बुरहानुद्दीन रब्बानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुरहानुद्दीन रब्बानी (फारसी: برهان الدين رباني; १९४० - २० सप्टेंबर २०११) हे अफगाणिस्तान देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. रब्बानींनी २८ जून १९९२ ते २७ सप्तेंबर १९९६ दरम्यान देशाचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. १९९६ मधील तालिबानच्या अफगाणिस्तान अतिक्रमणानंतर रब्बानी पुढील ५ वर्षे ते अफगाणिस्तानच्या बंडखोर गट उत्तरी आघाडीचे अध्यक्ष होते. २००१ साली अमेरिकेने तालिबानला अफङाणिस्तानातून हुसकावून लावले व पुन्हा लोकशाहीवादी सरकार स्थापन केले. ह्या दरम्यान रब्बानी १ महिन्याकरिता पुन्हा अफङाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते ज्यानंतर त्यांनी कार्यभाग हमीद करझाईंकडे सोपावला.

२० सप्टेंबर २०११ रोजी तालिबानच्या एका आत्मघातकी पथकाने रब्बानी ह्यांच्या घरात बॉंब उडवून रबान्नींची हत्या केली.