ऑक्टोबर १२
Appearance
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८५ वा किंवा लीप वर्षात २८६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]इ.स.पू. सहावे शतक
[संपादन]- ५३९ - महान सायरसच्या सैन्याने बॅबिलॉन जिंकले.
तेरावे शतक
[संपादन]- १२७९ - निचिरेनने आपल्या दाइ-गोहोन्झोन या ग्रंथाची रचना केली.
पंधरावे शतक
[संपादन]- १४९२ - ख्रिस्तोफर कोलंबस हा अमेरिकेजवळच्या बहामास द्वीपसमूहात पोचला. त्याला आपण भारतात पोचलो आहोत असे वाटले.
सतरावे शतक
[संपादन]- १६९२ - मॅसेच्युसेट्सच्या गव्हर्नर विल्यम फिप्सने खरमरीत पत्र पाठवून सेलमच्या चेटकिणींचे खटले बंद करवले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१० - ऑक्टोबरफेस्ट - म्युनिकच्या राजघराण्याने आपल्या राजकुमाराच्या लग्नाप्रीत्यर्थ म्युनिकच्या जनतेला बियर पिण्यास मुक्त आमंत्रण दिले. यातून ऑक्टोबरफेस्टची सुरुवात झाली.
- १८२२ - पेद्रो पहिला ब्राझीलचा सम्राट झाला.
- १८२३ - चार्ल्स मॅकिंटॉशने स्कॉटलॅंडमध्ये पहिला रेनकोट विकला.
- १८७१ - भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. हा कायदा १९४९मध्ये रद्द केला गेला.
विसावे शतक
[संपादन]- १९०१ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्टने राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानाचे नाव एक्झिक्यूटिव्ह मॅन्शन बदलून व्हाईट हाऊस केले.
- १९१५ - पहिले महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना बेल्जियममधून पळून जाण्यास मदत केल्याबद्दल जर्मनीच्या सैन्याने परिचारिका इडिथ कॅव्हेलला गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
- १९१७ - पाशेंडेलेची पहिली लढाई - न्यू झीलंडच्या इतिहासताली सगळ्यात मोठी जीवितहानी.
- १९१८ - मिनेसोटात लागलेल्या वणव्यात ४५३ व्यक्ती मृत्युमुखी.
- १९२८ - चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बॉस्टनमध्ये सर्वप्रथम कृत्रिम फुफ्फुसाचा उपयोग.
- १९६० - संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्हने टेबलावर जोडा आपटून आपला मुद्दा ठासवला.
- १९६२ - अमेरिकेच्या वायव्य भागातील वादळात ४६ ठार, २.३ कोटी अमेरिकन डॉलरचे नुकसान.
- १९६८ - विषुववृत्तीय गिनीला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १९७९ - द हिचहायकर्स गाइड टू द गॅलेक्सी हे पुस्तक प्रकाशित.
- १९८३ - लॉकहीड कॉर्पोरेशनकडून दोन कोटी अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानच्या पंतप्रधान तनाका काकुऐला चार वर्षांचा कारावास.
- १९८४ - प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मी या दहशतवादी संघटनेने युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर व तिच्या मंत्रीमंडळावर बॉम्बहल्ला केला. पाच ठार, थॅचर बचावली.
- १९८८ - जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गिनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.
- १९९१ - असकार अकायेव किर्गिझस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी बिनविरोध नियुक्त.
- १९९७ - अल्जीरियामध्ये पोलीस असल्याचे भासवून दहशतवाद्यांनी ४३ व्यक्तींची हत्या केली.
- १९९९ - परवेझ मुशर्रफने नवाझ शरीफचे सरकार उलथवून पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली.
एकविसावे शतक
[संपादन]- २००० - अमेरिकेच्या युद्धनौका यू.एस.एस. कोलवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. १७ अमेरिकन सैनिक ठार, ३९ जखमी.
- २००२ - दहशतवाद्यांनी बालीतील दोन बारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. २०२ ठार, ३०० जखमी.
जन्म
[संपादन]- १००८ - गो-इचिजो हा जपानी सम्राट
- १५३७ - एडवर्ड सहावा, इंग्लंडचा राजा
- १७९८ - पेद्रो पहिला, ब्राझिलचा सम्राट
- १८६१ - फ्रेडरिक मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६६ - रामसे मॅकडॉनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९११ - विजय मर्चंट, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२५ - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - अशोक मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - दम्मिका रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- ६३८ - पोप ऑनरियस पहिला.
- ६४२ - पोप जॉन चौथा.
- १५७६ - मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १७३० - फ्रेडरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १९६७ - राम मनोहर लोहिया, भारतीय नेता.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- स्वातंत्र्य दिन - विषुववृत्तीय गिनी.
- मातृ दिन - मलावी.
- हिस्पॅनिक दिन - स्पेन.
- कोलंबस दिन - अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
- स्थानिक संघर्ष दिन - व्हेनेझुएला.
- बाल दिन - ब्राझिल.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर महिना