माद्रिद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माद्रिद
Madrid
स्पेन देशाची राजधानी

CollageMadrid.jpg

Bandera de Madrid.svg
ध्वज
Escudo de Madrid.svg
चिन्ह
माद्रिद is located in स्पेन
माद्रिद
माद्रिद
माद्रिदचे स्पेनमधील स्थान

गुणक: 40°23′″N 3°43′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 40°23′″N 3°43′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य माद्रिद
स्थापना वर्ष नववे शतक
महापौर आना बोतेया
क्षेत्रफळ ६०५.७७ चौ. किमी (२३३.८९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,१८८ फूट (६६७ मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ३१,६५,२३५
  - घनता ५,३९० /चौ. किमी (१४,००० /चौ. मैल)
  - महानगर ६४,८९,१६२
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०१:००)
http://www.madrid.es/


माद्रिद (स्पॅनिश: Madrid) ही स्पेन देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. माद्रिद शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या मध्य भागात मांझानारेझ नदीच्या काठावर वसले आहे. २०१४ साली माद्रिद शहराची लोकसंख्या सुमारे ३१.६५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ६४.८९ लाख होती. माद्रिद हे लंडनबर्लिन खालोखाल युरोपियन संघामधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर तर लंडनपॅरिस खालोखाल तिसर्‍या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

माद्रिद स्पेनचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९२ साली माद्रिद युरोपियन सांस्कृतिक राजधानी होती. युरोपामध्ये तिसर्‍या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असणारे माद्रिद सर्वच बाबतीत युरोपातील एक बलाढ्य स्थान व दक्षिण युरोपाचे आर्थिक केंद्र मानले जाते. २०१४ मधील एका सर्वेक्षणानुसार माद्रिद निवासासाठी जगातील १७व्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर होते. संयुक्त राष्ट्रांच्या विश्व पर्यटन संस्थेचे मुख्यालय माद्रिद येथे आहे.

इतिहास[संपादन]

प्रागैतिहासिक काळापासून रोमन साम्राज्याचा भाग असलेले माद्रिद नवव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर आफ्रिकेमधील मुस्लिम योद्ध्यांच्या अधिपत्याखाली आले. परंतु इ.स. १०८५ साली ख्रिश्चन योद्ध्यांनी ह्या भूभागावर ताबा मिळवला व येथे ख्रिश्चन धर्माचे अधिपत्य सुरू झाले. माद्रिदची वाढ होत गेली व १२०२ मध्ये कास्तिलचा अल्फोन्सो आठवा ह्याने माद्रिदला शहराचा दर्जा दिली. १५२० साली पवित्र रोमन सम्राट पहिल्या कार्लोसच्या विरोधात चालू झालेल्या बंडामध्ये माद्रिदने सहभाग घेतला होता.

१५६१ साली माद्रिदची लोकसंख्या ३०,००० होती. ह्याच वर्षी दुसर्‍या फिलिपने आपले निवासस्थान वायादोलिदहून माद्रिदला हलवले. ह्यामुळे माद्रिद स्पॅनिश साम्राज्याचे राजकीय केंद्र बनले व माद्रिदची वाढ झपाट्याने होऊ लागली. १७व्या शतकामध्ये माद्रिदमध्ये मिगेल सर्व्हान्तेस, दियेगो व्हेलाझ्केझ इत्यादी विख्यात कलाकार वास्तव्यास होते. तिसर्‍या कार्लोसच्या कार्यकाळात माद्रिदचा कायापालट करण्यात आला. १९३६ ते १९३९ दरम्यान चाललेल्या स्पॅनिश गृहयुद्धात माद्रिदची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. परंतु फ्रांसिस्को फ्रांकोच्या राजवटीमध्ये १९५९ ते १९७३ दरम्यान स्पेनमध्ये झालेल्या आर्थिक उत्कर्षादरम्यान माद्रिदची जलद गतीने प्रगती झाली.

भूगोल[संपादन]

माद्रिद शहर स्पेनच्या मध्यभागात मांझानारेझ नदीच्या काठावर वसले आहे. माद्रिद शहराचे क्षेत्रफळ ६०५.७ चौरस किमी (२३३.९ चौ. मैल) इतके आहे.

हवामान[संपादन]

माद्रिदमधील हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून उंचावर वसलेले असल्यामुळे येथील हिवाळे थंड असतात.

हवामान तपशील: माद्रिद
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) style="background:#FFDAB5;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|9.8
(49.6)

style="background:#FFCB97;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|12.0
(53.6)

style="background:#FFAD5C;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|16.3
(61.3)

style="background:#FFA042;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|18.2
(64.8)

style="background:#FF840B;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|22.2
(72)

style="background:#FF5B00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|28.2
(82.8)

style="background:#FF4000;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|32.1
(89.8)

style="background:#FF4600;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|31.3
(88.3)

style="background:#FF6800;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|26.4
(79.5)

style="background:#FF9831;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|19.4
(66.9)

style="background:#FFC082;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|13.5
(56.3)

style="background:#FFD9B3;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|10.0
(50)

style="background:#FF942A;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|१९.९५
(६७.९१)
रोजची सरासरी °से (°से) style="background:#FFF2E6;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|6.3
(43.3)

style="background:#FFE7D0;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7.9
(46.2)

style="background:#FFD0A2;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|11.2
(52.2)

style="background:#FFC58B;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|12.9
(55.2)

style="background:#FFAA56;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|16.7
(62.1)

style="background:#FF840B;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|22.2
(72)

style="background:#FF6D00;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|25.6
(78.1)

