Jump to content

मेरी हिगिन्स क्लार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेरी तेरेसा एलिनोर हिगिन्स क्लार्क कॉनहीनी तथा मेरी हिगिन्स क्लार्क (२४ डिसेंबर, १९२७:द ब्रॉन्क्स, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन लेखिका आहे. हिने मुख्यत्वे रहस्यकथा लिहिल्या आहेत.

हिगिन्स क्लार्कने आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्वीय सहायक आणि कॉपी एडिटर[मराठी शब्द सुचवा] म्हणून केली. त्यानंतर ती एक वर्ष पॅन ॲम एरलाइन्समध्ये सेविका होती. कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी तिने नोकरी सोडली व चरितार्थास हातभार लागावा म्हणून लघुकथा लिहिणे सुरू केले. पतीच्या मृत्यूनंतर हिगिन्स क्लार्कने अनेक वर्षे रेडियोवर चार मिनिटांच्या कथा लिहिल्या. तिच्या एजंटने तिला कथा लिहिण्यास प्रवृत्त केल्यावर हिगिन्स क्लार्कने जॉर्ज वॉशिंग्टनच्या जीवनावर आधारित काल्पनिक कथा लिहिली. या पुस्तकाचा खप फारसा न झाल्याने तिने रहस्यकथा लिहिण्याचे ठरविले. तिच्या पुस्तकांच्या एकूण ८ कोटी प्रती अमेरिकेत विकल्या गेल्या आहेत.

हिगिन्स क्लार्कची मुलगी कॅरोल हिगिन्स क्लार्क आणि तिची पूर्वीची सून मेरी जेन क्लार्क यासुद्धा लेखिका आहेत.