Jump to content

लिंडन बी. जॉन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिंडन बी. जॉन्सन

लिंडन बेन्स जॉन्सन (इंग्लिश: Lyndon Baines Johnson), लघुनाम एलबीजे (रोमन लिपी: LBJ) (२७ ऑगस्ट, इ.स. १९०८ - २२ जानेवारी, इ.स. १९७३) हा अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते २० जानेवारी, इ.स. १९६९ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. जॉन एफ. केनेडी याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत हा अमेरिकेचा ३७वा उपराष्ट्राध्यक्ष होता. नोव्हेंबर, इ.स. १९६३मध्ये केनेडीची हत्या झाल्यावर याने राष्ट्राध्यक्षपदाची धुरा वाहिली. केनेडी प्रशासनाची मुदत पुरी झाल्यानंतर इ.स. १९६४ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत विजयी होऊन हा पुन्हा अध्यक्षपदावर बसला. जॉन्सन डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.

उपाध्यक्षीय व अध्यक्षीय कारकिर्दींपूर्वी जॉन्सन इ.स. १९३७ ते इ.स. १९४९ या कालखंडात अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचा प्रतिनिधी होता. इ.स. १९४९ ते इ.स. १९६१ या काळात अमेरिकेची सेनेट सभागृहात त्याने टेक्सासाचे प्रतिनिधित्व केले.

त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत नागरी हक्क, सार्वजनिक प्रसारण, वैद्यकीयसेवा (मेडिकेअर), वैद्यकीयसाह्य (मेडिएड) इत्यादी सुविधा व शिक्षणसाह्य इत्यादी क्षेत्रांसाठी उदार कायदे संमत झाले. मात्र परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर जॉन्सन प्रशासनाने व्हियेतनाम युद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला. व्हियेतनाम युद्ध निर्णायक रित्या न संपता दीर्घ काळ लांबण्याची लक्षणे दिसू लागली, तसतसे त्याला वाढत्या पक्षांतर्गत, तसेच लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर पुढ्यात ठाकलेल्या इ.स. १९६८ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी पुन्हा उभे राहण्याची संधी न घेता त्याने माघार घेतली.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "लिंडन बी. जॉन्सन: अ रिसोर्स गाइड (लिंडन बी. जॉन्सन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)