style="background:#FF7000;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|25.1
(77.2)

style="background:#FF8D1C;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|20.9
(69.6)

style="background:#FFB56C;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|15.1
(59.2)

style="background:#FFD9B4;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|9.9
(49.8)

style="background:#FFEEDD;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|6.9
(44.4)

style="background:#FFB66D;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|१५.०६
(५९.११)
सरासरी किमान °से (°फॅ) style="background:#F5F5FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|2.7
(36.9)

style="background:#FAFAFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|3.7
(38.7)

style="background:#FFF3E7;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|6.2
(43.2)

style="background:#FFE8D2;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7.7
(45.9)

style="background:#FFD0A1;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|11.3
(52.3)

style="background:#FFAF5F;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|16.1
(61)

style="background:#FF9B37;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|19.0
(66.2)

style="background:#FF9C39;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|18.8
(65.8)

style="background:#FFB368;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|15.4
(59.7)

style="background:#FFD4A9;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|10.7
(51.3)

style="background:#FFF2E6;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|6.3
(43.3)

style="background:#FAFAFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|3.6
(38.5)

style="background:#FFD8B1;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|१०.१३
(५०.२३)
वर्षाव मिमी (इंच) 33
(1.3)
35
(1.38)
25
(0.98)
45
(1.77)
51
(2.01)
21
(0.83)
12
(0.47)
10
(0.39)
22
(0.87)
60
(2.36)
58
(2.28)
51
(2.01)
४२३
(१६.६५)
वर्षावाचे दिवस (≥ 1 mm) style="background:#B4B4FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|6

style="background:#BBBBFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|5

style="background:#CDCDFF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|4

style="background:#A5A5FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7

style="background:#A8A8FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7

style="background:#D8D8FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|3

style="background:#E6E6FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|2

style="background:#E6E6FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|2

style="background:#D8D8FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|3

style="background:#A8A8FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7

style="background:#A5A5FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7

style="background:#A8A8FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;

"|7

style="background:#C0C0FF;color:#000000; font-size:85%;text-align:center;
border-left-width:medium"|६०
सूर्यप्रकाश (तास) style="background:#C3C313; font-size:85%;

"|148

style="background:#CECE00; font-size:85%;

"|157

style="background:#DADA00; font-size:85%;

"|214

style="background:#E0E000; font-size:85%;

"|231

style="background:#E8E800; font-size:85%;

"|272

style="background:#F3F316; font-size:85%;

"|310

style="background:#FCFC2B; font-size:85%;

"|359

style="background:#F6F61E; font-size:85%;

"|335

style="background:#E7E700; font-size:85%;

"|261

style="background:#D7D700; font-size:85%;

"|198

style="background:#C9C900; font-size:85%;

"|157

style="background:#B8B856; font-size:85%;

"|124

style="background:#DFDF00; font-size:85%;
border-left-width:medium"|२,७६६
संदर्भ: Agencia Estatal de Meteorología[१][२][३][४]

अर्थव्यवस्था[संपादन]

आजच्या घडीला (इ.स.२०१५) माद्रिद स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रदेश असून माद्रिद क्षेत्र स्पेनच्या ४७ टक्के आर्थिक उलाढालीसाठी कारणीभूत आहे. परंतु २०१० सालापासून स्पेनमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे माद्रिदची अर्थववस्था खालावली असून अनेक नवे विकास उपक्रम थांबवण्यात आले आहेत.

वाहतूक[संपादन]

माद्रिदमधील शहरी वाहतुकीसाठी रेल्वे व रस्ते मार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी माद्रिद मेट्रो तसेच पारंपरिक परिवहनासाठी ट्राम सेवा उपलब्ध आहे. अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ हा स्पेनमधील सर्वात मोठा विमानतळ माद्रिद शहरामध्ये असून तो युरोपामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जातो. आयबेरियाएअर युरोपा ह्या स्पेनमधील मोठ्या विमान वाहतूक कंपन्यांचे प्रमुख वाहतूकतळ येथेच आहेत. माद्रिद स्पेनमधील रेल्वे वाहतूकीचे केंद्र असून स्पॅनिश दृतगती रेल्वेचे बहुतेक सर्व मार्ग माद्रिदमध्ये मिळतात. येथून बार्सिलोना, मालागा, सेव्हिया, वायादोलिद, वालेन्सिया, सारागोसा ह्या स्पेनमधील प्रमुख शहरांसाठी थेट दृतगती रेल्वेसेवा उपलब्ध आहे.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा माद्रिदमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. रेआल माद्रिद हा जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब येथेच आहे. येथील सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम हे बार्सिलोनामधील कँप नोउखालोखाल स्पेन व युरोपातील दुसर्‍या क्रमांकाचे स्टेडियम आहे. आजवर येथे १९८२ फिफा विश्वचषक१९६४ युरोपियन देशांचा चषक ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे अंतिम सामने तसेच युएफा चँपियन्स लीगच्या १९५७, १९६९, १९८० व २०१० हंगामांमधील अंतिम फेरीचे सामने खेळवले गेले आहेत. रेआल माद्रिदखेरीज ला लीगा ह्या लीगमध्ये खेळणारे ॲटलेटिको माद्रिद, गेटाफे सी.एफ.रायो व्हायेकानो हे तीन क्लब माद्रिद महानगरामध्ये आहेत. स्पेन फुटबॉल संघ आपले सामने माद्रिद महानगरामधूनच खेळतो.

आंतरराष्ट्रीय संबंध[संपादन]

माद्रिद शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[५]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: