पाईसजेटमधील मारनची गुंतवणूक रु.१०० करोडची", सीएनएन-आयबीएन (इंडिया), ३ मार्च २०१२. (इंग्लिश मजकूर) 
 7. "स्पाईसजेट पुन्हा नफयात", द हिंदू, २७ जानेवारी २०१३. (इंग्लिश मजकूर) 
 8. "स्पाईसजेटच्या क्यू-४०० विमानाचे मूळ स्थानक यापुढे हैद्राबादचे आरजीआयए येथे", स्पाईसजेट, ३० डिसेंबर २०११. (इंग्लिश मजकूर) 
 9. "स्पाईसरुट", मॅक्सपोझर मिडीआ ग्रुप, १४ जानेवारी २०१३. (इंग्लिश मजकूर) 
 10. "स्टॅण्डअलोन रिझ्‍ल्ट- ३१ मे-००- बीएसई", बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ३१ डिसेंबर २०११. (इंग्लिश मजकूर) 
 11. "स्टॅण्डअलोन रिझ्‍ल्ट- २८ फेब्रुवारी ०१- बीएसई", बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ३१ डिसेंबर २०११. (इंग्लिश मजकूर) 
 12. "ऑन-बोर्ड स्पाईसजेट", क्लेअरट्रिप.कॉम. (इंग्लिश मजकूर) 

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.