डिसेंबर २४
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५८ वा किंवा लीप वर्षात ३५९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]- १२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर.
अठरावे शतक
[संपादन]- १७७७ - जेम्स कुकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१४ - घेंटच्या तहाने १८१२ चेयुद्ध संपले.
- १८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग.
- १८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.
विसावे शतक
[संपादन]- १९१० - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.
- १९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जपानने कुचिंग आणि हॉंगकॉंग जिंकले.
- १९४६ - फ्रान्सच्या चौथ्या प्रजासत्ताकाची स्थापना.
- १९५१ - लिब्याला इटलीपासून स्वातंत्र्य इद्रीस पहिला राजेपदी.
- १९५३ - न्यू झीलंडमध्ये लहर तथा चिखलेच्या प्रचंड लाटेने रेल्वेचा पूल कोसळला. त्यावर असलेली गाडी कोसळून १५३ ठार.
- १९६६ - अमेरिकन सैन्याने भाड्याने घेतलेले कॅनेडेर सी.एल.४४ प्रकारचे विमान दक्षिण व्हियेतनाममध्ये छोट्या गावावर कोसळले. १२९ ठार.
- १९६८ - अपोलो ८मधील अंतराळ यात्री चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे प्रथम मानव झाले.
- १९७९ - एरियान प्रक्षेपकाचे पहिले प्रक्षेपण.
- १९९७ - सिद अल-अंत्री हत्याकांडात ५०-१०० ठार.
- १९९९ - काठमांडू येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करून ते विमान अफगाणिस्तानातील कंदहार येथे नेले.
एकविसावे शतक
[संपादन]- २००३ - ई.टी.ए.ने माद्रिदमधील चमार्तिन स्थानकात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावला.
- २०१६ - अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले.
जन्म
[संपादन]- ३ - गॅल्बा, रोमन सम्राट.
- ११६६ - जॉन, इंग्लंडचा राजा.
- १८४५ - जॉर्ज, ग्रीसचा राजा.
- १८६४ - विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले.
- १८६७ - कांतारो सुझुकी, जपानचा ४२वा पंतप्रधान.
- १८६८ - इमॅन्युएल लास्कर, जर्मन बुद्धिबळ खेळाडू.
- १८८० - डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
- १८८१ - हुआन रमोन हिमेनेझ, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.
- १८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक.नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे.
- १९२२ - ॲव्हा गार्डनर, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
- १९२३ - जॉर्ज पॅटन, अमेरिकन सेनापती.
- १९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.
- १९२७ - मेरी हिगिन्स क्लार्क, अमेरिकन लेखक.
- १९३४ - स्ट्येपान मेसिच, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३४ - ताऱ्या हेलोनेन, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५५ - लेखक व पत्रकार अंबरीश मिश्र
- १९५७ - हमीद करझाई, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९६१ - इल्हाम अलियेव, अझरबैजानचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
[संपादन]- १५२४ - वास्को दा गामा, पोर्तुगीज खलाशी.
- १८१३ - गो-साकुरामाची, जपानी सम्राट.
- १८६३ - विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
- १८७२ - विल्यम जॉन मॅकॉर्न रॅंकिन, ब्रिटिश डॉक्टर आणि अभियंता.
- १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.
- १९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.
- १९७३ - पेरियार ई.व्ही. रामसामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते
- १९७७ - नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका
- १९८० - कार्ल डॉनित्झ, जर्मन दर्यासारंग आणि नाझी जर्मनीचा शेवटचा नेता.
- १९८७ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री
- १९९० - थॉर्ब्यॉन एग्नर, नॉर्वेजियन लेखक.
- १९९९ - होआव बॅप्तिस्ता दि ऑलिव्हियेरा फिग्वेरेदो, ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९९ - मॉरिस कूवे दि मुरव्हिल, फ्रांसचा पंतप्रधान.
- २००५ - भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका
- २००९ - पुरोगामी विचारवंत भा. ल. भोळे
- २०१६ - अर्क चित्रकार,रेषांचे जादुगार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे ८९ व्या वर्षी निधन.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २२ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर महिना